Posts

Showing posts from November, 2020

जय जवान जय किसान

Image
जय जवान जय किसान जय जवान जय किसान हा भारतामध्ये प्रथम नारा देणारे भारताचे दुसरे पंतप्रधान श्री लाल बहादुर शास्त्रीजी.१९६५ साली भारत-पाक युद्ध दरम्यान हा नारा शास्त्रीजींनी दिला होता.शेतकरी,कष्टकरी,जवान हे आपल्या देशाचे पालक,पोषक व संरक्षक आहेत.आज हे आहेत म्हणून,आपण आहोत.शेतकरी शेतात राबराब राबून आपल्यासाठी अन्नधान्य उगवतो.कष्टकरी श्रमाची कामे करून आपल्याला सुख सोयी उपलब्ध करून देतात.सैनिक सीमेवर सतत पहारा,लढा देऊन आपल्याला परकीय आक्रमणांपासून वेळेला स्वतःचा प्राण देऊन संरक्षित करतात.जो पर्यंत हे सगळे आहेत आपण आपापल्या क्षेत्रात कार्य करण्यासाठी प्रयत्नशील राहू.पण सध्याची भारतातील परिस्थिती गंभीर आहे. आज किसान व कष्टकरी यांच्यावर अन्याय होत आहेत.त्या अन्याया विरोधात ही शेतकरी व कष्टकरी लाखोंच्या संख्येने रस्त्यावर उतरून शांततेत निदर्शने करत आहेत.पण हुकूमशाही शासक बळाचा वापर करून त्यांना रोखण्याचा प्रयत्न करत आहे.बळाचा वापर  अर्थातच पोलीस,सैन्यांच्या माध्यमातून होत असतो.    जे जवान व किसान देशाच्या प्रगतीचे भागीदार होते ते आज हुकूमशाही शासनामुळे आमने-सामने उभे आहेत.शेतकरी ब...

शेतकरी..वारस बळीराजाचा !

Image
शेतकरी..वारस बळीराजाचा ! शेतकरी तो कष्टकरी,   भाकरीवर तयाच्या विश्व तरी.  पोशिंदा जगाचा, वारस तो बळीराजाचा. कष्ट करूनी घाम गाळूनी,  आयुष्य त्याचे सरणी. कधी ओला कधी सुका,  दुष्काळ आस्मानी करी फुका. सुलतानाने कहर मांडला,  बळीराजाचा घात केला. ओझ्याखाली दबूनी, अमाप कष्ट उपसोनी  माझे पोट भरण्यासाठी,  स्वतः उपाशी राहीला असा शेतकरी मी पाहिला.. पायाला पडतात भेगा रणरणत्या उन्हात चालूनी मैल, हक्क तयाचा मागण्या जाता  शासक तयास न सोडी सैल. देतो तुला न्याय चोखा,   म्हणोनी त्यावर डागे पाण्याच्या तोफा. एवढे करूनी मन हुकुमाचे न भरे,  जोडूनी जो उभा दोन्ही कर त्या बळीस लाठी मारे. शेतकऱ्याचा काळ होवुनी, व्यापारी उभा ठाकला. शासक होवू पाहे विधाता,   नसे त्यास साधी बुद्धिमत्ता. शेतकरी टिकेल..तरच अन्न पिकेल,  हे न जाने तो खुळा. दडपशाही ने दडपू पाहे, नक्षली,दहशतवादी त्यास कहे. शांततेचे प्रतीक तो आहे, नम्रता अंगी जया वाहे. डिवचू नको या बळीराजाला,  नांगराने तयाच्या तुझा तख्त चरचर कापत राहे.  बळीराजा तुझ माझे एकच सांगणे, लेक तुझी...

२८ नोव्हेंबर आज खरा शिक्षक दिन..महात्मा फुले स्मृतिदिन !

Image
२८ नोव्हेंबर,आज खरा शिक्षक दिन.. आज महात्मा ज्योतिबा फुले यांचा स्मृतिदिन ! अशिक्षित राहिल्याने बहुजनांची प्रगती खूंटली. वैचारीक,मानसिक,शारीरिक गुलामगिरी पत्करून ते शुद्र झाले.स्त्रिया चुल आणि मूल,रुढी परंपरा यात अडकून शुद्रादी शुद्र झाल्या.. थोर विचारवंत,समाजसुधारक,स्त्री शिक्षणाचे जनक,शेतकर्यांचे कैवारी,सत्यशोधक समाजाचे जनक,समतावादी,परिवर्तनवादी महात्मा जोतिबा फुले यांनी कृतिशिलतेची वाट दाखवून प्रगतशील समाज निर्माण करण्याचे महान कार्य केले.आज ही महात्मा फुले यांच्या वैचारीक्तेची गरज आपल्याला भासते.महात्मा फुले यांच्या विचारांचे पाईक होवून वैचारीक कृतिशिल परिवर्तन आपल्यापासून सुरू करणे हे आपले परम कर्तव्य समजावे.मी माझ्या वैचारिकतेमधे,कृतिमधे फुले दांपत्यास स्मरून अनेक बदल घडवून आणले आहेत.ज्याने माझी व माझ्या कुटुंबाची वैचारीक वृद्धी होत आहे.माझ्या ह्या छोट्याशा प्रयत्नातून महात्मा फुले यांना खऱ्या अर्थाने त्रिवार शिवाभिवाद्न !!! 👏👏👏👏👏👏👏👏👏👏 ॥ जय ज्योती ॥ ॥ जय सावित्री ॥   प्राची दुधाने  वारसा फाऊंडेशन https://youtu.be/a-M1W3Xp9N0

मृत्यूचे भय कसले..आज नाही तर उद्या,तो आपलाच आहे..

Image
मुलाकात हुई एक दोस्त से कल.. बातों बातों मे कुछ यू पूछा उसने,  क्यूँ कहते,लिखते हो इतना सच ?  क्या किमत मिलती हैं तुम्हे इसकी ?  हसकर में ने कहां..  हर चीज बेचने थोडी ही निकली हूँ, कुछ कर्जदार भी तो बना लू.. फिर उसने गुस्से से कहां,  क्या डर नहीं लगता तुम्हे,  छीन लेगा तुमसे तुम्हारी साँसे कोई ?  मुस्कुराके हमने भी शान से जवाब दे ही दिया.. सच कहने,लिखने मे क्या डर ?  वो तो झूट के घर करता है गुजारा..  मौत से भी कैसी छीपाई, वो भी अपना ही है भाई.. कल मरना ही है सभीको,  तो आज ही सही... मर के करोगे क्या हासील ?  अपनी जिंदगी कैसे जिओगे ?  फिकर नहीं तुम्हे अपनो की ?  एक आँख मे आंसू और दुसरे मे,  गुस्सा था यार के.. अच्छाई की लत है लगी, यहाँ तो मंजिल है मिली.. अपनों ने ही तो दिया है ये हौसला, वरना इन आँखो मे ये नमी ना होती... आखिर गले लगाही लिया उसने ना हस रहा था,ना रो रहा था.. फिर कहने लगा,  इसी बात का तो नाज है हमे, के तुम अपने हो.. ऐ दोस्त,हर जन्म मे अपनी हो यारी,   अब हर बात मे है अपनी साझेदारी.. सर्व सत्यशो...

२6 नोव्हेंबर भारतीय संविधान दिन !

Image
२६ नोव्हेंबर भारतीय संविधान दिन ! भारताला स्वातंत्र्य मिळाल्या नंतर देशाने एक नवी उभारी घेणं आवश्यक होत. भारत हा विविधतेने नटलेला देश आहे.त्याचे स्वतंत्र राज्यकारभार असणं आवश्यक होतेच,पण ते पूर्णतः इंग्रजांच्या पॉलिसीवर केंद्रित नसावं अशी भारतीयांची धारणा होती.पण तरी ही ब्रिटिशांच्या माध्यमातून आपले स्वतंत्र संविधान असाव ज्याने भारताला स्वातंत्र्य होण्यास व नंतर उपयोग होईल या विचाराने स्वातंत्र्या आधीच संविधान सभेची/समितीची स्थापना करण्यात आली होती. ६ डिसेंबर १९४६ रोजी संविधान सभा स्थापन  करण्यात आली व ९ डिसेंबरला पहिली बैठक सभेने घेतली होती.सुरुवातीला एकूण ३८९ सदस्य होते. नंतर जून १९४७ मधे ही संख्या घटत गेली व २९९ इतकी झाली.१९४७ मध्ये भारताला ब्रिटीशांकडून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर,संविधान सभेने भारताची पहिली संसद म्हणूनही काम केले आहे.     संविधान सभेचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र प्रसाद व उपाध्यक्ष हरेंद्र कुमार मुखर्जी होते.जवाहरलाल नेहरू यांनी वस्तुनिष्ठ ठराव घटनेची मूलभूत तत्त्वे मांडली. जी नंतर घटनेची प्रस्तावना ठरली.हा वस्तुनिष्ठ ठराव सर्वानुमते स्वीकारला गेला.मसुदा समिती ...

मेरे विचार मुझे सोने कहां देते हैं..

Image
आज हिंदी मधे कविता केली आहे,काही शब्द लिहिण्यात चुकले असेल तर कळवा ही विनंती 🙏 मेरे विचार मुझे सोने कहां देते हैं.. रात भर मेरे विचार मुझे सोने नहीं देते हैं,   जाने कहां-कहां घूम आते हैं l थक हारके सोना चाहू, तो सुई से चुभ जाते हैं l मेरे विचार सोने कहां देते हैं.. वो खफा हैं मुझसे,  कर रहे हैं,शिकायत मेरी ही मुझसे l कहते हैं कैसे नींद आती है तुम्हें इतने शोर में, में कहू,कहां है शोर ?  खामोशी है छाई चारों ओर l सर पकड़ कर बैठे विचार मेरे, कहे मूर्ख,खामोशी में ही तो होता है सबसे बड़ा शोर l मेरे विचार मुझे सोने कहां देते हैं.. कोई आज फिर खामोशी से भूखा सो रहा है,  किसान थक हारकर खामोशी से जीना छोड़ रहा है,  कोई बच्चा कहीं अनाथ हो रहा है खामोशी से, किसी माँ,बहन,बेटी की इज्जत उछाल रही है खामोशी से, सीमा पर जवान के सीने पर लगी गोली कर गई खामोश उसे,  गरीब मजदूर की दब रही है आवाज खामोशी से, मजहब के नाम पर गिर रही है सालों से खड़ी मोहब्बत की दीवार खामोशी से हर कहीं, ये खामोशी असहाय पीडा दे रही है मुझे,  मेरे विचार मुझे सोने कहां देते हैं l और क्या गिनवा...

लढवय्या मी

Image
लढवय्या मी  मी व्यक्त होवुनी  मुक्त जाहले  संसाराचा भार झेलुनी  स्वतःला ही मी सावरले    दुःख,भय,संकट जसे  ऊन,वारा,पाऊस सम पदराखाली संरक्षित,संसार माझा  ह्या सकलापासूनी दूर  काय करू,काय नको  भ्रमात मी रात्रं दिन  प्राधान्य मज माझे कार्य  त्याहून प्रिय मज माझे प्रियजन  तारेवरची कसरत कसली  मनधरणीने कंबर बसली  युद्ध रोज नवं नवे  घेवूनी येती आव्हाने  सामना मज आव्हानांशी  त्यांना ही मी पुरून उरेल  वारसा हा संघर्षाचा  त्यातून मी आणखीन फुलेल शांत समई सम माझे असणे  वेळ पडता होईल वणवा  रूढी,परंपरा मज ज्या प्रतिबंध  पेटून देईल समदे  ना बंदिनी,ना अभागी  हे नव्हे सत रूप माझे  लढवय्या मी भाग्य कारिणी मी तटिनी अन मीच अवनी  मूर्त रूप हे मातीत गाडुनी  प्रगती माझी कुंठित कशी  अंकुरेल पुन्हा पुन्हा मी  खासियत ही मोडू कशी समजून घे हे हेवे दावे  हे नारी तू स्वयंभू  पुन्हा सज्ज हो लढाया आता  हो जिजाऊ,सावित्री,अहिल्या अन रमाई माता ! प्राची दुधाने...

"ती"

Image
"ती" 'ती'तुमच्या आयुष्यात नंदनवन फुलवते.. 'ती'तुमच्यावर भरभरून प्रेम करते..  'ती'स्वतःपेक्षा जास्त विश्वास तुमच्यावर टाकते..  'ती'दुःख झेलून तुम्हाला सुख देते..  'ती'शिळं खाते पण तुम्हाला ताज वाढते.. 'ती'सर्व काही तुमच्यासाठी सोडून येते..  'ती'तुमचे सगळे गुन्हे पोटात घालते..  'ती'तुमच्या सर्व अपराधासाठी तुम्हाला क्षमा करते.. 'ती'तिचा अपमान केला तरी तुमचा सन्मान राखते.. 'ती'हजार चटके घेऊन निमूटपणे तुमचा संसार करते..  'ती'तुमची अब्रू असते..  'ती'स्वतःसाठी काहीच नसते.. 'ती'तुम्ही आहात तसेच तुम्हाला स्वीकारते.. 'ती'स्वतः मात्र अग्नीपरीक्षा देते.. 'ती'करारी असते,पण संसाराची अन संस्कारांची पायात          तिच्या बेडी असते.. 'ती'आई-बापाला पाहुनी असते.. 'ती'नवऱ्याला ही परकी भासते.. 'ती'तुझ्यासाठी व्रत अन नवस करते.. 'ती'तिची सगळी स्वप्न,इच्छा मात्र दाबत असते.. 'ती'चेहेऱ्यावरती हसू फुलवते.. 'ती'कोपऱ्यात जाऊन एकटीच रडते.. ...

समवयस्कांचा प्रभाव..Peer Pressure !

Image
समवयस्कांचा प्रभाव..Peer Pressure ! अनेक विषयासंदर्भात लिहित आहे.त्यात मुला- मुलींविषयी लिहिणं फार महत्त्वाचा आहे.म्हणून हा विषय प्रथम घेत आहे.पुढे आणखीन काही विषय मुलं व पालक याबाबत घेणार आहे.तूर्तता पीअर प्रेशर म्हणजे समवयस्कांचा प्रभाव याविषयी माहितीस्तव हा लेख.मुळात बहुतांश पालकांना व मुलांना हे पीअर प्रेशर किंवा समवयस्कांचा प्रभाव म्हणजे नक्की काय हेच माहीती नसतं.पण हा विषय माहिती करून घेणे सर्वांसाठी हिताच आहे.समवयस्कांचा प्रभाव तुमचा आमचं जीवन कायमच बदलू शकतो हे लक्षात घ्या.      तर मुळातच पीअर प्रेशर किंवा समवयस्कांचा प्रभाव म्हणजे काय ?  आपल्या वयाचे असणारे लोक,समवयस्क.त्यात मित्र-मैत्रीण,बहिण-भाऊ(सख्खे,चुलत,मालत,इ.),  विद्यार्थी,परिचित यांचा समावेश असतो.एका शाळेत,  कॉलेजात,शेजारी,गावी,परदेशात कुठेही वास्तव्यास असलेल्या अथवा भेटणारे.आता तुम्ही म्हणाल यांचा प्रेशर म्हणजे प्रभाव कसला ?  मानव हा सामाजिक प्राणी आहे हे आपल्याला माहित आहे.या कारणाने माणूस एकटा राहू शकत नाही. त्याला त्याचा एक विशिष्ट गट,जमाव हा प्रिय असतो.एकट पडण्याची भीती प्रत्येक व...

अखंड ही सृष्टी ज्ञानाचीया भंडार !

Image
अखंड ही सृष्टी ज्ञानाचीया भंडार ! अखंड ही सृष्टी ज्ञानाचीया भंडार,  जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी,चराचर. दगडाला फुटे पाझर, त्यातून जल वाहे निर्झर. मानवाचे काळीज का धोंड्याहुनी कठोर, रक्ताचे पाट वाहे,तरी स्थब्द अन निष्ठुर. इवलेसे ते पुष्प उमलती, खडकाचे ते उर भेदती. माझे जीवन संघर्षाचे, मनुजा लढ तु,हे प्रयास तयाचे. पर्वते भिडती नभास, यश सम जणू ती शिखरे आम्हास. पंख ते पसरुनी उंच घेइ भरारी, दावे मार्ग स्वातंत्र्याचा खग गगनावरी. इवलेसे अंकुर भुईत रुजूनी, क्रम दावती संघर्षाचा,  मूळ तयाचे घट्ट रोवूनी. सूर्य मज सांगे पुन्हा उगवणे,  आयुष्य हे असे निभवणे. ठेचं लागतात अडखळला तरी,  पुन्हा नव्याने घे उभारी. चंद्र चमके चिरून तिमिरा,  भेदुनी अंधक्कार,हो उजागर. मूळ मंत्र हा जाणून घे, फुलेल त्यातून जीवन अवघे. मनुष्या नको पाहूस सुख क्षण भंगुर,  एकमेका सहाय्य मानवा हाच खरा तव शृंगार ! प्राची दुधाने  वारसा फाऊंडेशन 

भाव,विचार,शब्द अन मी !

Image
भाव,विचार,शब्द अन मी ! शब्दांवर माझं प्रभुत्व की माझ्यावर शब्दांचं,  मला हे कोडं उमगतच नाही.. मनातील भाव अन त्यावर हे विचार, कागदार शाईने शब्द पेरत रहातात.. कधी कधी मनाचे भाव मस्तकातील विचारांना  गांगारून सोडतात,   ह्या गोंधळात शब्द वाटेतच अडखळतात..  अनेकदा तर हे शब्द खोडसाळपणा करतात,  भाव आणि विचार यांच्या ही पुढे धावतात..  माझा प्रत्येक दिवस असाच मावळतो यांच्या नादात. कधी कधी बिछान्यावर पडलं की  भाव अन विचार इतका गोंधळ घालतात, पेन अन कागद यायच्या आतच विरून जातात..  उलथ पालथं होवून रात्र सरून जाते. पुन्हा येतो सूर्य घेवून नवे पर्व,   पुन्हा तेच भाव,विचार अन शब्द. नाही त्यांना माज नाही गर्व  वेंधळे आहेत थोडे, पण सोबती माझे सर्व..! प्राची दुधाने  वारसा फाऊंडेशन

जागतिक पुरुष दिन !

Image
जागतिक पुरुष दिन.. आज १९ नोव्हेंबर,जागतिक पुरुष दिन ! खूपदा स्त्रियांविषयी लिहिताना पुरुषांविषयी लिहावं अस वाटायचं.पण ह्या ना त्या कारणाने राहून गेलं.आज पुरुषांसाठी खास दिवस.जागतिक पुरुष दिन ! म्हंटल आज ही भेट द्यावी,समस्त पुरुष वर्गाला.     पुरुष,जन्मापासून ते वयोवृद्ध सर्वांचा त्यात समावेश. लहान बाळाला किंवा मुलांना आपण मुलगा म्हणत असलो तरी तो पुरुषच असतो हे आपण जाणातो.      स्त्री जशी अबला,मृदू,नम्र म्हणून ओळखली जाते तसा पुरुष सबल,राकट,रागीट अशी सगळी मर्दानी,  पुल्लिंगी बिरुद त्याला लावून ओळखला जातो. स्त्रीने कसं असावं हे व्यवस्थेने सांगितला आहे.तसं पुरुषाने कस असाव हे देखील सांगायला ही व्यवस्था विसरली नाही.मुळात स्त्रियांवर पुरुष अत्याचार,अन्याय करतात,आपल्या ताकदीचा,पुरुषत्वाचा गैरफायदा घेतात.म्हणून ते वाईट किंवा चुकीचे असा समज आहे. निश्चितच काही प्रमाणात तो खरा देखील आहे.पण पुरुषांपेक्षा पुरुषीवृत्तीला जी पुरुषप्रधान,पितृसत्ताक मानसिकतेमुळे हा चुकीचा पायंडा पडला आहे त्याला दुर्लक्षित का करतो ?     मला अनेक लोक म्हणतात,तुम्ही सारख्या पितृसत्ता...

Indira Gandhi

Image
"लोक आपल कर्तव्य विसरून जातात,पण अधिकार लक्षात ठेवतात".               - इंदिरा गांधी  १९ नवेंबर १९१७ अलाहाबाद येथे नेहरू कुटुंबात इंदिराजींचा जन्म झाला.पुढे त्या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या. 'गुंगी गुड़िया',म्हणून ज्यांना संबोधल गेल होत त्याच इंदिराजींनी अनेक धाडसी निर्णय घेतले.कठोर आणि कठिन भूमिका,योद्धावृत्ती,कृतीशील,वैचारिकता,  दूरदृष्टी,देश व देशवासी यांच्या प्रति नितांत प्रेम व आदर,  तसेच विरधोकांना खुबीने नमविने अशा स्वभावाच्या इंदिराजी.आज देशाला अशा कणखर स्त्री नेतृत्वाची गरज आहे.बांग्लादेश स्वतंत्र करून भारताचा एका बाजूचा विरोध आणि आव्हान कायमचे नष्ट केले.इंदिराजी एक स्त्री असून स्वयंभू होत्या.आज ही त्या माझ्यासारख्या अनेक स्त्रियांच्या आदर्श आहेत.इंदिराजींची प्रतिमा नेहमीच डागाळण्याचा प्रयत्न केला जातो.पण एक पराक्रमी स्त्री नेत्रुत्व म्हणून त्यांच माझ्या ह्रुदययातील स्थान कायम राहील ! स्वतंत्र भारताच्या पहिल्या व एकमेव महिला पंतप्रधान इंदिराजी गांधी. आपल्या कर्तृत्वावर पोलादी स्त्री म्हणून मिळवलेला बहुमान हा प्...

ऋण..

Image
माझ्या लिखाणाला आपण उस्फूर्तपणे दिलेला प्रतिसाद व कौतुक,  माझ्यासाठी अनमोल आहे. मी आपल्या ऋणात राहील..             सदैव ! आज एक महिना पूर्ण झाला.गेल्या महिनाभर विविध विषयांवर आधारित लेख लिहून आपल्या सर्वांसमोर ते मांडत आहे.अनेक वर्षांची इच्छा होती मनातलं कागदावर उमटाव.पण काही कारणास्तव ते शक्य होत नव्हतं.लॉक डाऊनच्या काळात वेळ असून देखील शक्य झाले नाही.म्हणतात ना योग्य वेळ यावी लागते बहुदा हीच ती योग्य वेळ असावी.इथून पुढे हे सातत्य टिकवण्याचा पूर्णतः प्रयत्न निश्चित करेल.हे आधीच सांगत आहे कारण जितकी सवय तुम्हा वाचकांना लेख वाचण्याची झाली आहे तेवढीच मला ते मांडण्याची झाली आहे.वक्त्याला चांगला श्रोता आणि लेखकाला चांगला वाचक लाभणं फार आवश्यक आहे.आजच्या लेख माझ्या सर्व प्रिय वाचकांसाठी.     कागदावर उमटणाऱ्या प्रत्येक शब्दात लेखकाचा अंतर्भाव असतो.विचार,भावना या प्रत्येकामध्ये निर्मित होत असतात.पण कागदावर उमटवण्याची कला,प्रतिभा ही लेखकांमध्येच असते.लिहिणारा लिहित असतो. तो हे भाव व विचार इतरांपर्यंत पोहोचविण्याचे माध्यम असतो.लेखकाने केलेले लिखाण वाच...

कष्टाला पर्याय नाही..There is no substitute for hardship..

Image
कष्टाला पर्याय नाही.. कष्ट म्हणजे श्रम.काही मिळवायचं म्हटलं तर श्रम हे घ्यावेच लागतात.कष्टाची दोन वेळची भाकर सुद्धा पंचपक्वान्न पेक्षा समाधान देऊन जाते.तसा भारत हा कृषिप्रधान देश.म्हणून कष्टाला आणि कष्टाळू माणसांना इथं तोटा नाही.मुळात देशाची खरी ताकद ही शेतकरी कष्टकरी हेच.त्यांच्या श्रमदानामुळे कोणताही देश यशस्वीपणे उभा असतो.स्वतःचं व कुटुंबाचे पोट भरण्यासाठी जरी ही माणसं राबत असली तरी त्यांचे कष्ट हे सामाजिक स्तरावर मोठं योगदान देत असतात.शेतकरी तर जगाचा पोशिंदा,त्याबद्दल तर मला नितांत आदर आहे.त्याचबरोबर कष्ट करून नोकरी करणारे, हमाल, रिक्षा,टेम्पो,इ.चालक,साफसफाई कामगार,मजूर अशा सर्वांबद्दल आपल्याला आदर हवाच.      आज एक माझ्याबरोबर घडलेली कालचीच घटना इथे मांडत आहे.ह्या लेखाबरोबर जोडलेल चित्र तुम्ही पाहिले असेल.त्यात एक रिक्षा,रिक्षावाला व एक महिला बसलेले दिसतात.हे ह्या घटनेला अनुसरूनच आहे.मी काल सत्यशोधक प्रबोधन महासभा,महाराष्ट्र आयोजित  बळीपूजन निमित्त फुले वाड्यात निघाले होते. नेहमीप्रमाणे ऑनलाइन रिक्षा बुक केली.रिक्षात बसल्यावर लक्षात आले रिक्षावाले दादा खूपच बोलके...

भाऊ बीज

Image
भाऊ बीज  बहीण आणि भाऊ या नात्यांना एकमेकांप्रती प्रेम व्यक्त करण्यासाठी खरं तर कोणा मिथकाची आवश्यकता नाही.बहीण भावाचं नातं म्हणजे एका बीजातून अंकुरलेला अन मायेची सावली निर्माण करणारा विश्वासाचा वटवृक्ष.आपण मोठे झालो की लहानपण पुन्हा यावं ही आस आयुष्यात एकदा तरी मनाला शिवून जाते.बालपण मजेचं म्हणून ही आठवण असते असं नाही.नात्यांमध्ये स्पष्टपणा,प्रेम,मायेचा ओलावा, निस्वार्थपणा,अल्लडपणा,पारदर्शकता,रुसवे फुगवे, विसरभोळेपणा,आनंद, सुख,आपलेपणा.सगळं कस निर्मळ असत.पण मोठेपण या सगळ्याचा घात करत. मग असं वाटत मोठ झालोच कशाला.पण शेवटी निसर्ग नियम आहे.पण मोठं होताना प्रेम ही मोठं व्हावं याच गाणं लहानपणी शिकलोच नाही.पावसाला मोठं होण्यासाठी पैसा दिला की तो मोठा होतो हे शिकलो,ते धादांत खोटं असलं तरी.पण नात्यांना प्रेम,विश्वास, आपलेपणा देवून मोठं करता येत हे खरं मात्र शिकायला विसरलो.     बहीण भावाचं नातं नितळ वहाणाऱ्या झऱ्यासारख असावं.त्यात स्वार्थाचा लवलेश नसावा.बहीणभावाचं हे नातं रक्ताचं असावं असं नाही,पण ते निस्वार्थी असावं. मोठा भाऊ हा पिता समान तर मोठी ताई ही आई समान असते असं म्हणतात.टा...

बलिप्रतिपदा..बळी पुजन..

Image
बलिप्रतिपदा-बळी पुजन  "इडा पीडा टळो,बळीचे राज्य येवो"! लहानपणी हे वाक्य कानावर पडत होत,पण त्याचा अर्थ कळत नव्हता.आया-बाया दिवाळीला घरातील पुरुषांना ओवाळताना हे आवर्जून म्हणत.ह्या इडेची पीडा टळून बळीचे सुराज्य व स्वराज्य खरंच यावं,हे बळीराजा कोण होता हे वाचल्यावर समजायला लागलं.तर आज बलिप्रतिपदा त्या निमित्ताने बळीराजा विषयी जाणून घेवूया.      बळीराजा हा असुर राजा होता.हिरण्याकश्यपूचा  पणतू,प्रल्हादाचा नातू,विरोचनाचा पुत्र,बाणासुराचा पिता.बळीराजा भारतातील बहुजन समाजाचे एक महानायक,महासम्राट,महातत्ववेत्ता ! बहुजनांचा कुलस्वामी म्हणजे मूळ पुरुष,आपला पूर्वज. पराक्रमी,कर्तृत्वान,विनयशील,चारित्र्यसंपन्न,दानशूर, जाणता राजा..बळी !     बळी राजा मातृसत्ताक सिंधुसंस्कृती व कृषिप्रधान संस्कृतीचा पुरस्कृतकर्ता.बळी राजाच्या राज्यात स्त्रियांना सन्मान होता.शेती प्रति निष्ठा इतकी होती की आज देखील शेतकऱ्याला बळी राजा म्हणून संबोधलं जात.ज्याला जे पाहिजे ते देवून बळीराजा आपल्या प्रजेला संतुष्ट करत असत.असा हा बळीराजा संविभागी म्हणजे समप्रमाणे न्याय प्रदान करणारा समतावा...

दिपोत्सव निमित्त वैचारिक शुभेच्छा !

Image
दिवाळी..नरकचतुर्दशी..लक्ष्मीपूजन ! गेले दोन दिवस आपण वैचारिक दिवाळी साजरी करत आहोत.वसुबारस,धनतेरस, नरकचतुर्दशी,बलिप्रतिपदा,भाऊबीज असे हे दिवाळीचे ५ दिवस. आज नरकचतुर्दशी,लक्ष्मीपुजन आणि दिवाळी असा  तिन्हींचा दिवस.सण साजरे करताना ते का करतो हे अनेकांना माहीत नसतं.त्यावर थोडा वैचारिक प्रकाश टाकण्याचा ह्या दिवाळी निमित्त छोटा प्रयत्न.       नरकासुर..नरक+असुर..आता नेमक नरकासुर यांच्या नावावरून नरक असावा ही कल्पना सुचली की नरक ही कल्पना आधीच होती म्हणून या असुराचा नाव नरकासुर ठेवलं काही कल्पना नाही.पण आजचा दिवस हा नरकासुराला कृष्ण आणि सत्यभामा यांनी मारलं म्हणून साजरा होतो असं पुराण सांगतात.जे पुराण बळीराजा देवांच्या बाबत कसा क्रूर होता हे सांगतात.तीच पुराण बळी पुत्र बाणासुर ज्याने वामनाचा वध केला त्याच्या संगतीत राहून नरकासुर बिघडला हे सांगतात.फक्त देवांना(वैदिकांचा)विरोध केला म्हणून हे सगळे वाईट.मग मला सांगा ज्यांना आपण देव म्हणतो ते आपली सत्ता कायमस्वरूपी प्रस्थापित ठेवण्यासाठी, अहंपणा,मोठेपणा दाखवत अंतर्गत त्यांनी किती युद्ध केली.इंद्र तर जवळ जवळ सगळ्याच देवांशी वैर कर...

धनतेरस निमित्त सर्वांना वैचारिक शुभेच्छा !

Image
धनतेरस..धनत्रयोदशी ! वामनाने कपटाने बळीराजाचे राज्य व सर्वकाही त्याच्यापासून हिरावून घेतल्यानंतर बळीराजाला पाताळात धाडलं,म्हणजे मारलं.त्यानंतर बळीराजाचा पुत्र बाणासुर हा आपल्या फौजेसह वामनावर चाल करून गेला.बाणासुराच्या ह्या हल्ल्याने वामन काळजीनेच गतप्राण झाला.बळीराजाच्या मृत्यूनंतर जे धन वामनाने लुटले होते ते सर्व धनाचे मोजदाद बाणासुराने करून अश्विन वद्य त्रयोदशीला त्याची पूजा केली व त्याने वद्य चतुर्दशीस आणि वद्य अमावस्येला आपल्या सर्व सरदारांना उत्तम प्रकारचे भोजन दिले.त्यानंतर बाणासुराने आपल्या कित्येक सरदारांना योग्यतेप्रमाणे देणग्या देऊन त्यांना आपापल्या मुलखात आपल्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी हजर राहण्यासाठी हुकूम देऊन पाठवून दिले.      ह्या वरील माहितीवरून हे लक्षात येत की धनतेरस या दिवशी आपल्याकडे असलेली संपत्ती तीच मोजमापन करून योग्यरित्या तिचा विनियोग करणं गरजेचं.आपले पूर्वज हे कष्टकरी.शेतात राबून आपली उदरनिर्वाह करत.कापणीचा हंगाम झाला की त्यातून मिळणारे पिकलेल्या धान्याची मनोभावे पुजा केली जात.हे वैभव अखंड राहो यासाठी श्रद्धेने त्या प्रति कृतज्ञता व्यक्त करत....

सण..वसुबारस..वैचारिक शुभेच्छा !

Image
भारताच्या संस्कृतीत सणांना विशिष्ट महत्व आहे. त्या विषयी थोडी माहिती वाचकांसमोर मांडत आहे.भारताची मूळ संस्कृती मातृसत्ताक.याच मातृसत्ताक संस्कृतीच्या माध्यमातून कृषीची निर्मिती झाल्याचे आपणांस ठाऊक आहेच.म्हणजेच शेतीचा शोध स्त्रियांनी लावला व आपल्या सिंधू संस्कृतीच्या राज्यकर्त्या स्त्रियाच होत्या.आपले सण हे याच मातृसत्ताक,कृषिप्रधान व्यवस्थेला अनुसरून आहेत.कसे ते बघूया.        आपल्याकडे स्त्रीरूप पुजली जातात.ह्या सर्व आपल्या पूर्वज असणाऱ्या कर्तृत्ववान राज्यकर्त्या आद्यगणमाता आहेत.शंकर,कृष्ण,भैरोबा,खंडोबा, म्हसोबा,हनुमान इत्यादी आपले आद्यपुरुष अथवा पूर्वजच.पण या सर्वांचं दैवीकरण करण्यात आलं.  अर्थात ते पूजनीय आहेतच पण या दैवीकरणाच्या माध्यमातून बहुजन समाज अनावश्यक व निरर्थक अशा कर्मकांडांच्या आहारी गेला.या मुळे हजारो वर्ष गुलामगिरी स्वीकारून आपल्याच आद्य स्त्रीपुरुषांना अपमानित करण्याचे क्लेशदायक कार्य बहुजनांच्या हातून घडतं आहे.अनेक इतिहासकारांनी अभ्यासपूर्ण सत्य इतिहासाची मांडणी केलेली आहे.त्यातून बोध घेऊन अनुचित,क्लेशदायक कृतीला बांद घालून,सत्य जाणून,अनावश्यक...

जात,वर्णभेद मानवतेसाठी शाप !

Image
जात,वर्णभेद मानवतेसाठी शाप ! मानव प्राणी हा इतर प्राण्यांपेक्षा बुद्धिमान,म्हणून त्याने प्रगती केली.पण प्रगती करत असताना चांगल्या बरोबर वाईट देखील पेरत राहिला.या वाईटामध्ये सर्वात वाईट काय तर भेदाभेद.हा भेदाभेद मानवाला मानवापासून विलग करतो.जात,वर्ण,वंश,लिंग इत्यादी भेद हे मानवनिर्मित व्यवस्थेचा भक्कम पाया बनून सर्वत्र स्थिरावले आहेत.आज आपण जगाच्या पाठीवर कुठेही गेलो तरी कोणत्यातरी भेदाच्या आधारे मानव मानवापासून विलगीकरण प्रक्रियेत मग्न आहे.मानवाच्या विनाशाचे कारण मानवत बनला आहे.       पृथ्वीवर मानवता व्यतिरिक्त खरं तर कोणतीच जात,वर्ण अथवा धर्म नाही. मानवाच्या अहंपणा मुळे मानव वंश संपुष्टात येण्याच्या मार्गावर निश्चितच आहे. आपल्यात विविधता असली तरी आपण सर्व मानवच आहोत हा विचार का होऊ नये.जातिभेद हा मृगजळाप्रमाणे आहे,दुरून जीवन असल्यासारखं वाटतं पण प्रत्यक्षात मात्र जीवघेण.वर्णभेद मानवाच्या बाह्य अंगाच्या रंगाला अनुसरून केला जातो,पण प्रत्येक मानवाच्या रक्ताचा रंग लाल असतो,काळा किंवा पांढरा नाही हे मात्र विसरतो.मुळातच मानवाचे जीवन संघर्षमय असते आणि हे भेद अनावश्यक संघर्...