दिपोत्सव निमित्त वैचारिक शुभेच्छा !

दिवाळी..नरकचतुर्दशी..लक्ष्मीपूजन !

गेले दोन दिवस आपण वैचारिक दिवाळी साजरी करत आहोत.वसुबारस,धनतेरस,
नरकचतुर्दशी,बलिप्रतिपदा,भाऊबीज असे हे दिवाळीचे ५ दिवस.
आज नरकचतुर्दशी,लक्ष्मीपुजन आणि दिवाळी असा  तिन्हींचा दिवस.सण साजरे करताना ते का करतो हे अनेकांना माहीत नसतं.त्यावर थोडा वैचारिक प्रकाश टाकण्याचा ह्या दिवाळी निमित्त छोटा प्रयत्न.
      नरकासुर..नरक+असुर..आता नेमक नरकासुर यांच्या नावावरून नरक असावा ही कल्पना सुचली की नरक ही कल्पना आधीच होती म्हणून या असुराचा नाव नरकासुर ठेवलं काही कल्पना नाही.पण आजचा दिवस हा नरकासुराला कृष्ण आणि सत्यभामा यांनी मारलं म्हणून साजरा होतो असं पुराण सांगतात.जे पुराण बळीराजा देवांच्या बाबत कसा क्रूर होता हे सांगतात.तीच पुराण बळी पुत्र बाणासुर ज्याने वामनाचा वध केला त्याच्या संगतीत राहून नरकासुर बिघडला हे सांगतात.फक्त देवांना(वैदिकांचा)विरोध केला म्हणून हे सगळे वाईट.मग मला सांगा ज्यांना आपण देव म्हणतो ते आपली सत्ता कायमस्वरूपी प्रस्थापित ठेवण्यासाठी, अहंपणा,मोठेपणा दाखवत अंतर्गत त्यांनी किती युद्ध केली.इंद्र तर जवळ जवळ सगळ्याच देवांशी वैर करून बसला होता.हा विषय सविस्तर घेणार आहे पण पुढच्या मांडणीत.पण सांगायचं तात्पर्य देवांना सत्ता महत्वाची होती.त्यासाठी ते कोणाशी ही युद्ध करत होते.नरकासुर स्त्रियांवर अत्याचार करत होता,प्रजेवर अन्याय करत होता,म्हणून कृष्ण आणि सत्यभामा हे नरकासुराबरोबर युद्ध करायला गेले.नरकासुराला मारून त्याच्या ताब्यातील १६ हजार स्त्रियांना त्याच्या तावडीतून सोडवलं.पुढे काय झालं ? या स्त्रियांना समाजात सन्मान मिळून देण्यासाठी कृष्णाचं लग्न त्यांच्याबरोबर लावून दिल.हे मी नाही पुराण सांगतात. 
    थोडक्यात काय तर असुर वाईट आणि देव अवतार चांगले.हे पटवून देण्याचा केलेला केविलवाणा प्रयत्न.
अनेक जन मला म्हणतात देवावर विश्वास नाही मग बाकी सगळं कस पटत.हे घडलं ते घडलं वगैरे वगैरे..
बाबांनो हे सगळं मी नाही वेगवेगळ्या पुराणांमध्ये लिहिलं आहे तेच सांगण्याचा प्रयत्न करत आहे.पण हे कशासाठी केलं हे पण समजून घेतलं पाहिजे.इथे कोणा एका जातीचा द्वेष मी करत नाही तर त्यांच्यातून जी व्यवस्था निर्माण झाली ती चुकीची आहे हेच मांडायचं आहे.
कोण श्रेष्ठ या नादात मानवाने मानवाचा ऱ्यास केला व करत आहे.
    जसा बळी,बाणासुर वाईट तसाच नरकासुर वाईट ठरवला गेला.त्यांचं चारित्र्यसंपन्न सामर्थ्य चारित्र्यहीन करण्याचे प्रयत्न होत राहिले.रावण जसा स्त्रीलंपट भासवला तसाच नरकासूर केला.बाकी वाचक म्हणून आपण सुज्ञ आहात.वेळ काढून थोडी माहिती निश्चित घ्या.काही चुकलं असेल तर निश्चित सांगा.अधिक माहिती असेल तर कळवा. 
    पुढे लक्ष्मीपुजन..भारतसोडून इतर कुठं हे पुजन होत असेल तर शोधा.इतर देशांमध्ये भारतीय वास्तव्यास आहेत ते करत असतील म्हणून ते दाखले देवु नका.
लक्ष्मी म्हणजे धनाची देवी.वैभव संपन्न करून देणारी देवता.इंद्र,कुबेर हे तिच्यामुळेच धनसंपत्तीत लोळण घेतात असं पुराण म्हणतात.विष्णू प्रिया म्हणजे पत्नी अशी अनेक प्रकारे लक्ष्मीची माहिती दिली आहे. आपल्याकडे तिची पुजा केली की मगच धन प्राप्ती होते असं म्हणतात.मला वाटत भारतात कोट्यावधी लोक ही पुजा करत असतील.पण किती लोकांवर ती प्रसन्न होते ? प्रसन्न होणं म्हणजे भरभरून मिळणे.जसा इंद्र ! इतर देशात ही लक्ष्मी नाही पुजली तरी धन प्राप्ती होते.अनेक लोक लक्ष्मी पुजन करत नाहीत,त्यांना माहीत आहे कष्ट केले तरच धन मिळणार आहे.म्हणून नको त्या व्रतवैफल्यामधे वेळ घालवण्यापेक्षा मेहनत घेवून धन कमवा आणि त्याचा योग्य विनियोग करा.
    दिवाळी..दिव्यांची रांग,ओळ..आपल्याकडे दिव्याला एक विशिष्ट महत्व आहे.पूर्वी लाईटीचे दिवे नव्हते.दिवा,समयी,पणती,इ.द्वारे अंधार दूर केला जायचा.दिवा हे तेजाचे,ऊर्जेचे प्रतीक मानले गेले आहे.तिमिराकडून तेजाकडे घेऊन जाणारा दिवा हा माध्यम आहे.एक समृद्ध परंपरा ही दिव्याच्या माध्यमातून जतन होत आहे.एक छोटा दिवा मन प्रसन्न करतो.असे हे सकारात्मकतेचे प्रतीक म्हणून दिव्याचा मान व महत्व आहे.कुंभाराने घडवलेला दिवा त्यात घाण्यातील तेल किंव्हा तूप आणि कापसाची वात सामाजिक सलोखा प्रस्थापित करतात.कोणत्या दिशेला ठेवल्याने काय होत यात मला तरी तथ्य वाटत नाही. दिव्याच काम दिवा करतो आपण आपलं कार्य केलं की इच्छित फळ निश्चित मिळेल.त्यासाठी दिवा दिशादर्शक घेऊन नाचवायची गरज नाही.म्हणून बुद्धीवर पडलेली झापड झटका आणि श्रद्धेतून अंधश्रद्धा दूर करा.जे जिवीत आहे ते नाशवंत देखील आहे.आपण जन्माला आलो तसे एक दिवस मृत्यू येणारच आहे.तो येवू नये म्हणून दिवे लावण्यात काही  तथ्य नाही.इतकं लक्षात आलं तरी खुप आहे.
कोणाच्या भावना श्रद्धा दुखावणे माझा हेतू मुळीच नाही.पण श्रद्धा ही अंधश्रद्धेमधे विलीन होवू नये एवढीच अपेक्षा !

दिपोउत्सव निमित्त सर्वांना वैचारिक शुभेच्छा !

प्राची दुधाने 
वारसा फाऊंडेशन

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान दिन

कोरोना आणि लस - एक षडयंत्र

"बापू,देश की सेहत के लिये क्या तु हानिकारक है"??