Indira Gandhi
"लोक आपल कर्तव्य विसरून जातात,पण अधिकार लक्षात ठेवतात".
- इंदिरा गांधी
१९ नवेंबर १९१७ अलाहाबाद येथे नेहरू कुटुंबात इंदिराजींचा जन्म झाला.पुढे त्या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या.
'गुंगी गुड़िया',म्हणून ज्यांना संबोधल गेल होत त्याच इंदिराजींनी अनेक धाडसी निर्णय घेतले.कठोर आणि कठिन भूमिका,योद्धावृत्ती,कृतीशील,वैचारिकता, दूरदृष्टी,देश व देशवासी यांच्या प्रति नितांत प्रेम व आदर,
तसेच विरधोकांना खुबीने नमविने अशा स्वभावाच्या इंदिराजी.आज देशाला अशा कणखर स्त्री नेतृत्वाची गरज आहे.बांग्लादेश स्वतंत्र करून भारताचा एका बाजूचा विरोध आणि आव्हान कायमचे नष्ट केले.इंदिराजी एक स्त्री असून स्वयंभू होत्या.आज ही त्या माझ्यासारख्या अनेक स्त्रियांच्या आदर्श आहेत.इंदिराजींची प्रतिमा नेहमीच डागाळण्याचा प्रयत्न केला जातो.पण एक पराक्रमी स्त्री नेत्रुत्व म्हणून त्यांच माझ्या ह्रुदययातील स्थान कायम राहील !
स्वतंत्र भारताच्या पहिल्या व एकमेव महिला पंतप्रधान इंदिराजी गांधी. आपल्या कर्तृत्वावर पोलादी स्त्री म्हणून मिळवलेला बहुमान हा प्रत्येक स्त्रीसाठी एक आदर्श आहे !
इंदिराजींना जयंती निमीत्त
(१९नवेंबर २०२०)
विनम्र शिवाभिवादन !
प्राची दुधाने
वारसा फाऊंडेशन
Comments
Post a Comment