छत्रपती शिवाजी महाराज स्मृतिदिन
ज्यांनी आपल्या आई-वडिलांच्या मार्गदर्शनाने नवा इतिहास रचला. गुलामीत खितपत पडलेल्या, जीवनात शोषणचं वाट्याला आलेल्या बहुजनांना आपले स्वतःचे राज्य-रयतेचे राज्य, म्हणजेच स्वराज्य हे संघर्षातून निर्माण केले व बहाल केलं. असे स्वराज्य निर्माते, अद्वितीय व्यक्तिमत्व छत्रपती शिवाजी महाराज.
स्वराज्य मिळवण्यासाठी जो संघर्ष, जे बलिदान जिवंतपणी शिवरायांना द्यावे लागले, तेच स्वप्न त्यांच्या मृत्यूचे ही कारक बनले. आपल्या या राजाच्या कर्तृत्वशाली इतिहासात अनेक शूरवीर, वीरांगना, अठरापगड जाती, बारा बलुतेदार सर्व मावळे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभागी होते. म्हणूनच हा राजा रयतेचा राजा होता आणि राहिलं.
परंतु, खेदाची बाब की, राज्याच्या अस्तनींत
स्वराज्यद्रोही, घातकी, फितूर, द्वेषी, कटकारस्थानी बांडगुळ भट आणि स्वकीय निखारे होते. त्यांनी अचूक वेळ साधली आणि घात केला. स्वराज्य पोरकं झालं.
आजचाच तो काळा दिवस. इतिहासाच्या पानातील हृदय पिळवटून टाकणारी, कधी ही कानी पडू नये अशी घटना.
ज्याच्या जीवनाची गाथा वाचून नियती ही ढाय मोकलून रडली असेल. लाख मेले तरी चालतील, लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. असा स्वराज्याचा पोशिंदा, लोककल्याणकारी, रजतेच्या राजाचा आज स्मृतिदिन ! 🙏🌼
राजे आपण आज ही आमच्या हृदयाच्या मेघडंबरीत विराजमान आहात. आपल्या सत्य इतिहासातून प्रेरणा घेवून, ते विचार मस्तकावर नाही तर मस्तकात घेवून, कृतिशील राहू. भारताचे गणराज्य म्हणजेच स्वराज्य अबाधित राखू.. हिचं आज आपल्या स्मृतिदिनी प्रतिज्ञा 🙏🚩
आपली वैचारिक कृतिशील
लेक प्राची
Comments
Post a Comment