जागतिक जल दिन
२२ मार्च जागतिक जल दिन !
तिसरं महायुद्ध झालं तर ते पाण्यासाठी होईल असं म्हंटल जात.युद्ध होईल की नाही माहीत नाही,पण पाण्या वाचून आपली पृथ्वी नक्की निर्जीव होईल.आज २१ व्या शतकात मानव पाण्यासाठी संघर्ष करतोय.लाखो लोक प्रदूषित पाणी पीत आहेत.आपण वर्ण,जात,पंथ असे भेद घोटभर पाण्यासाठी करत उच्चं असल्याचा पोकळ स्वाभिमान बाळगतो.पाणी हे जीवन आहे.पाण्याला नाही म्हणू नये.असे खुप काही आपल्याला शिकवलं जात.
प्रत्यक्षात मात्र त्याच्या उलट कर्म करतो.हे हट्ट सोडा.
ती हिंदीतील कविता आहे बघा,
मछली जल की राणी हैं l
जीवन उसका पानी हैं l
हाथ लगाओ तो डर जायेगी l
बहार निकालो तो मर जायेगी l
पाणी हेच सर्वांचं जीवन आहे ! आपली गत ही त्या माशा सारखीच होईल.कारण आपण एक वेळ उपाशी राहू शकतो.पण,तहानलेले राहू शकतो का ?
विचार करा..वेळीच सावरणं गरजेचं आहे..धोक्याची घंटा वाजून खुप काळ लोटला आहे..आपण नक्की कशाची वाट बघतोय ? हिरवा निळा पृथ्वीचा रंग काळा होण्याची ? नाही ना..
एकदा सोबत दिलेली चित्र निरखून बघा.
पाणी वाचवा,पृथ्वी वाचवा !
हा संकल्प आज जागतिक जल दिन निमित्ताने करूया.
जागतिक शाश्वत विकास धेय्य६ (SDG6) स्वच्छ पाणी आणि स्वछता या मधे सहभाग घेवूया !
प्राची दुधाने
वारसा सोशल फाऊंडेशन
Comments
Post a Comment