चवदार तळ्याचा सत्याग्रह
२० मार्च
चवदार तळ्याचा सत्याग्रह दिवस !
पाणी हे जीवन आहे.ह्या पाण्यावर समस्त जीवितांचा अधिकार आहे.
पण मानवी प्रवृत्ती किती खालच्या पातळीची असू शकते,हे जेव्हा समोरच्याची जात बघून घोटभर पाणी पिलं म्हणून मारहाण होते या वरून कळून येते.या वरून इथून मागे काय होत असेल याची कल्पना येते.
मानव म्हणून जन्माला आलो की काही अधिकार त्या सोबतच जन्म घेतात.जगण्याचा अधिकार सगळ्यात महत्वाचा.त्यासाठी पाणी हे अत्यावश्यक.हो,पण काहींसाठी हा पाण्याचा संघर्ष फार मोठा होता.
चवदार तळे हा महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील महाड शहरात असलेला एक तलाव आहे.येथील चवदार तळ्याचा सत्याग्रह इतिहासात प्रसिद्ध आहे.या सत्याग्रहाला महाडचा सत्याग्रह या नावानेही ओळखले जाते.तळ्याचे पाणी सर्वांसाठी खुले व्हावे व अस्पृश्यंनाही या पाण्याचा वापर करता यावा यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २० मार्च १९२७ रोजी इथं हा सत्याग्रह केला. हा लढा म्हणजे ‘समतेचे प्रतीक’ आहे.
आजच्या दिवशी मानव म्हणून आपण सर्व समान आहोत व जीवनावश्यक गरजेच्या गोष्टींवर सर्वांचा समान अधिकार आहे ही या सत्याग्रहातून शिकवण अनेकांना मिळाली आणि पाण्यासाठीचा मोठा संघर्ष निकाली लागला.
पण आज ही काही अंशी पाण्याला जात बघून विरोध करणारी मानसिकता दिसून येते.भविष्यात हा लढा पुन्हा लढावा लागू नये एवढीच आजच्या दिनी माफक अपेक्षा !
प्राची दुधाने
वारसा सोशल फाऊंडेशन
Comments
Post a Comment