Posts

महामानवांचे दैवीकरण

संपूर्ण लेख जाणीवपूर्वक बारकाईने वाचून मगच प्रतिक्रिया द्यावी.. याला बिनडोकपणा ऐसे नाव..   महामानवांची पूजा करायची, आरत्या गायच्या, मंदिरे बांधायची आणि आपल्या कर्तृत्वशाली इतिहासाची राख रांगोळी करायची... असले हे फुकटचे धंदे करणाऱ्यांना पोकळ बांबूने झोडपून काढलं पाहिजे.    अरे आपला इतिहास काय.. आपण करतोय काय?  हो, पण या बाजारबुणग्यांकडून अपेक्षा ती काय करावी..??!!   खरतर आपल्या हर एक कर्तुत्ववान पूर्वजाचा इतिहास आपण आपल्या हीन बुद्धीने पुसला. यात आर्यांना दोष देत बसण्यात काय धन्यता मानवी, जेव्हा आपलीच गिधाडं  आपलंच मांस जिवंतपणी ओरबाडतात !   जे आद्य पिता व माता शिव पार्वती यांच्या विषयी झालं, तेच आपण छत्रपतींच्या बाबतीत करत आहोत. आर्यांनी चुकीची वाट दाखवली खरी, परंतु ती वाट चिकित्सा न करता चालत रहायची, यात कसले शहाणपण आले? या विषयी मी नेहमी सांगत आले. आज पुन्हा ही मांडणी करत आहे.       महापुरुषांचे 'दैवीकरण' : कर्तृत्व पुसण्याचे एक पद्धतशीर षडयंत्र –  आज आपल्या समाजातील एक भीषण वास्तव म्हणजे महापुरुषांच्या विचारांपेक्षा त्यांच्य...

"शब्द काहूर"

Image
"शब्द काहूर" चांद गुलाबी, मंद हवा विरह मज, भासे नवा.. ओढ प्रेमाची अशी, व्याकुळता जीवाची जशी.. मनी सोबतीची आस, अखेर शांत शब्दांसांगे प्रवास.. विरहाच्या शाईने गुंफले शब्द प्रेमाचे, रचनेतून वाहिले काहूर मनाचे.. शोधिला मैफिलीत रे विसावा, एकटीच तरी ही, कसा तुझा हा दुरावा? ओढ न सुटे तुझ्या प्रेमाची, आठवण दाटूनी येता त्या क्षणांची.. भरुनी वाहे ओंझल मज करांची, कहानी अजब अशी या नयनांची... — प्राची 

आज होळी .. म्हणजेच शिमगा..

Image
आज होळी .. म्हणजेच शिमगा..   होळी हा सण कि उत्सव? त्या विषयी नेमकी अशी माहिती द्या असे अनेकांनी सूचित केले होते.  *डॉ. अशोक राणा लिखित "सणांची सत्यकथा"* या पुस्तकातील होळी विषयी थोडी माहिती इथे देतं आहे. हे पुस्तके सर्वांनी वाचावे असा आग्रह माझा आहे. इथे संपूर्ण लेख न देता त्यातील काही भाग देतं आहे याची नोंद घ्यावी. प्रत्येकाला आपली मुळे शोधता आली पाहिजेत. त्यासाठी शोध घेता यायला पाहिजे.    उत्सवांमधून समूहभावना व्यक्त होते. तसेच बदलत्या संदर्भाचे कोंदण उत्सवाच्या स्वरूपाला नवेपण आणते. म्हणून अनेक सण-उत्सव बदलत्या सामाजिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक संदर्भातही आपले अस्तित्व टिकवून आहेत. त्यांच्या बदलत्या स्वरूपातही त्यामागील हेतू मात्र व्यक्त झाल्याशिवाय राहत नाही. होळी हा कोणत्यातरी प्रवृत्तीचा निषेध करणारा उत्सव तसेच सणही आहे. उत्सव सामूहिकपणे, तर सण हे व्यक्तिगत स्वरूपात कुटुंबात साजरे करायचे असतात. होळीच्या सणाला शिमगा म्हणूनही संबोधतात. शिमगा करणे म्हणजे निषेध करणे असा वाक् प्रयोग मराठीत आहे. शिमग्यालाच गोव्यामध्ये 'शिगमा' असेही म्हणतात.   होळीच्या सणामागी...

महिला दिन विशेष

Image
महिला दिन विशेष  आज सगळ्यांना सुट्टी होती. सकाळचा नास्ता घरातील सगळे एकत्र करणार, म्हणून 'ती' सकाळीच स्वयंपाक घरात शिरून कामाला लागली. प्रत्येकाची वेगळी फर्माईश होती. एकदाचे सगळे टेबलावर एकत्र जमले. तोच वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या. विषय वाढता वाढता इतका वाढला कि घरासाठी आपण किती करतो हे प्रत्येक जन मोठमोठ्या आवाजात सिद्ध करू लागला. 'ती' मात्र सर्व शांतपणे न्याहाळत प्रत्येकासाठी बनवलेला पदार्थ समोर वाढत होती. मिश्किल हसत आता बास, खाऊन घ्या म्हणतं तीन सगळे पदार्थ थोडे थोडे आपल्या ताटात वाढून घेतले.      काही समजलं का? आज जागतिक महिला दिन साजरा करतं आहोत ना !?      जगातील महिलांची स्थिती काय आहे हे सर्वश्रुत आहे. तिला आज ही मानव म्हणून आपलं स्थान मिळवण्यासाठी, स्वतःला सिद्ध करण्यासाठी किंबहुना जगण्यासाठी संघर्ष करावा लागतं आहे. तरी ही असंख्य 'ती' हा लढा घरापासून ते समाजामध्ये अनेक क्षेत्रात कार्य करतं असताना धीरानं लढत आहेत. त्यांचा हा लढा मानसिक खच्चीकरणाद्वारे अधिक होतो. विनाकारण स्पर्धा व द्वेष करणाऱ्या इतर महिला, ती स्त्री आहे म्हणून तिच्याकडे वासनां...

मंथन

Image
मंथन  कोणी ही कोणत्या ही स्त्री बाबत आक्षेपाहार्य विधान करण्यावर माझा नेहमीच विरोध असतो. याचा अर्थ कोणी टीकाच करू नये असं नाही. परंतु, आपल्या भाषेचा वापर आपले संस्कार दर्शवतं असतात हे तितकंच महत्वाचे. अनेकांना मी स्त्रीवादी वगेरे वाटते. अर्थात स्त्रीवादी असणं किंवा कोणी तसं आपल्याला म्हणणं अजिबात चुकीचं वाटत नाही. हो पण मी एकांगी स्त्रीवादी निश्चितच नाही ! ते baised म्हणतात ना, म्हणजे पक्षपाती वगेरे मी नाही. मी पूर्वग्रहदूषित तर अजिबात नाही. म्हणून जिथे जे व ज्याचे चूक त्याला विरोधच असतो. तसंच, स्त्रियांच्या बाबत ही काही सत्य आपण स्त्रियांनी स्वीकारायला पाहिजे. पुरुषीसत्ता आपण किती वाहून घ्यायची याची मर्यादा आपल्याला कधी समजलीच नाही. आपली प्रत्येक बाब या पुरुषांवर अवलंबून ठेवायची. का? असा प्रश्न कधी आपल्याला सतावत नाही का? जगात एकटं कोणी काहीच करतं नाही. माणूस म्हंटल की एकमेकांची मदत, आधार वगेरे असतोतच. किंबहुना ते असावंच. परंतु, त्यासाठी किती झुकतं माप घ्यावं, याला मर्यादा का नसावी? पण इथे पण  बघाना लिहिताना "माणूस" असं लिहिलं आहे मी. माणूस हा पुरुष लिंगीच शब्द आहे ना? मग इथ...

कोरोना आणि लस - एक षडयंत्र

Image
कोरोना आणि लस - एक षडयंत्र  काही महिन्यांपूर्वी माझ्या परिचयातील एका डॉक्टरांनी (रिसर्च) माझ्यासोबत चर्चा करताना कोव्हीडला अनुसरून अनेक विषयांचा खुलासा केला होता.  त्यांनी भविष्यामध्ये येणाऱ्या संकटांविषयी सांगितलं होत. आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत चिंता त्यांनी व्यक्त केली होती. अनेक प्रकारचे आजार बळावतील, असं ही म्हणाले होते. त्यामधे कॅन्सर, हार्ट अटॅक, ब्रेन स्ट्रोक, रक्ताच्या गुठुळ्या होणं या सारखे अनेक आजार अधिक तिव्र स्वरूपाचे असतील. कॅन्सरचे तर कोरोनासारखे variation's दिसतील ! म्हणजे, वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्सरचे धोके वाढतील असं स्पष्ट केलं.    या मधे 12 वर्षावरील मुला मुलींना ही कोव्हीड लस टोचवण्याचा हलकटपणा केला गेला. यामुळे लहानमुलांना ही या संभव्य धोक्यांना सामोरं जावं लागेल. मुली महिला पिशवीच्या आजाराने (कॅन्सर) अधिक त्रस्त होतील. येणाऱ्या पुढच्या पिढ्यांचे ही भवितव्य या मुळे धोक्यात आहे. यापेक्षा अधिक काय नुकसान कोरोनाच्या आड या हरामी लोकांनी करायचं राहिलं आहे सांगा?    1) घोड्यावाल्याला सरकार लस बनवायला देवूनच कशी शकते?  2) कोणती ही लस माण...

ज्योतिबा

Image
आज ११ एप्रिल,  क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती/जन्मोत्सव 🙏🚩   ज्योतिबा आज तुम्ही समोर असता तर प्रत्यक्ष तुमच्यासमोर मी  व्यक्त झाले असते. तरी, आपल्याला स्मरून व्यक्त होते.    दिवसागणिक ज्योतिबा तुमचे विचार व कार्य मेंदू आणिक मनात दृढ होत आहेत. भरकटलेल्या समाजाला योग्य दिशा दाखवून प्रगतीच्या पथावर घेवून येण्याचे अशक्य प्रयत्न आपण पूर्वत्वाला घेवून गेलात. आता त्यातून तुमचे पाईक म्हणून अनेकांनी आपले सवते सुभे मांडले आहेत. आम्ही कसे फुल्यांचे वैचारिक वारस आहोत हे सिद्ध करण्यासाठी स्पर्धा सुरु आहे. असं असलं तरी तुमचे विचार मात्र त्यांच्या कृतीतून केव्हाच हद्दपार झाले आहेत.    ज्योतिबा तुम्ही आम्हा बहुजन वंचितांना बोटाला धरून शाळेत घेवून गेलात. अक्षर ओळख शिकता शिकता कधी मानव म्हणून आमची ओळख होवू लागली समजलंच नाही. थोडी बहुत समाजात आमची विचारणा होवू लागली. घराचा उंबरठा ओलांडून गगनभरारी घेवू लागलों. ज्योतिबा तुम्ही तुमच्या सावित्रीबरोबर कोट्यवधी सावित्रीच्या लेकींचे अस्तित्व निर्माण केले.  खोट्या व अनावश्यक रूढी परंपरेच्या भया...

छत्रपती शिवाजी महाराज स्मृतिदिन

Image
ज्यांनी आपल्या आई-वडिलांच्या मार्गदर्शनाने नवा इतिहास रचला. गुलामीत खितपत पडलेल्या, जीवनात शोषणचं वाट्याला आलेल्या बहुजनांना आपले स्वतःचे राज्य-रयतेचे राज्य, म्हणजेच स्वराज्य हे संघर्षातून निर्माण केले व बहाल केलं. असे स्वराज्य निर्माते, अद्वितीय व्यक्तिमत्व छत्रपती शिवाजी महाराज.    स्वराज्य मिळवण्यासाठी जो संघर्ष, जे बलिदान जिवंतपणी शिवरायांना द्यावे लागले, तेच स्वप्न त्यांच्या मृत्यूचे ही कारक बनले. आपल्या या राजाच्या कर्तृत्वशाली इतिहासात अनेक शूरवीर, वीरांगना, अठरापगड जाती, बारा बलुतेदार सर्व मावळे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभागी होते. म्हणूनच हा राजा रयतेचा राजा होता आणि राहिलं.    परंतु, खेदाची बाब की, राज्याच्या अस्तनींत स्वराज्यद्रोही, घातकी, फितूर, द्वेषी, कटकारस्थानी बांडगुळ भट आणि स्वकीय निखारे होते. त्यांनी अचूक वेळ साधली आणि घात केला. स्वराज्य पोरकं झालं.  आजचाच तो काळा दिवस. इतिहासाच्या पानातील हृदय पिळवटून टाकणारी, कधी ही कानी पडू नये अशी घटना.  ज्याच्या जीवनाची गाथा वाचून नियती ही ढाय मोकलून रडली असेल. लाख मेले तरी चालतील, लाखांचा पोशिंदा जगला ...

भय

Image
भय  भय हा जीवितांचा शत्रू समजला जातो. भय/भीती आपल्याला बुद्धीहीन करते. भय निर्माण करून मूठभर स्वयंकेंद्रित, सत्ता पिपासूं, स्वतःला समाजाचे ठेकेदार समजणारे, असंवेदनशील नराधम समाजाचे विविधांगाने शोषण करतात. आपल्यामधे भीती अनेक प्रकारची असू शकते. यातील एक भीती आपल्याला कायमचे गुलाम बनवते. एक भीती नवा मार्ग निर्माण करण्यापूर्वीची असते.      आज चोहीकडे जी अंधाधुंदी सुरु आहे त्यामुळे मला प्रचंड भीती वाटते.. होय ! मला भीती वाटते. नकारात्मक दबावाला थोपवून धरण्याचे आपले प्रयत्न कमी पडत आहेत. याची सतत जाणिव होते. हतबल व्हायला होत. कुठे आणि कोणा कोणाला तोंड द्यायचं? हताश निराश होवून स्तब्ध होतो.. तेव्हा माझी मुलं समोर दिसतात. आपल्या आईच्या तालमीत वाढत, भविष्याला आत्मविश्वासाने गवसणी घालण्यासाठी सज्ज आहेत. त्यांच्याकडे बघून भीतीच्या बेड्या आपसूकच गळून पडतात. आपल्याकडे बघून येणारी पिढी लढण्यास सज्ज आहे. तर इतक्यात मला हार मानता येणार नाही. पुन्हा नव्या उमेदीने उभारी घेत भरारी घेते. मनात भीती असते. परंतु नवनिर्मितीचे भय इतिहास घडवू शकते ! या एका विचाराने घेतलेल्या भरारीत अधिक बळ न...

भारतीय संविधान दिन

Image
२६ नोव्हेंबर भारतीय संविधान दिन ! भारताला स्वातंत्र्य मिळाल्या नंतर देशाने एक नवी उभारी घेणं आवश्यक होत. भारत हा विविधतेने नटलेला देश आहे.त्याचे स्वतंत्र राज्यकारभार असणं आवश्यक होतेच,पण ते पूर्णतः इंग्रजांच्या पॉलिसीवर केंद्रित नसावं अशी भारतीयांची धारणा होती.पण तरी ही ब्रिटिशांच्या माध्यमातून आपले स्वतंत्र संविधान असाव ज्याने भारताला स्वातंत्र्य होण्यास व नंतर उपयोग होईल या विचाराने स्वातंत्र्या आधीच संविधान सभेची/समितीची स्थापना करण्यात आली होती. ६ डिसेंबर १९४६ रोजी संविधान सभा स्थापन  करण्यात आली व ९ डिसेंबरला पहिली बैठक सभेने घेतली होती.सुरुवातीला एकूण ३८९ सदस्य होते. नंतर जून १९४७ मधे ही संख्या घटत गेली व २९९ इतकी झाली.१९४७ मध्ये भारताला ब्रिटीशांकडून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर,संविधान सभेने भारताची पहिली संसद म्हणूनही काम केले आहे.     संविधान सभेचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र प्रसाद व उपाध्यक्ष हरेंद्र कुमार मुखर्जी होते.जवाहरलाल नेहरू यांनी वस्तुनिष्ठ ठराव घटनेची मूलभूत तत्त्वे मांडली. जी नंतर घटनेची प्रस्तावना ठरली.हा वस्तुनिष्ठ ठराव सर्वानुमते स्वीकारला गेला.मसुदा समिती ...

दोन शब्द आईसाठी 🤱💞

Image
दोन शब्द आईसाठी 🤱💞 माझ्यासारख्या निराकाराला आकार दिला.  परिव्यापक होण्याचे सामर्थ्य अंगी पेरले. आपला भरभक्क्म संघर्षाचा वारसा बहाल केला.  आई (विजया थोरात) या आपल्या माय माऊलीचा आज जन्मदिवस ! आई आपल्या मुलांचा उत्कर्ष व सुख पाहून जो आनंद जे समाधान व जीवनाचं सार्थक म्हणून अनुभवते तो परमोच्च असतो. आज पर्यंत ही अनुभूतू तुझ्या उदरी जन्म घेवून तुला देवू शकले की नाही माहीत नाही. परंतु आजच्या तुझ्या या जन्मदिनी हे सुख तु तुझ्या डोळ्यांनी पहात व हृदयाने अनुभवत राहशील हा विश्वास तुला देते. लेकरांच्या काळजीने तुझ्या हृदयाचे पिळवटून जाने मी समजू शकते. आई आहेस, किती ही झालं तरी काळजी सुटणार नाही याची खात्री आहे.  "तुझ्या काळजाच्या त्या काळजीतील वेदनेला मात्र विराम देईन तुझं निखळ हसणं आणि चेहऱ्यावर आनंद टिकून ठेवण्यासाठी गरज भासली तर नभाला ही झुकविणं  तु फक्त पाठीवर मायेचा हात फिरवत रहा आई,   या विश्वातील सर्वात मौल्यवान असा ऐवज तुझ्या मुलांचं सुख तुझ्या हृदयात साठविणं !" तु माझ्यावर करतेच त्याची तुलना होवू शकतं नाही, तरी तितकंच तुला प्रेम 😘🌹♥️🥰 जन्मदिनी उदंड व आरोग...

गणेशोत्सव

Image
गणेशोत्सव  भारताच्या प्राचीन सिंधू संस्कृतीचे आध्य दांपत्या शिव-पार्वती. शिव-पार्वती यांच्या गणांचा अधिपती गणपती.. बुद्धिमान व कर्तव्यनिष्ठ ! सिंधूजणांचे राज्य,म्हणजेच रयतेचे,गणांचे राज्य-गणराज्य !  भारताचे हे गणराज्य अखंड राहो,यासाठी मुळ स्वरूपातील गणपती स्वीकारून त्याप्रमाणे बुद्धिमान व कर्तव्यनिष्ठ होवून, मानवहित जोपासण्यास जागृत होण्यासाठी आपणा सर्वांना गणेश/गणपती उत्सवानिमित्त सदिच्छा !  सोबत छायाचित्र दिल आहे ते, मानवी मस्तक असलेल्या रूपात गणपतीची मूर्ती आहे. ही मूर्ती असलेले मंदिर,तामिळनाडूमध्ये कुथनूरपासूनजवळ तिलतर्पणपुरी जवळ आहे. असे अनेक गण आपल्याला नेमून दिलेल्या घटकांचे नेतृत्व करीत. जसे सेनापती, राष्ट्रपती, सभापती तसेच गणपती..  - प्राची दुधाने  वारसा सोशल फाऊंडेशन

"माझा मताधिकार, माझे स्वातंत्र्य"

Image
"माझा मताधिकार, माझे स्वातंत्र्य" सध्या पहावं तिकडे  "आम्ही मतदान करणारं नाही" या भूमिका घेतल्या जात आहेत.  नेत्यांवर, राज्यकर्त्यांवर, राजकारणावर त्यांच्या नीतीवर, व्यवस्थेवर रोष दाखवणं ठीक आहे. पण मतदान करणारं नाही हे म्हणणं कितपत योग्य आहे? आपला देश स्वतंत्र झाल्यानंतर भारतीय म्हणून मतदानाचा अधिकार सर्व भारतीयांना मिळाला. खरतर मतदान नसून तो आपला अधिकार आहे. या देशाचे राज्य, इथली घटना सर्व काही to the people, for the people, by the people आहे. म्हणजेच, इथल्या लोकांनी, लोकांसाठी बहाल केलेलं आपले राज्य व घटना आहे. हे स्वराज्य आहे. स्वातंत्र्य मिळून अधिकार प्राप्त होणं ही साधी सुधी बाब नाही. आपल्या लाखो पूर्वजांच्या रक्ताचे पाट या मातीत वाहिले आहेत. जे स्वातंत्र्य अधिकाराने आपण उपभोगत आहोत ते त्यांच्या संघर्ष व बलिदानाचे द्योतक आहे. आपल्या स्वातंत्र्याला पारतंत्र्यत जाण्यावाचून न रोखू शकणारे आपण, कोणत्या अधिकाराने त्यांनी बहाल केलेला वारसा नाकारत आहोत? त्यांना आपल्या मताप्रमाणे वागता येवू न येवू. पण आपल्या लेकरा बाळांना कोणाची गुलामी नको म्हणून स्वतःच्या चामडीच्या पा...

स्वातंत्र्य

Image
स्वातंत्र्य  भारताला व इथल्या प्रत्येक सजीवाला परकीयांच्या गुलामीतून मुक्त करण्यासाठी जो संघर्ष सर करून आपल्या पूर्वजांनी आपले रुधिर या मातीत वाहिले. त्यांच्या प्रत्येक बलिदानाची  मला जाणिव आहे.  मला जे स्वातंत्र्य त्यांनी बहाल केलं आहे त्याचा मी सन्मान करते. त्यांच्या खांद्यावर उभं राहून स्वातंत्र्याची जी उंच भरारी घेत आहे त्यासाठी मी त्यांची सदैव ऋणी आहे. तसेच, मी भारतीय आहे याचा मला अभिमान आहे. परंतु दिखाव्याचे राष्ट्रप्रेम, स्वातंत्र्याचा फुगीर अभिमान आणि या सर्वांचा इव्हेंट मला करता येत नाही.  किंबहुना मला करायचा नाही..  माझ्या स्वातंत्र्याच्या पाऊलखुणा प्रत्येक कृतीतून मला मागे ठेवून जायच्या आहेत. पुढची पिढी हाच मुक्त स्वातंत्र्याचा वारसा पुढे घेवून जाईल व आपली खरी संस्कृती जतन करतील. स्वातंत्र्य मिळवणे म्हणजे स्वैराचार नव्हे !  स्वातंत्र्याची परिभाषा सरळ जरी असली तरी त्याला कृतीत बांधण्याची जी व्यवस्था मानवाने निर्माण केली आहे ती जटील आहे. मानवाचे मानवासोबत मानवतेचे आचरण,  नाही गुलामी कोणास कोणाची, हाच स्वातंत्र्याचा खरा पाया असावा. स्वतः मुक्तप...

माझ्यात ही एक बुद्ध दडला आहे

Image
माझ्यात ही एक बुद्ध दडला आहे  जो त्या तथागताने अचूक हेरला आहे  दुःखावर तो धम्म गिरवतो  करुणेची जो बाग फुलवतो  जीवन मृत्यू सुसंगती घडवतो  खडतर वाट संघर्षाची हसत सर करतो  मानव कल्याणाचे मुक्त विहार होतो  प्रेमाचा विश्व संदेश रुजवितो  त्यागातून मम द्वीप उजळतो  एक गौतम माझ्यात ही विसावतो  व्यवस्थे विरुद्ध जो बंड पुकारतो  सय्यम,शांततेचा विद्रोह घडवतो  माझ्यातील असा बुद्ध तथागत तो  वैचारिक कृतिशीलतेने इथल्या मातीत पेरतो   तुमच्यातील हा बुद्ध कुठे दडतो ?  शोध त्याच्या घेण्या,बघा आज बुद्ध उगवतो ! ( बुद्ध पौर्णिमा(जयंती) निमित्त लिहिलेली ही कविता 🙏 ) - प्राची  फोटो क्रेडिट - जान्हवी  (गव्हर्नमेंट म्युझियम चेन्नई)  

आज का वास्तव

Image
*आज का वास्तव*  बहरा राजा अंध जनता,  विकास यहाँ नही मिलता,  सिर्फ सेठ का काला धंदा चलता, लाचार हर दर रहता,  कौन राम कौन रहीम  यह सिक्का चलता,  जले-मरे-कटे कोई किसे फ़रक हैं पडता, अपने सर हो ताज  और हात मे सत्ता,  बाकी भाड़ में जाये जनता.. -प्राची        

देशाला आज भगत सिंग हवाय

Image
आपल्या देशासाठी हसत हसत आपले बलिदान देणाऱ्या वीर क्रांतिकारी तरुण शहीद भगत सिंग यांचा आज जन्मदिवस ! त्यानिमिताने माझे दोन शब्द..   अवघ्या २३ वर्षाचा अल्प असा जीवनकाळ,परंतु कार्य असे की कायम स्मरणात राहिलं.आपल्या देशाला,  भारताला स्वातंत्र्य मिळावं यासाठी अगणित देशवासीयांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. वय,लिंग,जात,धर्म,प्रांत,भाषा या अशा भेदांच्या पलीकडे जावून एकसंध होवून इथल्या जन माणसांनी लढा उभारला,संघर्ष केला,आपले रुधिर या मातीत याच मातीतील माणसांना गुलामीतून मुक्त करण्यासाठी सांडले आहे.तेव्हा हे स्वातंत्र्य मिळाले ! इतकं सहज सोपं मिळालेलं नाही हे स्वातंत्र्य.आज आपण सहजपणे या स्वातंत्र्याचा स्वैराचारासाठी उपयोग करत आहोत.   लक्षात घ्या,तेव्हा ज्या वयात भगत सिंग सारखे तरुण तरुणी देशभक्ती खातर प्राणांची बाजी लावत होते,विखुरलेला देश सावरत होते.आज त्याचं वयाचे बहुतांशी तरुण तरुणी स्वतःला ही सावरू शकतं नाहीत. वर्तमानात भगत सिंगांचा आदर्श घेणारे तरुण तरुणी नक्की कोणत्या विचारांवर चालत आहेत,याची पुष्टी करणं आवश्यक आहे.भगत सिंग यांचे दोन विरोधी प्रतीक आज आपल्याला समाजात पहा...

आनंदी रक्षाबंधन

Image
आनंदी रक्षाबंधन  रक्षाबंधन हा सण बहीण भावाचं नातं दृढ करणारा सण,असं सांगितले जात. परंतु रक्षा ही फक्त भाऊ बहिणीची करतो हा समज कितपत योग्य आहे?    पहिला रक्षा करते आई.गर्भधारणेपासून जीवात जीव आहे तोवर डोळ्यांत तेल घालून आपली काळजी घेते.  बाबा ही यात कुठें कमी नाही.कुठें ही असले तरी लक्ष त्यांचे तुम्हावर राही.छोटी असो वा मोठी ताई असते आपली दुसरी आई.आई बाबांच्या ओरड्यापासून ते कोणत्या ही बाबतीत आपल्या रक्षणासाठी सज्ज असते.  ताई फक्त माझी दुसरा वाटेकरू नाही असा सज्जड दम भरून,लवकर लग्न करून जा म्हणतो खरा पण जरा वेळ दिसली नाही की जीव कासावीस होतो असा भाऊ. मोठा असेल तर बापाची माया ही तो लावी.  आज्जी आजोबांसाठी तर आपण सर्व दुधावरची साय.  त्यांची माया काय कधी आटत नाही.अशी अनेक नाती आपली तत्पर असतात नेहमी आपल्या रक्षणा खातर.    हो पण नात्याच्या ही पलीकडील किती तरी नाती आपल्या कळत नं कळत आपलं रक्षण करतं असतात आपल्याला माहिती ही नसतं.सजीव निर्जीव अनेक व्यक्ती वस्तूंचा समावेश यामधे असतो.बांदापासून सीमेपर्यंत शेतकऱ्यापासून सैनिका पर्यंत. डॉक्टर,साफसफाई काम...

पेटवू क्रांतीची मशाल

Image
९ ऑगस्ट..क्रांती दिन ! करा नाही तर मरा..करो या मरो.. Do or Die..लढेंगे या मरेंगे..भारत छोडो ! होय,याच घोषणा १९४२ साली ऑगस्ट महिन्यात संपूर्ण देशभर बोलल्या जात होत्या व ऐकू येत होत्या.  भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा उठाव १८५७ ला सुरु झाला.त्या नंतर पहिल्यांदा इतक्या मोठ्या प्रमाणात पुन्हा एकदा स्वातंत्र्य संग्राम ऑगस्ट क्रांती दिनी उभा राहीला. ९ ऑगस्ट १९४२ या दिवशी भारतासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिलेल्या सर्व क्रांतीकारकांना  अभिवादन करून देशाच्या स्वातंत्र्यासाठी "करो या मरो" ची भूमिका घेत इंग्रजांना भारत सोडण्याच्या आव्हानाचे रणशिंग भारतीयांनी फुंकले.    राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी मुंबई येथे भरवण्यात आलेल्या ९ ऑगस्ट १९४२ च्या काँग्रेस अधिवेशनात ब्रिटिशांना "भारत छोडोचे" आव्हानं केले.तसेच देशाला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी,पारतंत्र्यातून स्वातंत्र्य मिळवण्याकरिता सर्व देशवासियांना "करो या मरो" चा मंत्र ही दिला.गांधीजींचे हे आव्हानं संपूर्ण देशभर वेगाने पसरले.काँग्रेसच्या या आदिवेशनात गांधिजींसह,नेहरू,  पटेल,आझाद आदी नेते यांची उपस्थिती व भाषणे ही...

मंगळसूत्र तत्वज्ञान

Image
सकाळ सकाळ तत्वज्ञान वगेरे..😇🤭   काल मी अमृता फडणवीस यांची एक पोस्ट केली होती. त्यातील जोडलेला फोटो या पोस्टबरोबर पुन्हा जोडत आहे.मी म्हणाले होते,हे माझं सगळ्यात आवडत व्यक्तिमत्व.किती आत्मविश्वास आहे या व्यक्तीमधे.  आपल्याला वाटेल ते मांडून(गदारोळ झाला तरी)ही व्यक्ती मात्र निवांत असते.या मंगळसूत्राचा विषयच घ्या ना.किती सहज भारताची रूढी,परंपरा,संस्कार वगेरे वगेरे धुडकावून आपलं मतं,भावना व्यक्त केल्या.   या संदर्भातील काही प्रतिक्रिया वाचनात आल्या.ही बाई मंगळसूत्राबाबत बोलते ते कस चुकीच आहे हे सांगण्यात बरेच लोक पुढे सरसावले.तिची नेहमीप्रमाणे अक्कल ही काढून झाली.मंगळसूत्र या अलंकाराचा महत्व सांगण्यात  बाया तर बाया बापे ही मागे नव्हते.पण खरं सांगू का कधी कधी अमृता फडणवीस खरं बोलून जातात.हां आता ते मांडण्याची पद्धत थोडी विचित्र असते.परंतु त्यातून आपल्याला धडा मात्र मोठा शिकायला मिळतो.  या मंगळसूत्र पुराणाचेच घ्या ना.कसं ते थोडक्यात सांगते.    जे लोक पिढ्यानंपिढ्या तुम्हा आम्हाला या रूढी,  परंपरा,संस्कृतीचे डोस पाजत आले आहेत ते स्वतः मात्र प्रत्यक्षात...