संत गाडगे (बाबा) महाराज
संत गाडगे(बाबा) )महाराज
मानवाला मानव म्हणून जगायला शिकवणारे.आयुष्यभर माणूस म्हणून मानवतेची बीज जनाजनात पेरणारे. माणसांना शिक्षण व स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणारे. अनावश्यक रुढी-परंपरा व त्यांच्या नावाने होत असलेली लूट,प्राण्यांची हत्या या विषयी जागृती निर्माण करणारे. जातिभेद व अस्पृश्यता,दीन,दुबळे अनाथ यांची सेवा करावी,मंदिरांवर पैसा खर्च करण्यापेक्षा शाळा/शिक्षण यावर खर्च करावा, सावकाराकडून कर्ज काढू नका,व्यसनांच्या आहारी जाऊ नका हे व असे अनेक उपदेश संत गाडगेबाबा आपल्या कीर्तनपर प्रबोधनातून गावोगावी फिरून लोकांना सांगत.
संत तुकाराम महाराज यांना आपले गुरू मानणारे संत गाडगेबाबा चालते बोलते ज्ञान भांडार होते.बाबा शिकलेले नव्हते,पण ज्ञानी होते.माणसातील अज्ञान दूर करण्यासाठी त्यांनी आपले सर्व सुख त्यागले.गाडगेबाबा यांच्या कविता आजच्या काळातही समर्पकपणे लागू होतात.बाबांचे द्रष्टेपण त्यांच्या विचारातून दिसून येते.संत गाडगेबाबा यांची 'देव'ही कविता जरूर वाचावी व समजून घ्यावी.देव आहे की नाही मुळात ही शंकाच आपल्या मनात उरणार नाही. इतकी सटीक मांडणी संत गाडगेबाबा यांनी केली आहे.मुळात काय तर मानव एकमेव जात व मानवता हा एकमेव धर्म.त्या अलीकडे अन पलीकडे काहीही नाही.ज्याला हे समजलं त्याचे जीवन मानव म्हणून सार्थ झाले समजावे.अशा ज्ञान दाता थोर महामानव संत गाडगे महाराज यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त कोटी कोटी प्रणाम !
प्राची दुधाने
वारसा फाऊंडेशन
Comments
Post a Comment