एकीचे बळ सर्वश्रेष्ठ !
एक दिवस चढाओढ लागली,
चंद्र,सूर्य,तारे अन नभाची.
कोण श्रेष्ठ ? तु की मी ?
बाचाबाची या सर्व भावंडांची !
सूर्य म्हणे तेजस्वी मी,
उजळून देतो दाही दिशा.
माझ्या शिवाय आहेच कोण,
उलगडण्या उषा अन निशा ?
चंद्रही पुढे सरसावला..
म्हणे शितल माझी काया,
यापुढे न चाले तुझी माया.
तप्त किरणे करी लाह्या लाह्या,
त्याला औषध माझी मंद छाया.
तारे हसले..म्हणे तुमचे कार्य कसले ?
आम्ही लाखो-कोटी,
तुमची शोभा खोटी.
मधेच नभ गरजले,
तुम्ही सारे उगाच सजले.
तुम्हा सर्वांना माझ्यामुळे स्थान,
वाटेल तेव्हा घालतो सर्वांना स्नान.
आड माझ्या लपती सारे,
काय सूर्य,चंद्र आणिक तारे..
दुरून हे सारं पाहून निसर्ग हसला,
कसली बात तुम्ही घेऊन बसला ?
हळू हळू तो सांगू लागला,
नसे कोणी श्रेष्ठ,
असेल जरी जेष्ठ.
एकीचे बळ हेच सर्व श्रेष्ठ...!
प्राची दुधाने
वारसा सोशल फाऊंडेशन
Picture credit_मीच..
तो चंद्र भासला,तरी सूर्य आहे..
👍👌
ReplyDelete