रक्षाबंधन

माझे,माझ्या कुटुंबियांचे,समाजाचे, राष्ट्राचे,मानवतेचे या वसुंधरेचे रक्षण करणाऱ्या सर्व भगिनी व बांधव यांना रक्षाबंधनाच्या शिवमय शुभेच्छा !
रक्षाबंधन हा केवळ बहीण-भाऊ यांचे नातं दर्शवणारा सण का असावा? प्रत्येक नात्यातील निर्माण होणारा विश्वास दृढ करणारा हा सण का नसावा? 
त्या अनुषंगाने आपण सर्वांनी हा सण साजरा का करू नये ?..
लिंग भेद,स्त्री पुरुष समानता-असमानता यासारखे विषय या व अशा असंख्य अनावश्यक रूढी,परंपरा व संस्कृतीच्या नावाखाली पिढ्यानंपिढ्या साजरे होणाऱ्या सणांना आपणच जाणते-अजाणतेपणे खतपाणी घालत 
आहोत.बहिणीचं रक्षण करणारा भाऊ असतो..हे विचार आपण लहानपणापासुन मुलांवर बिंबवत रहातो. म्हणजेच,स्त्री/मुलगी ही स्वतःच रक्षण करण्यास असक्षम आहे हे शिकवायचं आणि तिने आयुष्यभर आवलंबून रहायचं..तसंच मुलाने आयुष्यभर जबाबदारीच्या ओझ्याखाली रहायचं,आपण पुरुष आहोत आणि स्त्रीचे  रक्षणकर्ता आपणच या भ्रमात आयुष्य जगायचं.
खोट्या आणि चुकीच्या रूढींमुळे ना स्त्री मुक्त आयुष्य जगू शकते ना पुरुष ! स्त्री सतत परावलंबी व पुरुष सदैव वर्चस्ववादी,पण दोघे ही संस्कृतीच्या ओझ्याखाली दबलेले..मग नातं कोणतं ही असो !
   मुलगा असो वा मुलगी दोघे ही आपलं रक्षण स्वतः करू शकतात व वेळ आली तर एकमेकांचं ही करू शकतात आणि नेहमी एकमेकांचा आधार बनू शकतात हे विचार रुजवणं गरजेचं आहे.
  चला तर मग आज या नवं विचारांची मुहूर्त मेढ करूया.आपल्या आयुष्यातील प्रत्येक विश्वासाचे नाते,वेगवेगळ्या प्रकारे आपलं रक्षण करणारी नाती,आपला आदर व प्रेम करणारी नाती मग ते
आई- वडील असो,बहीण-भाऊ असो, आजी-आजोबा,काका,मामा,मावशी,मित्र,मैत्रिण, शेजारी,आपल्याकडे कामं करणारे,सगळे फ्रंट लाईन वॉरीयर्स,सगळेच या सणाचे खरे मानकरी आहेत.
गेली अनेक वर्ष आम्ही या पैकी अनेकांबरोबर हा सण साजरा केला आहे.समोर स्त्री असो वा पुरुष,ते आपले रक्षणकर्ते आहेत याची जाणीव ठेवून त्यांचा सन्मान करावा.घरातील देखील प्रत्येक सदस्य आपला रक्षणकर्ता असू असतो.मग हा सण एका विशिष्ठ नात्याचाच का असावा? आणि हे बंधन,बंध का बनावे ? 
हा सण निर्भयपणे प्रत्येकाला जगता यावा,यासाठी असावा.म्हणून आजचा हा सण सर्व विश्वास,प्रेम,आदर निर्माण करणाऱ्या नात्यांना समर्पित !
सोबत आजच्या व मागील काही आठवणींचे फोटो जोडत आहे.याच आठवणी आनंद आणि समाधान देवून जातात.

प्राची दुधाने 
वारसा सोशल फाऊंडेशन

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान दिन

कोरोना आणि लस - एक षडयंत्र

"बापू,देश की सेहत के लिये क्या तु हानिकारक है"??