ज्ञानाई सावित्रीमाई स्मृतिदिन

ज्ञानाई सावित्रीमाई.. 
स्त्री शिक्षण,सत्यशोधक समाज,प्रबोधन व प्रत्यक्ष कृतीतून सामाजिक परिवर्तन करून मानवहीत जोपासणाऱ्या सावित्रीमाई.
आयुष्यभर इतरांसाठी संघर्ष केला,संपूर्ण आयुष्य तुम्हा आम्हासाठी झिजवले.प्लेगच्या रोगाने ग्रासलेल्यांची अहोरात्र सेवा केली.शेवट पर्यंत..हो शेवट पर्यंत सावित्रीमाईने आपले उभे आयुष्य जसे समाजहितासाठी अर्पण केले,तसेच मृत्यूला देखील त्यांनी सहज कवेत घेतले.प्लेगच्या रुग्नांची सेवा करताना सावित्रीमाईंचे  प्लेगने ३ मार्च १८९७ रोजी निधन झाले.धन्य ती माता !
सावित्रीमाई होत्या म्हणून आज मी व माझ्या असंख्य माता भगिनी आपल्या कार्याचा,कर्तृत्वाचा झेंडा अभिमानाने फडकवत आहेत.अशा माझ्या या मातेला स्मृतिदिना निमित्त विनम्र शिवाभिवादन !

प्राची दुधाने 
वारसा सोशल फाऊंडेशन

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान दिन

कोरोना आणि लस - एक षडयंत्र

"बापू,देश की सेहत के लिये क्या तु हानिकारक है"??