ज्ञानाई सावित्रीमाई फुले..

३ जानेवारी ज्ञानाई सावित्रीमाई फुले यांचा जन्मोत्सव !
ह्या मातेच्या कार्याविषयी थोडक्यात जाणून घेऊ..

३  जानेवारी १८३१ साली सातारा येथील नायगावात सावित्रीबाईंचा जन्म झाला.त्यांच्या वडीलांचे नाव खंडोजी नेवसे व आईचे लक्ष्मीबाई होते.वयाच्या ९ व्या वर्षी सावित्रीबाईं यांचा विवाह ज्योतिबा फुले यांच्याबरोबर झाला.शिक्षणाची आवड व समाजसुधारक विचार असलेले ज्योतिबा फुले यांनी समाजातील अनावश्यक रुढी परंपरांना फाटा देवून सावित्रीबाईंना लग्नानंतर शिक्षण दिले व त्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका आणि मुख्याध्यापक बनल्या.
१ जानेवारी १८४८ ला पुण्यातील भिडेवाड्यामधे पहिली मुलींची शाळा सुरू केली.एतद्देशीय व्यक्तीने काढलेली ही पहिलीच मुलींची शाळा होती.शाळा सुरू करतावेळी केवळ ६ मुली होत्या,ती संख्या वर्षांखेर ४०-४५ पर्यंत पोहोचली होती.
ह्या घटनेचा धस्का जणू सनातनी लोकांनी घेतला व सावित्रीबाईंचा छळ सुरू केला.येताजाता अंगावर शेण व गोटे यांचा मारा करू लागले.एवढ्यावरच हे उन्मत्त थांबले नाहीत,तर खालच्या पातळीचे भाष्य ही करू लागले.ह्या सगळ्या प्रसंगांना न घाबरता व न डगमगाता सावित्रीबाईची शिक्षणप्रसाराची ज्योत तेवत राहिली. शिक्षणाबरोबरच स्त्री सन्मान,हक्क यासाठी ही सावित्रीबाईंनी प्रयत्न केले.अनावश्यक रुढी परंपरांचा समाचार घेत स्त्रियांना सन्मानाने जगतात यावे यासाठी प्रबोधन केले.बाला-जरठ विवाह प्रथा बंद करण्यासाठी, आत्याचारीत गरोधर विधवा महिला यांच्या मुलांना जन्म देता यावा यासाठी बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले.
ह्याच गृहांमधे जन्मलेल्या काशीबाई ह्या महिलेच्या मुलाला महात्मा फुले व सावित्रीबाईंनी दत्तक घेतले व त्याचे नाव यशवंत ठेवले.
केशवपन बंद करण्यासाठी नाभिक समाजाचा प्रबोधनाद्वारे संप,पुनर्विवाहाचा कायदा व्हावा यासाठी प्रयत्न.असे अनेक कार्य सावित्रीबाईं व महात्मा फुले यांनी पार पाडली.सत्यशोधक समाजाचे कार्य त्यांनी समर्थपणे पार पाडले.पोटासाठी शरीरविक्रेय करणाऱ्या महिलांना सावित्रीबाईंनी सत्यशोधक कुटुंबात आश्रय दिले.
साहित्याच्या माध्यमातून सावित्रीबाईंनी आपले विचार समाजापर्यंत पोहोचवले.त्यांची काही भाषणे ही प्रकाशित करण्यात आली आहेत. 
१८९६-९७ साली पुण्यात प्लेगची साथ पसरली. सावित्रीबाईंचे दत्तक पुत्र डॉक्टर यशवंत यांच्या सहाय्याने पुण्यामधे त्यांनी प्लेगच्या रुग्णांची सेवा केली.आपल्या जिवाची परवा न करता रुग्णांची सेवा करत असताना प्लेगची लागण सावित्रीबाईंना झाली व त्यामधेच १० मार्च १८९७ मधे ह्या माऊलीचे निधन झाले.
महात्मा फुले यांच्या प्रत्येक समाजसुधारक व परिवर्तनशील कार्यात बरोबरीने व उम्मेदीने साथ देणाऱ्या ह्या मातेला त्रिवार शिवाभिवाद्न !
सावित्रीबाईंनी शेवटच्या श्वासापर्यंत जोपासलेले सामाजिक हित त्यांच्या कृतितून दिसून येते.सावित्रीबाईं कार्यरूपाने सदैव आपल्या हृदयात अमर रहातील हे सत्य..
आपण केलेले परिवर्तनशील कार्य अखंड तेवत रहाण्यासाठी मी सदैव कटिबद्ध राहिल हिच आपल्या प्रति शिवांजली !!!
सावित्रीबाईंनी त्या काळी शिक्षणाचा वसा घेतला म्हणून आम्ही शिकू शकलो.आजच्या दिवशी माझ माझ्या सर्व आया-बहिणी-लेकिंना विनंती,आपल्याला मिळत असलेले शैक्षणिक स्वातंत्र्य गमावून बसू नका. शिका,आपली प्रगल्भता वृद्धिंग्त करा आणि सावित्रीमाईने घेतलेला वसा आपण चालू ठेवा.ज्यामुळे पुढची पीढ़ी बुद्धिमान,कर्तव्यदक्ष,स्त्रीदाक्षिण्य दाखवणारी व मात्रुसत्ताक शासनाचे अंकुर फुलवणारी असेल असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
विष्णु लक्ष्मीचा धावा करण्यापेक्षा ज्योती सावित्रीच्या कार्याचे अनुकरण करा.आयुष्य सार्थ होईल !
ll जय क्रांतीज्योती ll

प्राची दुधाने 
वारसा सोशल फाउंडेशन

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

भारतीय संविधान दिन

कोरोना आणि लस - एक षडयंत्र

"बापू,देश की सेहत के लिये क्या तु हानिकारक है"??