थकवा
थकवा
तन अन मनाच्या
अतिरिक्त ओझाने जीव हा शीणला,
बघता बघता जीवाला
थकवा किती जाहला.
घंटा दोन विसावा घेतला,
तरी जीवाला तवाका न आला.
थकव्याला ही असे पत मोठी,
जीवन प्रवासाची सांगतो कथा छोटी.
शौर्य अन धैर्य जयाच्या अंगी,
थकवा जाणवे तयाच्या ही पंखी.
समजून घेता जनाला,
येई थकवा मनाला.
नका करू व्यर्थ ऊर्जा खर्च,
कोणासाठी होता..जाणा तुम्ही मूर्ख.
थकव्या मनाला जमे समेट करणे,
आव्हान तुझ्या मनाला..
शांततेत समेटीतील जखम भरणे.
झटकून शीण मनाचा,
गंज मालव थकव्याचा.
हाच एक मार्ग सुटकेचा,
थकव्याच्या मृगजळातून शांतपणे निसटण्याचा..
प्राची दुधाने
वारसा सोशल फाऊंडेशन
Comments
Post a Comment