Posts

रक्षाबंधन

Image
माझे,माझ्या कुटुंबियांचे,समाजाचे, राष्ट्राचे,मानवतेचे या वसुंधरेचे रक्षण करणाऱ्या सर्व भगिनी व बांधव यांना रक्षाबंधनाच्या शिवमय शुभेच्छा ! रक्षाबंधन हा केवळ बहीण-भाऊ यांचे नातं दर्शवणारा सण का असावा? प्रत्येक नात्यातील निर्माण होणारा विश्वास दृढ करणारा हा सण का नसावा?  त्या अनुषंगाने आपण सर्वांनी हा सण साजरा का करू नये ?.. लिंग भेद,स्त्री पुरुष समानता-असमानता यासारखे विषय या व अशा असंख्य अनावश्यक रूढी,परंपरा व संस्कृतीच्या नावाखाली पिढ्यानंपिढ्या साजरे होणाऱ्या सणांना आपणच जाणते-अजाणतेपणे खतपाणी घालत  आहोत.बहिणीचं रक्षण करणारा भाऊ असतो..हे विचार आपण लहानपणापासुन मुलांवर बिंबवत रहातो. म्हणजेच,स्त्री/मुलगी ही स्वतःच रक्षण करण्यास असक्षम आहे हे शिकवायचं आणि तिने आयुष्यभर आवलंबून रहायचं..तसंच मुलाने आयुष्यभर जबाबदारीच्या ओझ्याखाली रहायचं,आपण पुरुष आहोत आणि स्त्रीचे  रक्षणकर्ता आपणच या भ्रमात आयुष्य जगायचं. खोट्या आणि चुकीच्या रूढींमुळे ना स्त्री मुक्त आयुष्य जगू शकते ना पुरुष ! स्त्री सतत परावलंबी व पुरुष सदैव वर्चस्ववादी,पण दोघे ही संस्कृतीच्या ओझ्याखाली दबलेले..मग नातं कोणत...

"क्रांतिसिंह"

Image
३ऑगस्ट..क्रांतिसिंह नाना पाटील या क्रांतिसूर्याची जयंती !🚩👏🏻 लहानपणापासून त्यांच्या विषयी खूप ऐकलं आणि वाचल होत.त्यांचा तो रांगडेपणा,करारीपणाचा,आधी स्वातंत्र्यसाठी क्रांती आणि नंतर समाजसुधारक म्हणून स्वतःच उभ आयुष्य झोकून दिलेले, सत्यशोधक, प्रयत्नशील,परिवर्तनकारी,रूबाबदार,गांधीवादी व स्वतःचे विचार असलेले,उच्च विचारसरणी व साधी रहानी असे क्रांतिसिंह नाना पाटील. सतत नवचैतन्य व नवविचार निर्माण करणार व्यक्तिमत्व,तसेच मातीशी असणार नात घट्ट असलेले.  आज देश स्वातंत्र्य होवून ७० वर्ष पूर्ण झालेले असताना देखील आपण मानसिक गुलामगीरी व वैचारिक पारतंत्र्यातून अजून बाहेर पडू शकलो नाही याची खंत वाटते.आज देशाला नानांच्या पुरोगामी कृतिशील विचारसरणीची अवश्यकता आहे. नानांचे वारसदार सर्वपरीने नानांचे विचार समाजा पर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करत आहेत.पण,आपण सर्वांनी नानांचे चरित्र अभ्यासून त्यांचे विचार,आचार हे सुधारित समाजाचे व खर्या अर्थाने स्वतंत्र भारत देशाची निर्मिती करण्यास आचरणांत आणणे गरजेचे आहे.प्रस्थापित विध्वंसक प्रवृत्तीला मुळापासून उपटून नष्ट करण्यासाठी प्रत्येक घरात नानांचे विचार पोहोचणं ह...

गुरु पौर्णिमा

Image
गुरु पौर्णिमा  गुरु..शब्द छोटा असला तरी,या शब्दाची व्याप्ती फार मोठी आहे.जो आपल्याला त्यांनी संपादन केलेले सर्व ज्ञान त्याबदल्यात कोणतीही अपेक्षा न ठेवता दान करतो आणि अज्ञानाकडून ज्ञानाचा मार्ग दाखवतो तोच खरा गुरु जाणावा.चुकीचे ज्ञान देणारी व्यक्ती गुरु असूच शकत नाही.पण,चुकीचे कर्म करून तुम्हाचा सतत छळ करणारी व्यक्ती देखील तुमचा गुरु असू शकते हे मान्य करण्यास हरकत नाही.इथे,जर त्यांच्या चुकीच्या कृतीला तुम्ही विरोध केलात,बंड पुकारलात,विद्रोह केलात, सकारात्मकतेकडे एक पाऊल टाकलं,आपल्यात शुद्ध परिवर्तन केलंत तरचं आपण त्या कुव्यक्तीला गुरु म्हणू शकतो.खरं तर इथे आपणच आपले गुरु होत असतो,कारण वाईट ओळखून त्याला विरोध करणं हे सर्वस्वी आपल्या हाती आहे.असे असले तरी माझ्या मते आपल्याला कमीपणा आणणारे,अपमानित करणारे,आपल्याशी विनाकारण स्पर्धा करणारे,इत्यादी सर्व आपले गुरु होवू शकतात.बरं हे कोणी ही असू शकतात.ओळखी-अनोळखी,आप्तेष्ठ,  मित्र-शत्रू,कोणी ही.हे आपले आदर्श गुरु असतात.हे आपल्याला आयुष्यात काय करू नये हा धडा देतात, त्याचबरोबर अनन्यसाधारण असे काही करून दाखवण्याचे बळ आपल्यात निर्माण करतात....

वटसावित्री

Image
सत्यवानाची सावित्री आणि ज्योतिबाची सावित्री माझ्या दृष्टीने दोन्ही बुद्धिवादी.त्यांच्यामध्ये तुलना होणे नाही.एका स्त्रीला महान ठरवताना दुसऱ्या स्त्रीला अपमानित व्हावं लागतं असेल तर ते मला मान्य नाही.सत्यवानाच्या सावित्रीने मला वड पुजायला सांगितला नाही किंव्हा असलं कोणतं व्रत ही सांगून गेली नाही.तिच्या कथेतून मी सकारात्मक,बुद्धीला पटेल तेच आत्मसात करेल. मी दोन्ही सावित्रीची वैचारिक कृतिशीलतेची कास धरून हे मानव जीवन सार्थकी लावण्याचा प्रयत्न करेल. अनावश्यक रूढी परंपरा छेदून माझं अस्तित्व मी निर्माण करेल.परिवर्तनाचा मार्ग सर करताना मानवहित,समाजहित जोपासेल.माझ्या कुटुंबीयांची सर्वोत्परीने काळजी मी घेईल.माझ्या मुलीला व मुलाला मी बुद्धिप्रामाण्यवादी असे संस्कार देईल व वैचारिक कृतिशीलतेचा परिवर्तनाकडे घेवून जाणारा वारसा वृद्धिंगत करेल. आयुष्याच्या पानावर ऊन,वारा,पाऊस,वादळ असो वा निरभ्र,शांत,मोकळे आकाश,माझ्या जोडीदाराचा हात घट्ट धरून सगळे ऋतू आनंदाने सर करेल. वडाला दोर बांधून नवऱ्याचं आयुष्य दीर्घ व्हावं म्हणून वडाला विनवण्या करण्यापेक्षा,मिळालेलं आयुष्य त्याच्याबरोबर आनंदाने,प्रेमाने व आरोग्य...

पाऊस

Image
येरे येरे पावसा  म्हणत सरलं बालपण,  नभावर स्वार होता  आले कधी शहाणंपण ! त्यात विरहाची धग मनी विझवेना एक ही सरी,  वाढता वाढता वाढे वयाची पायरी साडे-माडे,  तरी पावसाचे फुटता पोट विसरे छत्री आणिक कोट,  चिंब भिजणं बरसणाऱ्या सरीत जणू काही हिचं आमची रीत,  येता पाऊसकळा सुरु आमची उनाडशाळा,  बसरणाऱ्या धारा  सोबत मंद वाहे वारा,   त्यात चिंब भिजून जरा  मोहरे मनाचा हर एक कोपरा.. प्राची दुधाने  वारसा सोशल फाऊंडेशन  Pic credit:Not Me..Google..

छत्रपती शंभूराजे

Image
आज दि.१४ मे  स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव दिन    अवघे ३२ वर्ष आयुष्य लाभलेले सूर्याहून ही तेजस्वी.... छत्रपती शिवाजी महाराज यांचे सर्वांगाने शोभतील असे उत्तराधिकारी,एकपत्नि,भूमिपुत्रांच्या ह्क्कासाठी लढणारे,लोकराजे,सत्यप्रिय,न्यायप्रिय,धर्मनिरपेक्ष, रणझुंजार,कर्तव्यदक्ष,उत्तम साहित्यिक,कुशल नेत्रुत्व,निर्भीड व अचूक निर्णय क्षमता,कर्तुत्वसंपन्न, शूर,पराक्रमी,राजनीतिज्ञ, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩    जगातील सर्वोत्तम पुत्र,पती,शासक,राजा ही ओळख आपल्या विचार व कृतीतून निर्माण करणारे शंभूराजे.   शंभूराजे लहान असतानाच,आई सईबाई यांचे निधन झाले.धाराऊ या दूध आईच्या दुधावर ते मोठे झाले. जिजाऊंनी जसं शिवरायांना वाढवले,तसेच शंभूराजेंवर देखील संस्कार करून स्वराज्याला दुसरे छत्रपती दिले.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अनेक मोहिमांमधे बाल शंभूराजे सोबत असत.अनेक संकटांना सामोरं ही जावं लागतं.त्यांनी कोवळ्या वयात स्वराज्यासाठी सोसलेले घाव फार मोठे होते.लहान वयातच राज्यकारभाराचे ज्ञान शंभूराजेंना अवगत झाले होते. शंभूराजे सर्वांगाने तरबेज होते...

कर्मवीर भाऊराव पाटील

Image
काही मानव खरच थोर असतात.संपूर्ण समाजहितासाठी आपलं आयुष्य संघर्षमय व्यथित करतात.कर्मवीर भाऊराव पाटील असेच एक महा मानव ! कर्मवीरांचा जन्म कोल्हापूर येथील कुंभोज या गावचा.त्यांचे मूळ गाव सांगली येथील ऐतवडे बुद्रुक. भाऊराव हे लहानपणापासुन बंडखोर होते.त्यांचे प्राथमिक शिक्षण विटा येथे झाले.पुढेचे शिक्षण घेण्यासाठी ते कोल्हापूरला राजाराम हाइस्कूलमधे   दाखल झाले.ह्या काळात त्यांच्यावर राजश्री शाहू महाराज यांच्या विचारांचा व अभूतपूर्व कार्याचा प्रभाव पडला.शाहू महाराजांकडून कार्य करण्याची प्रेरणा भाऊराव यांना मिळाली.सुरुवातीला आपल्या काही सहकाऱ्यांच्या बरोबर दूधगाव येथे दूधगाव शिक्षण मंडळ स्थापन केले. सर्व जाती धर्मांच्या मुलांसाठी वस्तीगृह ही येथे स्थापन केले.रयत शिक्षण संस्थेची बीज खरं तर  इथेच रोवली गेली.मी या शिक्षण संस्थेची काही काळ विध्यार्थीनी होते याचा सार्थ अभिमान आहे. पुढे ४ ऑक्टोबर १९१९ रोजी कोल्हापूर येथील काले ह्या गावी कर्मवीरांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली.मागासलेल्या,वंचीत  समाजातील मुलांना शिक्षणाविषयी गोडी निर्माण करण,अनावश्यक रुढी परंपरांना फाटा देणं,...