माझी मीच - I & Me
आजचा विषय मी,माझ्यासाठी एक भक्कम आधारस्तंभ हा असून मुळ लिहिलेला लेख इंग्रजीत आहे.पण इथं मराठी वाचक आहेत हे लक्षात घेवून इंग्रजीत काय लिहिलं आहे ते मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
आपलं कोणीच नाही.आपण एकटेच आहोत.
या व अशा भावना प्रत्येक व्यक्तीच्या मनात आयुष्यात कधी तरी घर करून बसतात.त्यामुळे नैराश्य येत.
मार्ग सुचत नाही.पण आपला आपणच मार्ग व्हायचं असत.थोडं कठीण वाटेल.पण प्रयत्न केला की जमेल.
माझी मीच
कधी कधी शब्दांना खुप अर्थ असतो,तर कधी काहीच नसतो.अशा वेळेस केवळ कृती बोलते.
एक अशी वेळ जीवनात येते की कोण आपल्यावर किती प्रेम करत हे शब्दात सांगण्याला कधी कधी अर्थ उरत नाही.कारण त्यात भावना दिसत नाही.
ते प्रेम कृतीत दाखवणं जास्त योग्य असत.
प्रेम नसेलच तर मात्र त्यातून मुक्त व्हावं..
व इतरांना ही खोट्या आशेतून मुक्त करावं...
किती तरी भावना,विचार आपण मांडून(लिहून)ठेवतो.
पण आपलं कोणी जवळ असेल आणि हे विचार जर त्याच्याबरोबर वाटून घेता आले तर ते कागदावर मांडावेच लागणार नाहीत.ती प्रेमाची व्यक्ती असेल तर इतर कशाचीच गरज भासणार नाही.
अनेकदा आपले विचार,भावना,कृती आपल्याला जगापासून दूर करतात.एकट एखाद्या अनोळखी जगात मला रहायला आवडणार नाहीच.पण,एकटेपणाची साथ ही मज्जाच देते.तरी कोणी समजून घेणार,प्रेम करणारं,
ज्याचा सांनिध्यात तुम्ही,तुम्ही असता अशी व्यक्ती बरोबर असेल तर आणखीन काय हवं ?
हो,पण एकटेपणा इतका ही वाईट नसतो.
कधी,कधी मी माझ्या त्या दुसरी मी ला मुकलेली असते,तेव्हा मी पूर्णतः हरवलेली भासते.भानावर यायला वेळ लागतो.पण ती मधली वेळ फार कठीण असते.तरी मी स्वतःला विश्वास देते,मी नेहमी तुझ्याबरोबर असेल.
मी माझे शब्द,भावना,विचार,कृती,शांतता यांच्या मागचा खरा अर्थ समजून घेईल.मी नेहमी स्वतःवर विसंबून राहू शकते.रात्रं होताच माझी सावली मला सोडून जरी गेली,तरी मी सदा चमकत राहील.
इथे मी,माझं हे शब्द अहंपणा नाहीत.ते एकमेकांचे साथी आहेत.फक्त परोपकारी..जसे आपण इतरांसाठी असतो ना तसे.मग आपण स्वतःवर का अवलंबून असू शकत नाही ?
शेवटी काय,तर मीच माझा भक्कम आधारस्तंभ.
ज्याचा मी बिनधास्त आधार घेवू शकते !
प्राची दुधाने
I & ME
Sometimes words mean a lot
but manytimes they mean nothing
Only Action Speak !
One day saying
I LOVE U
has no value at all.
Do you really mean it?
Is the Question !
So show your Love
if there is any..
Or,Let Go !
There are so many feelings
which we don't say or write.
There are few which we do note..
But don't ever share..
Wish could share them,
with the one We really Love.
So,we don't need them to be noted !
My feelings,thoughts cut
My connection to the world very often..
I don't wish to wander in the
Unknown alone !
I can enjoy My own company
though.
But to have someone who understands,
loves you unconditionally,with whom you are you and none other is needed !
Sometimes I miss that other half of Me..
There I am totally Lost !
It does take time to come back to senses.
Time is way hard then !
When I Promise Myself,
I will understand
the real saying behind Own
Words,Actions & Emotions !
I can always rely on Me..
So what if,
My Shadow leaves Me
at the End of the Day !
I will always Shine with Me
Forever & Ever !
This I & Me
may sound Egoistic.
But here they are Companion.
Just Benevolent !
If Other's can rely on Me,
Why not Me & I rely
on I & Me ?
At last,
I will always be the Pillar On
Whom I can lean and rely on !
Prachi Dudhane
👍🙂
ReplyDeleteGreat thoughts 💭