तुकाराम बीज सत्य !

आज तुकाराम बीज,म्हणजे तुकाराम महाराज यांचा स्मृतिदिन ! 
'आम्ही जातो आमुच्या गावा,आमचा रामराम घ्यावा'..हे असं काहीस म्हणत पुष्पक विमानात बसून तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले असं भंपक ज्ञान आयुष्यभर माथी मिरवणाऱयांसाठी खास दोन शब्द..
बहिणाबाईंचा एक दोन ओळींचा अभंग आहे,

तुम्हांसी वाळीस ब्राह्मणाचे पंक्तिं ।
तुम्ही गुरुभक्ती नका सांगूं ॥

बहिणी म्हणें ऐसें मंबाजी बोलिला ।
द्वेषही मांडिला तेच क्षणीं ॥

यात मंबाजी तुकाराम महाराज हे ब्राह्मण नाहीत म्हणून त्यांना स्वतःच्या पंक्तीत बसत नसल्याचे सांगून गुरुभक्ती बाबत त्यांनी बोलू नये असं म्हंटल आहे.म्हणजे भेदाभेद, वर्चस्ववाद या जोरावर ज्ञान संपादन करण्याचा अधिकार फक्त ब्राह्मणांनाच होता हे समजतं.एवढंच नाही तर सत्य  प्रबोधनातून जनसामान्यांपर्यंत पोचवणे आणि त्यांना जागृत करणे हा अक्षम्य गुन्हा होता.तरी तुकाराम महाराज ठामपणे सत्यशोधक,विज्ञानवादी,बंडखोर, विद्रोही भूमिकेतून बहुजन जनतेसमोर सत्य मांडत राहिले.हे विचार मूळ धरत होते.जे या मंबाजीसारख्या ब्राह्मणवादी लोकांना न पचणार होत.
  बहिणाबाई पुढे सांगतात,हे सर्व काही मंबाजीने  द्वेषातून दाखवून दिले होते.ज्यांना ज्यांना वाटतं की तुकाराम महाराज यांना खरचं पुष्पक विमान वैकुंठाला घेवून जाण्यास आलं होत त्यांनी हे शक्य आहे का? असा साधा प्रश्न स्वतःला विचारून बघावा.उगाच नको त्या अफवांना देवभोळी भक्ती या नावाखाली रचून अजून किती मूर्ख बनणार आहात? आज ही मनुवादाला विरोध दर्शवणारे दाभोळकर,कलबुर्गी,पानसरे,गौरी लंकेश यांच्यासारखे मानवहीत जोपासणारे,विज्ञानवादी, सत्यशोधक,निर्भीड मत मांडणारे लोक मारले जातात..म्हणजेच,पुष्पक विमानात बसून ते ही वैकुंठाला जातात ! हो..आज जर सत्य पोचवणारी माध्यमे नसती तर यांच्या बाबत ही असच काही खोटं पसरवलं असत आणि आपण ते मान्य केलं असत.अगदी हेच तुकाराम महाराज यांच्या बाबत घडलं.तुकाराम यांचे विचार काही लोकांना न पटणारे होते.
  एक दिवस काही तरी कोलीत लावून हे माझा घात करतील हे तुकाराम महाराज म्हणत.पुढे ते खरं ठरल.
द्वेष मनात ठेवून तुकाराम महाराज यांचा घात केला आणि त्यांना मारलं.कारण तुकाराम महाराज अदृश्य झाले,सदेह वैकुंठाला गेले असा उल्लेख येतो.या वरून स्पष्ट होत की तुकाराम महाराज यांचा खून झाला होता,कारण तुकाराम महाराज यांनी अनावश्यक रूढी,परंपरा,भेदाभेद इत्यादिंना भेदून मनुवादाला छेद निर्माण करण्याचे धाडस केले होते.तुकाराम महाराज बंडखोर होते.मानवहिताच्या चळवळीतील ते कळस होते व आहेत.आज ही तुकारामांच्या विचारांना मनुवादी घाबरतात.म्हणून खोटे व चुकीचे अभंग त्यांच्या नावाने तयार करून पाठवले जातात,ते कसे दैववादी होते हे सांगण्यासाठी खोट्या चित्रांचा ही आधार घेतला जातो.आता मनुवाद हा विशिष्ट एका वर्णात नसून सगळ्यांमध्ये भिनला आहे.तो संपवण सोपं नाही. त्यासाठी पुन्हा एकदा महामानवांच्या विचारांचे मंथन होणं आवश्यक आहे.सांगण्यासारख खुप काही आहे,
पण मुख्य मुद्दा हा की ज्या तुकाराम महाराजांनी संपूर्ण आयुष्य समाजहितासाठी अर्पण केलं,प्रबोधनात्मक अभंगांच्या माध्यमातून लोकांना सत्य असत्य यातला फरक दाखवला,कर्म कांडातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला,भेदाभेद मोडीत काढले.त्याचं तुकारामांच्या मृत्यूचा संदर्भ आपण सदेह वैकुंठ,पुष्पक विमान असे तर्क वितर्क लावून त्यांना कर्म कांडात अडकवलं.
आता तरी त्यातून बाहेर पडा..
महामानव,संत यांना डोक्यावर घेण्यापेक्षा डोक्यात घ्या ! हेच खरे त्यांच्या संघर्षाला अभिवादन ठरेल..

प्राची दुधाने 
वारसा सोशल फाऊंडेशन

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान दिन

कोरोना आणि लस - एक षडयंत्र

"बापू,देश की सेहत के लिये क्या तु हानिकारक है"??