महिला दिन विशेष
महिला दिन विशेष
आज सगळ्यांना सुट्टी होती. सकाळचा नास्ता घरातील सगळे एकत्र करणार, म्हणून 'ती' सकाळीच स्वयंपाक घरात शिरून कामाला लागली. प्रत्येकाची वेगळी फर्माईश होती. एकदाचे सगळे टेबलावर एकत्र जमले. तोच वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या. विषय वाढता वाढता इतका वाढला कि घरासाठी आपण किती करतो हे प्रत्येक जन मोठमोठ्या आवाजात सिद्ध करू लागला. 'ती' मात्र सर्व शांतपणे न्याहाळत प्रत्येकासाठी बनवलेला पदार्थ समोर वाढत होती. मिश्किल हसत आता बास, खाऊन घ्या म्हणतं तीन सगळे पदार्थ थोडे थोडे आपल्या ताटात वाढून घेतले.
काही समजलं का? आज जागतिक महिला दिन साजरा करतं आहोत ना !?
जगातील महिलांची स्थिती काय आहे हे सर्वश्रुत आहे. तिला आज ही मानव म्हणून आपलं स्थान मिळवण्यासाठी, स्वतःला सिद्ध करण्यासाठी किंबहुना जगण्यासाठी संघर्ष करावा लागतं आहे. तरी ही असंख्य 'ती' हा लढा घरापासून ते समाजामध्ये अनेक क्षेत्रात कार्य करतं असताना धीरानं लढत आहेत. त्यांचा हा लढा मानसिक खच्चीकरणाद्वारे अधिक होतो. विनाकारण स्पर्धा व द्वेष करणाऱ्या इतर महिला, ती स्त्री आहे म्हणून तिच्याकडे वासनांध दृष्टीनं पहाणारे पुरुष, घरदार-मुलांचं संगोपन करून देखील तिला हिणवणारे घरचे व नातेवाईक, तिच्या चारित्र्यावर संशय घेणारा जोडीदार.. असे एक ना अनेक मानसिक घावं ती रोज झेलत असते. या सर्वांना विरोध करतं असताना ती परंपरा, संस्कार, संस्कृती, महत्वाचं म्हणजे पुरुषसत्ताक व्यवस्थेला शह देतं असते. ते ही न डगमगता. तिला खच्ची करण्यासाठी अनेक उपाय योजना आखल्या जातात. तरी ती थांबत नाही. याचे शल्य किती बरं असेल या संस्कृतीच्या ठेकेदारांना.
एखाद्याला आधार देता येत नसेल, तर विनाकारण विरोध ही करू नये. परंतु, हे नसमजणारी जमातचं आपल्याकडे अधिक आहे. हे प्रमाण जोवर कमी होत नाही, तोवर महिला दिन साजरा करने निव्वळ थोतांड होईल. जे कोणी दिल और दिमाग से या खऱ्या परिवर्तनासाठी कटिबद्ध आहेत त्यांना सलाम 🙏
येणारा भविष्यकाळ समतेचा असेल अशी अपेक्षा करू.
संघर्ष सर करतं, आपल्या अस्तित्वासाठी लढा देतं, चेहेऱ्यावर सदैव हस्य असणाऱ्या सर्व आया-बहिणी व मैत्रिणींना महिला दिनाच्या खुप खुप सदिच्छा 🌹❤️🙏
तसेच, या संघर्षमय लढ्यामध्ये निस्वार्थीपणे साथ देणाऱ्या सर्व बाप-भाऊ व मित्र लोक आपले आभार 🙏🌹
-प्राची
Comments
Post a Comment