"ती"

"ती"

'ती'तुमच्या आयुष्यात नंदनवन फुलवते..
'ती'तुमच्यावर भरभरून प्रेम करते.. 
'ती'स्वतःपेक्षा जास्त विश्वास तुमच्यावर टाकते.. 
'ती'दुःख झेलून तुम्हाला सुख देते.. 
'ती'शिळं खाते पण तुम्हाला ताज वाढते..
'ती'सर्व काही तुमच्यासाठी सोडून येते.. 
'ती'तुमचे सगळे गुन्हे पोटात घालते.. 
'ती'तुमच्या सर्व अपराधासाठी तुम्हाला क्षमा करते..
'ती'तिचा अपमान केला तरी तुमचा सन्मान राखते..
'ती'हजार चटके घेऊन निमूटपणे तुमचा संसार करते.. 
'ती'तुमची अब्रू असते.. 
'ती'स्वतःसाठी काहीच नसते..
'ती'तुम्ही आहात तसेच तुम्हाला स्वीकारते..
'ती'स्वतः मात्र अग्नीपरीक्षा देते..
'ती'करारी असते,पण संसाराची अन संस्कारांची पायात   
      तिच्या बेडी असते..
'ती'आई-बापाला पाहुनी असते..
'ती'नवऱ्याला ही परकी भासते..
'ती'तुझ्यासाठी व्रत अन नवस करते..
'ती'तिची सगळी स्वप्न,इच्छा मात्र दाबत असते..
'ती'चेहेऱ्यावरती हसू फुलवते..
'ती'कोपऱ्यात जाऊन एकटीच रडते.. 
'ती'स्वतःच स्वतंत्र गमावून तुला स्वातंत्र्य देते..
'ती'समाजाच्या अकुंचित चौकटीत मनाविरुद्ध स्वतःला   
      बसवते..
'ती'स्वतःच आयुष्य वेचून तुला पोसते.. 
'ती'आई,बहीण,बायको,मुलगी,मैत्रीण त्याहून खूप कोणी 
     असते..
'ती'निमूटपणे सर्व सहन करते..
'ती:वाट पहाते तु तीला साथ देण्याची.. 
'ती'नजर रोखून आहे तुझ्या डोळ्यात आदराचे भाव 
     पाहण्यासाठी..
'ती'तुझ्या कौतुकाच्या दोन शब्दासाठी आहे आतुरलेली..
'ती'जग जिंकण्यासाठी आहे सज्ज..
                 पण 
'ती'तुझ्या होकाराच्या आहे प्रतीक्षेत !

'ती'ने ठरवलं तर ती निश्चितच विश्व जिंकू शकते,पण अनावश्यक रूढी,परंपरा,प्रथा,व्यवस्था तिला बांध घालत आहेत.अदृश्य बेड्यांनी तिला जखडले गेले आहे.
ती स्वतःला मुक्त करण्यासाठी झटत आहे.
ती अनेक भूमिका यशस्वीपणे पार पाडत आहे,पण स्वतःसाठी मात्र ती हतबल आहे.ह्या तिच्या मनातील काही भावना आहेत,ज्या मला व तुम्हाला साद घालत आहेत.तिचे आयुष्य बलिदान होऊ देऊ नका.
तुम्ही कोणीही असा आई-वडील,नवरा,बहिण,भाऊ,  मित्र,मैत्रीण किंव्हा ती स्वतः,तुमच्या सानिध्यात अशा रोज कणकण मरणाऱ्या "ती"ला तिच्या आयुष्यात जगण्याचा मार्ग मोकळा करून द्या.जगणं काय असतं हे तिला समजू द्या.तुमच्या आयुष्याचे गुलाम तिला बनवू नका.तिचे ऋण फेडता येईल की नाही माहीत नाही,पण त्या ओझ्याखाली तुम्ही तरी जावू नका.. 

प्राची दुधाने 
वारसा फाऊंडेशन

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

भारतीय संविधान दिन

कोरोना आणि लस - एक षडयंत्र

"बापू,देश की सेहत के लिये क्या तु हानिकारक है"??