बालपण !
मला पुन्हा एकदा बालपण जगायचं आहे.. मोठं होवून चंद्रावर जायचं ! हे स्वप्न पुन्हा गिरवायचा आहे.. आई-वडिलांच्या राज्यातील बालपण मोठे झालो की राहून राहून आठवत.लहान असताना कधी एकदा मोठे होतोय असं वाटत असतं.पण खरंच मोठेपण अंगी चढल की ते बालपण सुखदायी असल्याचे जाणवू लागतं. आई-वडील राजाराणी आणि आपण त्यांचे राजकुमार राजकुमारी.त्यांच संपूर्ण विश्व आपल्या भोवती फिरत असत.ते लाड,हट्ट पुरवणं संपुच नये असं वाटतं. आई-बाबा आहेत तोपर्यंत आपल्याला काही होणार नाही हा विश्वास किती मोठा असतो.तो शब्दात कधीच मांडता येत नाही. आपलं बालपण तर्कवितर्क यांना भेदून एका वेगळ्याच विश्वात भ्रमण करत असतं.आपण चंद्राला मामा समजू लागतो.त्याच्याशी एक वेगळेच आपलेपणाचा घट्ट नातं निर्माण होतं.अंधार पडला की त्याची वाट बघू लागतो.तो दिसला की आनंद गगनात मावेनासा होतो.आपल्या ह्या गमतीशीर मामाला कधी भेटायचं हा प्रश्न एक कोडंच बनून राहतो.कधी रुसून फुगून बसतो,चंद्रावर जायचा हट्ट धरतो.मग आपली समजूत काढली जाते.पण हे चंद्रावर जायचे स्वप्न गिरवता गिरवता आपण कधी मोठे होतो कळतच नाही.आपण बालपणीच्या आठवणीत गेलो की अशा गमतीशीर गोष्...