पाऊस
येरे येरे पावसा
म्हणत सरलं बालपण,
नभावर स्वार होता
आले कधी शहाणंपण !
त्यात विरहाची धग मनी
विझवेना एक ही सरी,
वाढता वाढता वाढे
वयाची पायरी साडे-माडे,
तरी पावसाचे फुटता पोट
विसरे छत्री आणिक कोट,
चिंब भिजणं बरसणाऱ्या सरीत
जणू काही हिचं आमची रीत,
येता पाऊसकळा
सुरु आमची उनाडशाळा,
बसरणाऱ्या धारा
सोबत मंद वाहे वारा,
त्यात चिंब भिजून जरा
मोहरे मनाचा हर एक कोपरा..
प्राची दुधाने
वारसा सोशल फाऊंडेशन
Pic credit:Not Me..Google..
Khup sundar
ReplyDelete