जिजाऊ

जय जिजाऊ 👏🚩

  १२ जानेवारी 
जिजाऊ जन्मोत्सव 

              ॥ जिजाऊ ॥

काय वर्णावी आई जिजाऊ तुझी महती,
तव चरणी नतमस्तक सृष्टी सारी ।
खरा धर्म तूच दाविला,
स्वराज्याचे रक्षक आम्ही,तरी तो आम्हा तारी ॥ 
तूच आमचा अभिमान,तूच तो स्वाभिमान,
ऊरात भरून आमच्या घेते उंच भरारी ।
काय माघू नी काय देवू मी तुजला,
अवघा नभ कवश्ल्ये उतरविला तू मज दारी ॥
धन्य मी जाहले पावन भूमी मज लाभली,
तुझेच रूप आई चरा चरी ।
संस्कार व शौर्य तव शिव-शंभूस लाभले,
दे आशीष कीर्तीवंत घडो मज उदरी ॥

जिजाऊ चरणी अर्पण 🚩👏

प्राची दुधाने 
वारसा सोशल फाऊंडेशन

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान दिन

कोरोना आणि लस - एक षडयंत्र

"बापू,देश की सेहत के लिये क्या तु हानिकारक है"??