भाव,विचार,शब्द अन मी !
भाव,विचार,शब्द अन मी !
शब्दांवर माझं प्रभुत्व
की माझ्यावर शब्दांचं,
मला हे कोडं उमगतच नाही..
मनातील भाव अन त्यावर हे विचार,
कागदार शाईने शब्द पेरत रहातात..
कधी कधी मनाचे भाव मस्तकातील विचारांना
गांगारून सोडतात,
ह्या गोंधळात शब्द वाटेतच अडखळतात..
अनेकदा तर हे शब्द खोडसाळपणा करतात,
भाव आणि विचार यांच्या ही पुढे धावतात..
माझा प्रत्येक दिवस असाच मावळतो यांच्या नादात.
कधी कधी बिछान्यावर पडलं की
भाव अन विचार इतका गोंधळ घालतात,
पेन अन कागद यायच्या आतच विरून जातात..
उलथ पालथं होवून रात्र सरून जाते.
पुन्हा येतो सूर्य घेवून नवे पर्व,
पुन्हा तेच भाव,विचार अन शब्द.
नाही त्यांना माज नाही गर्व
वेंधळे आहेत थोडे,
पण सोबती माझे सर्व..!
प्राची दुधाने
वारसा फाऊंडेशन
छान👌
ReplyDelete❤️
Delete