सोनिया गांधी.. सोनेरी हृदय असणारी भारतीय स्त्री ! Sonia Gandhi..A Bhartiya Lady With Golden Heart !
सोनिया गांधी..सोनेरी हृदय असणारी स्त्री !
Sonia Gandhi..A Lady With Golden Heart !
सोनियाजी यांचा जन्म इटलीत,शिक्षण इंग्लंडमधे व नंतर लग्न भारतात झालं.भारतात आल्या तेव्हापासून सोनियाजी भारताशी जोडल्या गेल्या ते आजपर्यंत. दिवसेंदिवस भारताशी असलेले त्यांचं नातं घट्ट होत गेले.स्वर्गवासी भारताच्या पूर्व पंतप्रधान इंदिराजी यांनी सोनियाजी यांना भारताच्या संस्कृतीचे मूळ तत्त्वे शिकवली व मुलीसम वागणूक दिल्याचे सोनियाजी सांगतात.राजीवजी यांच्याबरोबर सोनियाजी यांचा प्रेमविवाह.पण माणूस एखाद्यावर इतका प्रेम करू शकतो,हे सोनियाजी यांच्याकडे पाहिल्यावर खरं वाटतं. इंदिराजी यांच्या हत्येनंतर राजीव यांच्या खांद्यावर देशाची जबाबदारी आली.त्यातही सोनियाजी यांनी पत्नी या नात्याने पूर्णतः साथ राजीवजी यांना दिली.पण इंदिराजींच्या मृत्यूच्या काही वर्षातच राजीव गांधी यांची हत्या करण्यात आली.अशा परिस्थितीत एखाद्या व्यक्तीने काय केलं असत ? एक तर घाबरून सगळं सोडून गेली असती अथवा राज्यकारभाराचा पुरेपूर गैरफायदा घेतला असता.पण त्या सोनिया होत्या,इंदिराजींची स्नुषा व राजीव यांच्या पत्नी.पंतप्रधान पद नाकारून पक्षाची जबाबदारी खांद्यावर घेतली खरी,पण अतिशयोक्ती कुठेच केली नाही.सर्व बाबतीत समतोल सोनियाजी यांनी राखला व त्या यशस्वी झाल्या.पण यासाठी त्यांना मोठी किंमत चुकवावी लागली.
त्यांच्या चारित्र्यावर,विदेशी असण्यावर अनेक प्रश्न निर्माण करण्यात आले.पण सोनियाजींनी जणूकाही वचनच इंदिराजी व राजीवजी यांना दिले होते,की काही झालं तरी देशहितासाठी खंबीरपणे उभी राहिल,पण नीच मानसिकतेपुढे झुकणार नाही.ज्या धैर्याने त्या राजीवजी गेल्यानंतर उभ्या राहिल्या त्याच धैर्याने आजही उभ्या आहेत.अनेक संकट,संघर्षांना तोंड देत देशाप्रती आपल्या माणसांचे बलीदान आठवण त्या सामना करत आहेत.
"में लौट जाऊंगी.मेरा राजीव मुझे लौटा दो.."हे ऐकल्यावर अंगावर शहारे उभे रहातात.काय सोसलं असेल ह्या बाईनं ? राहून राहून मनात प्रश्न येतात.
जो देशासाठी झटतो त्याला देशद्रोही ठरवणाऱ्या मूर्ख मनुवादी पक्ष व लोकांनी स्वतः देशासाठी काय त्याग केला हे आधी सांगावं.सगळ्या परीसीमा ओलांडून पुन्हा त्यांचेच नाव घेणारी जमात आपण पाहिली आहे.टीका गांधी नावे करणारे स्वार्थासाठी कौतुक देखील गांधींच्या नावाने करतात.हे दुटप्पी विचारसरणीचे लोक.
पण सोनियाजी या सगळ्यांपेक्षा वेगळ्या आहेत.आपल्या पतीच्या मारेकऱ्यांना माफ करणारी स्त्री,म्हणजे सोनियाजी आपण पाहिली.क्षमाशीलता या भावनेने आजपर्यंत ह्या नीतिमत्ता शून्य समाजात त्या वावरत आल्या.पण ह्या सगळ्याचा किती त्रास व वेदना त्यांना झाल्या असतील याचा विचार करून मन सुन्न होतं.
सोनियाजी सून,बायको या भूमिकेत होत्या तशा त्या आई पण आहेत.ती बाजू सांभाळून आपल्या व मुलांच्या जीवावर असणारे सततच्या संकटांची जाणीव असूनदेखील भारताच्या राजकारणाची धुरा त्यांनी भक्कमपणे पेलवली.आज त्यांचे वय झालं तरी त्या त्यांच्या देशाप्रती जबाबदाऱ्या पार पाडत आहेत. भारताच्या कोट्यावधी जनतेचे भवितव्य सोनियांच्या हाती आहे.निरंकुशशाही,हुकूमशाही मानसिकतेच्या विरुद्ध लढा देण्यासाठी आरोग्यसंपन्न,उदंड आयुष्य सोनियाजी यांना लाभो हीच आज त्यांच्या जन्मदिनी जिजाऊं चरणी मागणी.
सोनियाजी गांधी..सोनेरी हृदय असणाऱ्या भारतीय स्त्रीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !
प्राची दुधाने
वारसा फाऊंडेशन
👍
ReplyDelete