आत्मबल

प्रत्येक जन्माला आलेल्या जीवाची काही स्वप्न असतात. ती अस्तित्वात उतरवण्यासाठी ते प्रयत्नांची पराकाष्टा गाठत असतात.अशाच संघर्ष व अपयश या कात्रीत अडकलेल्या अनेकांसाठी हेतुपर प्रेरणा.

आयुष्यात खुप मोठी झेप घ्यायची आहे. 
पंख भरारी घ्यायला सज्ज आहेत. 
आता आकाशाला गवसणी घालणार,
तेवढ्यात ते पंख छाटले जातात !
आपले पंख छाटल्या गेलेत हे काही क्षण कळत देखील नाही.आणि पुढच्या क्षणी ती झेप अयशस्वी होते.
आपण दणकन खाली कोसळतो..आपली अवस्था बघून आपणच रडवेले होतो.हुंदके देत आलेल्या परिस्थितीला सावरण्याचा प्रयत्न करतो.मन जरा शांत झालं की नेत्रांमधून वहाणाऱ्या आसवांच्या अंधुक नजरेतून आपलेच हात आपसूक आपलेच आश्रू पुसताना दिसतात.तेव्हा लक्षात येत,अरे माझ्याकडे पंजे आहेत की ! उडता आलं नाही म्हणून काय झालं.पळता तर येईल ! मी पुन्हा प्रयत्न करेल..
एक दिवस पुन्हा भरारी देखील घेईल..कारण माझा आत्मविश्वास प्रबळ आहे.
(I Can and We Can)..मी किंवा आम्ही हे करू शकतो या शब्दातील जादू काही औरच आहे.
अनुभवून बघा !

प्राची दुधाने
वारसा सोशल फाऊंडेशन

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान दिन

कोरोना आणि लस - एक षडयंत्र

"बापू,देश की सेहत के लिये क्या तु हानिकारक है"??