तुकाराम बीज सत्य !
आज तुकाराम बीज,म्हणजे तुकाराम महाराज यांचा स्मृतिदिन ! 'आम्ही जातो आमुच्या गावा,आमचा रामराम घ्यावा'..हे असं काहीस म्हणत पुष्पक विमानात बसून तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले असं भंपक ज्ञान आयुष्यभर माथी मिरवणाऱयांसाठी खास दोन शब्द.. बहिणाबाईंचा एक दोन ओळींचा अभंग आहे, तुम्हांसी वाळीस ब्राह्मणाचे पंक्तिं । तुम्ही गुरुभक्ती नका सांगूं ॥ बहिणी म्हणें ऐसें मंबाजी बोलिला । द्वेषही मांडिला तेच क्षणीं ॥ यात मंबाजी तुकाराम महाराज हे ब्राह्मण नाहीत म्हणून त्यांना स्वतःच्या पंक्तीत बसत नसल्याचे सांगून गुरुभक्ती बाबत त्यांनी बोलू नये असं म्हंटल आहे.म्हणजे भेदाभेद, वर्चस्ववाद या जोरावर ज्ञान संपादन करण्याचा अधिकार फक्त ब्राह्मणांनाच होता हे समजतं.एवढंच नाही तर सत्य प्रबोधनातून जनसामान्यांपर्यंत पोचवणे आणि त्यांना जागृत करणे हा अक्षम्य गुन्हा होता.तरी तुकाराम महाराज ठामपणे सत्यशोधक,विज्ञानवादी,बंडखोर, विद्रोही भूमिकेतून बहुजन जनतेसमोर सत्य मांडत राहिले.हे विचार मूळ धरत होते.जे या मंबाजीसारख्या ब्राह्मणवादी लोकांना न पचणार होत. बहिणाबाई पुढे सांगतात,हे सर्व काही मंबाजीने द्व...