देशभक्तीचे बीज !

देशभक्तीचे बीज !

देशभक्ती गिरवण्यात अन मिरवण्यात नसते,
ती श्वासाच्या अन हृदयाच्या प्रत्येक स्पंदनात वसते.
आंधळेपणाने सरकारला पाठींबा, 
समजा देशभक्तीच्या नावाला काळीमा. 

देश म्हणजे सरकार अन 
सरकार म्हणजे देश नसतोय, 
हा देश माझ्या भारताच्या प्रत्येक
बांदावर अन बांधवात वसतोय. 

तिरंग्यामध्ये सामावलेला,विविधतेने नटलेला,
शेतकरी संग कष्टकरी मिळोनि उभारलेला, 
वीरांच्या बलिदानाने हा देश आहे वसलेला.

निष्ठा असते देशाप्रती, 
खऱ्या खोट्याची जनास असो प्रचिती.
जमात होवू नका गुलामाची,  
सरकार किती येती अन जाती.

देशभक्ती तीच खरी, 
जी चुकीला प्रश्न करी.
अनिष्ट शासकाचा जो आज्ञाधारक,
देशहितास होईल तो मारक.

देशभक्ती म्हणजे देशासाठी लढणे, 
ना की अंध बनुनी प्रधानाला मिळणे. 
जेथे नसे विश्वास, 
तेथे आज्ञा कशी करेल वास ?

अंधबुद्धीचा पालनकर्ता गुलाम असतो,
परी देशद्रोही तो इतरां समजतो.
विरोध जो करतो हुकूमशाहीला,
मुकेल कसा तो देशभक्तीला.

नुसती छाती फुगवून,झेंडा फडकवून,
नसे देशाप्रती खरा मान.
एकत्र निर्माण करूनी सशक्त भारत,
यातच खरा अभिमान.

सामोरं जा तू सत्याला, 
विरोध होऊदे अन्यायाला.
पोकळ राष्ट्रवाद नको मिरवू, 
मिळूनी देशभक्तीचे बीज रोवू !

प्राची दुधाने 
वारसा फाऊंडेशन

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान दिन

कोरोना आणि लस - एक षडयंत्र

"बापू,देश की सेहत के लिये क्या तु हानिकारक है"??