चिऊ

'चिऊ' 

या चिऊ ताईच्या गोष्टी ऐकत लहानाचे आपण मोठे झालो.आई झाल्यावर माझ्या मुलांना ही मी गोष्टींमधून ह्या चिऊताईची ओळख करून दिली.आपण खुप साऱ्या चिमण्या पाहिल्या आणि त्यांचा भुर्रर्र..कन उडून जातानाचा आवाज अनुभवला आहे. 
पण खंत ही वाटते की इतर काही अनुभवांप्रमाणे ह्या चिऊताईच्या सहवासाचा आनंद आपल्या मुलांना घेता आला नाही.कारण ? आपणच !
वाढत प्रदूषण आणि तंत्रज्ञान या जीवांसाठी घातक ठरतं आहेत. 
कोविड सारख्या विषाणूने संपूर्ण जगाला एक संदेश दिला आहे.आपण खुप काही मिळवण्याच्या हव्यासापायी इतर जीवांच्या आयुष्याशी खेळत आहोत.आता जरा कुठं तरी थांबलं पाहिजे.जसं सक्तीनं का होईना ह्या वर्षभरात आपण नियम पाळले आणि काही अंशी चांगला बदल ही पर्यावरणाच्या बाबतीत दिसून आला. 
तर आज जागतिक चिमणी दिवसाच्या निमित्ताने थोडा बदल स्वताहून स्वीकारुया,पर्यावरणाचे रक्षण करूया आणि आपल्या चिऊला तीच अस्तित्व भेट म्हणून देऊया. 

प्राची दुधाने 
वारसा सोशल फाऊंडेशन

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान दिन

कोरोना आणि लस - एक षडयंत्र

"बापू,देश की सेहत के लिये क्या तु हानिकारक है"??