देशाला आज भगत सिंग हवाय

आपल्या देशासाठी हसत हसत आपले बलिदान देणाऱ्या
वीर क्रांतिकारी तरुण शहीद भगत सिंग यांचा आज जन्मदिवस ! त्यानिमिताने माझे दोन शब्द..
  अवघ्या २३ वर्षाचा अल्प असा जीवनकाळ,परंतु कार्य असे की कायम स्मरणात राहिलं.आपल्या देशाला,  भारताला स्वातंत्र्य मिळावं यासाठी अगणित देशवासीयांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे.
वय,लिंग,जात,धर्म,प्रांत,भाषा या अशा भेदांच्या पलीकडे
जावून एकसंध होवून इथल्या जन माणसांनी लढा उभारला,संघर्ष केला,आपले रुधिर या मातीत याच मातीतील माणसांना गुलामीतून मुक्त करण्यासाठी सांडले आहे.तेव्हा हे स्वातंत्र्य मिळाले ! इतकं सहज सोपं मिळालेलं नाही हे स्वातंत्र्य.आज आपण सहजपणे या स्वातंत्र्याचा स्वैराचारासाठी उपयोग करत आहोत.
  लक्षात घ्या,तेव्हा ज्या वयात भगत सिंग सारखे तरुण तरुणी देशभक्ती खातर प्राणांची बाजी लावत होते,विखुरलेला देश सावरत होते.आज त्याचं वयाचे बहुतांशी तरुण तरुणी स्वतःला ही सावरू शकतं नाहीत. वर्तमानात भगत सिंगांचा आदर्श घेणारे तरुण तरुणी नक्की कोणत्या विचारांवर चालत आहेत,याची पुष्टी करणं आवश्यक आहे.भगत सिंग यांचे दोन विरोधी प्रतीक आज आपल्याला समाजात पहायला मिळतात. याचे प्रमुख कारणं वैचारिक भेसळ ! भगत सिंग हिंदुत्ववादी होते.गांधी,काँग्रेस विरोधी होते.त्यांनी हिंसेचा मार्ग आवलंबला होता.असं खुप काही नकारात्मक जाळ त्यांच्या भवती विणल्या गेलं आहे.मुळात स्वार्थापायी सनातनी मनुवादी संघी मानसिकता यात पुरेपूर हात धुवून घेते हे वास्तव आज समोर आलं आहे.भगत सिंग सारखे देशभक्त कोणत्या जाती-धर्माचे कसे असू शकतात? मुळात भगत सिंग यांनी आपल्या अखेरच्या काही वर्षांमध्ये देवच नाकारला होता.तो नास्तिक म्हणून जगला आणि नास्तिक म्हणूनच देशासाठी फासावर गेला.हे आज ओरडून सांगावं लागतं आहे.असं ही भगत सिंग म्हणाला होताच "If the deaf are to hear the sound has to be very  loud" म्हणजे,बहिऱ्यांना जर आवाज ऐकायचा असेल तर तो खुप जोरात पाहिजे.असच काहीस आजच्या आपल्या समाजात बाबत ही घडतं आहे.परंतु आपण किती ही ओरडून सांगितले तरी सध्याची बुद्धीने बहिरी जमात याकडे ऐकून दुर्लक्ष करते.
या करिता भगत सिंग यांचे "Why I am an Atheist" "मी नास्तिक का आहे" पत्र संग्रह असलेले पुस्तकं जरूर वाचा.
  त्यातील काही पत्रातील संदर्भ इथे देत आहे.पंजाब मधील विद्यार्थी परिषदेत सहभागी होणाऱ्या तरुणांसाठी बटुकेश्वर दत्त व भगत सिंग यांनी मिळून दिलेला संदेश होता.या पत्राची तारीख १९ ऑक्टोबर १९२९.काही ओळींचे हे पत्र.परंतु त्यातील आशय अतिशय प्रेरणादायी आहे.ते म्हणतात,
आज आपण तरुणांना पिस्तूल आणि बॉम्ब बाळगण्यास सांगू शकत नाही.आज,विद्यार्थ्यांना खूप महत्त्वाच्या असाइनमेंटचा सामना करावा लागतो.येत्या लाहोर अधिवेशनात काँग्रेस देशाच्या स्वातंत्र्यासाठी तीव्र लढ्याची हाक देणार आहे.राष्ट्राच्या इतिहासातील या कठीण काळात तरुणांना मोठा भार सहन करावा लागणार आहे.स्वातंत्र्यलढ्याच्या अग्रस्थानी विद्यार्थ्यांनी मृत्यूला तोंड दिले हे खरे आहे.या वेळी त्यांचा तोच कणखरपणा आणि आत्मविश्वास सिद्ध करण्यात ते मागेपुढे पाहतील का? तरुणांना हा क्रांतिकारी संदेश देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवावा लागेल.त्यांना औद्योगिक क्षेत्रातील कोट्यवधी झोपडपट्टीवासीयांचे आणि जीर्ण झालेल्या झोपडयांमध्ये राहणाऱ्या ग्रामस्थांचे प्रबोधन करावे लागेल,जेणेकरून आपण स्वतंत्र होऊ आणि माणसाकडून माणसाचे होणारे शोषण अशक्य होईल.पंजाब हा राजकीयदृष्ट्या मागासलेला मानला जातो(इथे पंजाबचा उल्लेख पत्रात आहे तसाच घेतला आहे).ही जबाबदारीही तरुणांची आहे.शहीद यतींद्रनाथ दास यांच्यापासून प्रेरणा घेऊन आणि देशाप्रती असीम श्रद्धेने त्यांनी हे सिद्ध केले पाहिजे की,स्वातंत्र्याच्या या लढ्यात ते दृढ निश्चयाने लढू शकतात.
  मला सांगा आज सुद्धा हा संदेश तरुणच नाही तर सर्वांनाच लागू होतो की नाही.हे सांगणारे भगत सिंग आपण केव्हा शोधणार? ते केव्हा समजून घेणार?
  अशी अनेक पत्र भगत सिंग यांनी लिहिलेली  आपल्याला उपलब्ध आहेत.यात त्यांच्या विडिलांना म्हणजे सरदार किशन सिंग यांना लिहिलेलं एक पत्र आहे."मी माझा बचाव करणार नाही".
असं भगत सिंग त्यात ठामपणे सांगतात.
४ ऑक्टोबर १९३० रोजी लिहिले हे पत्र आहे.जेव्हा त्यांना कळले की साउंडरच्या मृत्यूप्रकरणी सरदार किशन सिंग त्यांना निर्दोष सिद्ध करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या वडिलांनी लाहोर कट प्रकरणाच्या न्यायाधिकरणाकडे लेखी विनंती केली होती की भगतसिंग यांना निर्दोषत्व सिद्ध करण्याची संधी द्यावी.
आपल्या वडिलांच्या या भूमिकेमुळे भगत सिंग कष्टी व काही से क्रोधीत झाले होते.भगत सिंग आपल्या विचारांचे पक्के होते."क्रांतीचे शब्द विचारांच्या दगडावर धारदार होतात"हे भगत सिंगचे शब्द त्यांचे विचार व त्यातून होणारी कृती समजून घेण्यास मदत करतात.
   आज भगत सिंग यांच्या विचारांची भारताला गरज आहे.माणसं मरतात,मारली जातात.पण त्यांचे विचार समाजात निरंतर वाहत असतात.या निरंतर वैचारिक प्रवाहातून हे कृतिशील विचार आत्मसात करणं हे आपलं कर्तव्य आहे.देशप्रेम,देशहित जोपासणं आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे.नुसते अधिकार घेवून होत नाही.
त्या सोबत आलेले कर्तव्य पार पाडण्याची आज आवश्यकता आहे.याकरिता देशासाठी शहीद झालेल्या या वीरांचे आदर्श घ्या.इतकेच या निमिताने सांगू इच्छिते.

   जन्मदिनाच्या अनेक सदिच्छा कॉम्रेड ❤️🌹🚩
     इन्कलाब जिंदाबाद 🚩

प्राची दुधाने 
वारसा सोशल फाऊंडेशन

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान दिन

कोरोना आणि लस - एक षडयंत्र

"बापू,देश की सेहत के लिये क्या तु हानिकारक है"??