प्रश्न हेच उत्तर नेहमीप्रमाणे आई मनीला महामानवांबद्दल माहिती सांगत होती. बोलता बोलता आई सांगू लागली.. (आई आणि मनी यांचा संवाद) आई-आपण चिकित्सक असावं मनी-का ? आई-कारण चिकित्सेने प्रश्न पडतात मनी-कसले प्रश्न ? आई-कोणती ही अडचण समोर असेल तर त्यातून बाहेर पडण्यासाठी जे आपल्याला उत्तर देतात ते प्रश्न मनी-अन जर उत्तर मिळालच नाही तर ? आई-मग तर बेस्ट.. मनी-कसं ? आई-उत्तर प्रश्नाला प्रश्नच मिळालं तर ते बुद्धीच लक्षण मनी-त्यानी काय होईल ? आई-परिवर्तन मनी-कोणाचं ? आई-ज्याला प्रश्न पडतात त्याचं,त्याच्या कुटुंबाचं आणि संपूर्ण समाजाचं मनी-एवढे प्रश्न कोणाला बर पडले असतील ? आई-अग बुद्धांपासून,तुकाराम महाराज,जिजाऊ,शिवराय,शंभू राजे, फुले,शाहू,आंबेडकर,अहिल्या अशा अनेक महामानवांना,समाजसुधारक,विचारवंत,वीर,वीरांगना यांना असे प्रश्न पडले मनी-त्याने काय परिवर्तन झालं ? आई-लोक शिकले-सवरले,भेदा-भेद कमी झाले अन मानवहिताची कार्य घडली मनी-मला जमेल हे परिवर्तन करायला ? आई-(आई कौतुकाने मनीकडे भरलेल...
Comments
Post a Comment