शेतकरी..वारस बळीराजाचा !
शेतकरी..वारस बळीराजाचा !
शेतकरी तो कष्टकरी,
भाकरीवर तयाच्या विश्व तरी.
पोशिंदा जगाचा,
वारस तो बळीराजाचा.
कष्ट करूनी घाम गाळूनी,
आयुष्य त्याचे सरणी.
कधी ओला कधी सुका,
दुष्काळ आस्मानी करी फुका.
सुलतानाने कहर मांडला,
बळीराजाचा घात केला.
ओझ्याखाली दबूनी,
अमाप कष्ट उपसोनी
माझे पोट भरण्यासाठी,
स्वतः उपाशी राहीला
असा शेतकरी मी पाहिला..
पायाला पडतात भेगा
रणरणत्या उन्हात चालूनी मैल,
हक्क तयाचा मागण्या जाता
शासक तयास न सोडी सैल.
देतो तुला न्याय चोखा,
म्हणोनी त्यावर डागे पाण्याच्या तोफा.
एवढे करूनी मन हुकुमाचे न भरे,
जोडूनी जो उभा दोन्ही कर
त्या बळीस लाठी मारे.
शेतकऱ्याचा काळ होवुनी,
व्यापारी उभा ठाकला.
शासक होवू पाहे विधाता,
नसे त्यास साधी बुद्धिमत्ता.
शेतकरी टिकेल..तरच अन्न पिकेल,
हे न जाने तो खुळा.
दडपशाही ने दडपू पाहे,
नक्षली,दहशतवादी त्यास कहे.
शांततेचे प्रतीक तो आहे,
नम्रता अंगी जया वाहे.
डिवचू नको या बळीराजाला,
नांगराने तयाच्या तुझा तख्त चरचर कापत राहे.
बळीराजा तुझ माझे एकच सांगणे,
लेक तुझी ही मागे मागणे.
असता ऊन,पाऊस,वारा
पिकवितो तू आम्हास चारा.
संघर्षाचा हाच वारसा आपला,
तिथे तू नाही थकला.
सोबती तुझं आम्ही सर्व,
तू आमचा माय-बाप,
तूच आमचा गर्व.
शक्य तेथुनी लढा देऊनी,
साथ तुझी मी देईन.
वारसा बळीराजाचा अभिमानाने मिरवीन..!
प्राची दुधाने
वारसा फाऊंडेशन
Comments
Post a Comment