Posts

सरते वर्ष..

Image
सरते वर्ष.. २०२० हे वर्ष सुरु होण्यापूर्वीच विश्वावर कोरोना सारख्या जागतिक महामारीचे सावट उभ ठाकलं होतं.संपूर्ण जग एकाच वेळी भयभीत झाल असावा अशी स्थिती. मानवाने कितीही प्रगती केली तरी मृत्यूला तो रोखू शकत नाही.याचा प्रत्यय पुन्हा एकदा आल्याशिवाय राहत नाही.कोरोना विषाणू मानव निर्मित असल्याचेही समजले.त्यात किती तथ्य माहीत नाही.पण या विषाणूने असंख्य माणसं गमावली हे नाकारून चालणार नाही.२०२० हे वर्ष तस भीतीच्या सावटाखाली गेलं.अजून धोका टळला नाही.पण मानवाने जणू ह्या कोरोनाच अस्तित्व स्वीकारला आहे,अस जगतोय.    २०२१ हे वर्ष तरी किमान आशादायी असावा ही  माझ्यासारखी अपेक्षा व इच्छा बहुसंख्य लोकांची असावी.या वर्षीचा संकल्प आहे त्यात कसे सुरक्षित राहावं हा विचार व्हावा.सर्वांचे दैनंदिन जीवन किती विस्कळीत झाला आहे याची कल्पनादेखील करवत नाही.नोकऱ्या नाहीत,शाळा असून नसल्यासारखी, मोकळेपणाने कुठं-कुणाकडे जाणं-येणं नाही,मानसिक व शारीरिक ताण,आर्थिक विवंचना,आरोग्य विषयी चिंता अशा अनेक समस्या सोबतीला आहेतच.   २०२० या वर्षात अनेक कुटुंबांनी आपला आधार गमावला आहे.काहींनी तर एकापेक्षा जास्त म...

कुणी तरी लेखक कवी आपल्या आयुष्यात ही असावं..

Image
कुणी तरी लेखक-कवी  आपल्या आयुष्यात ही असावं.. कुणी तरी लेखक-कवी  आपल्या आयुष्यात ही असावं.. आपल्या हसण्या-रडण्यावर,   रुसण्या-हिरमुसण्यावर,  रागावर-प्रेमावर अन सगळ्या गमतीजमतीवर,  दिसण्यावर-भासण्यावर,   दुःखाच्या वाटेवर अन सुखाच्या रथावर,  आपल्या हातून घडणाऱ्या चुकीवर अन कर्तृत्वावर..  खरचं कुणी तरी आपल्या जाणते अजाणतेपणे आपलं अस्तित्व टिपणारं,  आपल्या असण्या-नसण्यावर,   आपल्या जाण्यानंतर स्वतःचे शब्द देवून  आपल्याला जीवन देणारं,   मनसोक्त आपलं कौतुक करणारं,  कोणी तरी आपला प्रवास कागदावर मांडणार,   लेखक-कवी आपल्या आयुष्यात असावंच ! प्राची दुधाने  वारसा फाऊंडेशन

मायेची माय माझी..

Image
माझ्या आज्जीचा(आईची आई)रती आईचा आज २३वा स्मृती दिवस ! तिच्या आठवणीने मन व्याकुळ होतंय. तिच्यासाठी लिहिलेल्या या चार ओळी तिला समर्पित ! मायेची माय माझी.. मायेची माय माझी होती,   रती,रत्या,रत्नमाला तिला म्हणती.  दुधावरची साय मी तिची,  होती ती माऊली जगाची.  परक्याला आपलंस करणारी, धरणी ती..समदं आपल्यात समावणारी.  प्राण्यांना ही वाटे तिचा आधार, सगळ्यांच्या पोटाला वाढे भाकर चार. काळाने मात्र घाला घातला, माऊलीला आमच्या दूर घेवून गेला.  नातवंडांमध्ये रमण्याची हौस होती तिला, पोरकी करून पोरं,डाव अर्ध्यावर सोडला.. स्मृती दिवस डिसेंबर सत्तावीस, वर्ष आज झाली पूर्ण तेवीस. स्मरण माऊलीचे सदा आमच्या मनी, दंडवत माझा दोन्ही कर जोडोनी ! प्राची दुधाने

माय बाप शेतकरी

Image
सवताच्या पोटाला घेवूनी चिमटा माय बाप शेतकरी, जगासाठी धन धांन्याची  रास उभारी.. गडी आध्या रातीला बारं धरी. ढवळ्या अन पवळ्या येळमाळं संगतीला,  धावून जाय धन्याच्या मदतीला. इमानदारीचा मळका सदरा, बेईमाना परीस रुबाब करी.  वरिसभर काळ्या मातीत गाळतो घाम, पर त्याच्या कष्टाला कवा मिळल खरा दाम ?  वाट बघणं एवढं मातुर उरलं त्याचं काम.. यळवर पाऊस अन बत्ती नाय, बेफान बरसला,तरी डुईवर भार हाय, अशा वक्ताला करावं काय ? या इचारानं गडी बावरून जाय.. पोरीचं लगीन जोरात वाजवीन, बेट्याला मोटा साहेब बनवीन. सपान त्याचं व्हाऊन जाय, सपरात बसून रडं माय.. सरकार इलाज काढील आता हिचं उरली आसा, तीन बिलांनं मातुर पूर्ती केली निरासा. ढेंकूर देयून बसल्या शेठला काय, गोरगरिबांची जाण नाय ! जगाचा ह्यो पोशिंदा, ठरिवलं तर पाडील बंद तुझा धंदा.. कोणी तरी सांगावं त्या वामन्याला, बळीचा वारस हाय त्यो.. जरा जपून..नाय तर जुंपीन तुलाच नांगराला !! प्राची दुधाने  वारसा फाऊंडेशन

नाही सत्ता तरी राजा !

Image
नाही सत्ता तरी राजा ! आजच्या पोस्टचा विषय फार वेगळा आहे. मी नेहमी माझा लेखनाबरोबर एक इमेज त्यावर आधारित सुविचारा सहित पाठवत असते.त्याने विषय समजायला आधार मिळतो असं मला वाटतं. मी सतीशला(जो डिझाईन बनवतो)त्याला सुविचार आणि त्यावर आधारित चित्र पाठवले की तो डिझाईन तयार करून पाठवतो.त्या दिवशी जास्तच उशीर झाला.मी काही पाठवलं नाही म्हणून त्याने मला एक डिझाईन स्वतः करून पाठवलं.आजच्या लेखा बरोबर जोडलेली  डिझाईन तीच.त्यावर त्याने जे लिहून त्या शेजारी चित्र पाठवलं होतं ते बघून,असं का पाठवले असेल ? असा पहिला प्रश्न मनात आला.पण त्याला तसं विचारलं तर पोरग हिरमुसायचं.म्हणून छान म्हटलं आणि गप्प राहिले.पण त्यावर लिहायचं हे ठरवलं होत.     साधारण काय लिहिले आहे,त्यावर मी डिझाइन ठरवते.पण आज त्याने काही दिवसांपूर्वी पाठवलेल्या  डिझाईन बद्दल थोडक्यात लिहित आहे.   सामाजिक जीवनामध्ये आपण वावरत असताना प्रत्येक मनावर आपण एक विशिष्ट छाप निर्माण करत असतो.आपल्या कार्याची,स्वभावाची ती पावती असू शकते.असू शकते,असं म्हटलं कारण काही लोकांना  तुम्ही कितीही चोंभाळल,त्यांच्याशी कितीही प्रेमाने ...

विरोधाभास

Image
विरोधाभास  आयुष्यत किती विरोधाभास असतात नाई.. आपण शिकतो एक,ऐकतो दोन,बोलतो तीन अन करतो चार.शाळेत शिक्षण घेत असताना आपल्याला काय काय ज्ञानाचा अन तत्वज्ञानाच्या गोष्टी शिकवल्या जातात. जात-पात मानू नका,भेदभाव पाळू नका,बंधुभाव निर्माण करा,एकमेकांचा आदर सन्मान करा,मानवता हाच खरा धर्म,खोटे बोलू नका,चोरी करू नका,संविधान हा आपला सर्वात महत्त्वाचा ग्रंथ आहे,स्वातंत्र्यासाठी अनेकांनी बलिदान दिले आहे,त्यांच्या प्रती व देशाप्रती आदर असावा,स्वातंत्र्याची किंमत समजून घ्यावी,दुसऱ्याच वाईट चिंतू नका,अशा एक ना अनेक बाबी एका दमात मावत नाही बाबांनो.. मला असं वाटतं Its not important what we learn now,is how we present the thought about it in future ! आपण आज जे शिकतोय त्याला अनुसरून आपण भविष्यात काही विचार सादर करू असं नाही.हे अनेकांना लागू होत.कारण विरोधाभास !    मी माझ्या मुलांना शिकवताना नेहमी सांगते(अर्थात अभ्यासाविषयी).इथ जे दिल आहे ते आपल्या ज्ञानासाठी.काय अपेक्षित आहे हे माहिती होण्यासाठी. पण प्रत्यक्षपणे जे ह्या बुकात आहे असं घडतच असं नाही.उदाहरण-न्याय व्हावा म्हणून कायदे केले जातात, प...

संत गाडगे (बाबा) महाराज

Image
संत गाडगे(बाबा) )महाराज मानवाला मानव म्हणून जगायला शिकवणारे.आयुष्यभर माणूस म्हणून मानवतेची बीज जनाजनात  पेरणारे. माणसांना शिक्षण व स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणारे. अनावश्यक रुढी-परंपरा व त्यांच्या नावाने होत असलेली लूट,प्राण्यांची हत्या या विषयी जागृती निर्माण करणारे. जातिभेद व अस्पृश्यता,दीन,दुबळे अनाथ यांची सेवा करावी,मंदिरांवर पैसा खर्च करण्यापेक्षा शाळा/शिक्षण यावर खर्च करावा,  सावकाराकडून कर्ज काढू नका,व्यसनांच्या आहारी जाऊ नका हे व असे अनेक उपदेश संत गाडगेबाबा आपल्या कीर्तनपर प्रबोधनातून गावोगावी फिरून लोकांना सांगत.    संत तुकाराम महाराज यांना आपले गुरू मानणारे संत गाडगेबाबा चालते बोलते ज्ञान भांडार होते.बाबा शिकलेले नव्हते,पण ज्ञानी होते.माणसातील अज्ञान दूर करण्यासाठी त्यांनी आपले सर्व सुख त्यागले.गाडगेबाबा यांच्या कविता आजच्या काळातही समर्पकपणे लागू होतात.बाबांचे द्रष्टेपण त्यांच्या विचारातून दिसून येते.संत गाडगेबाबा यांची 'देव'ही कविता जरूर वाचावी व समजून घ्यावी.देव आहे की नाही मुळात ही शंकाच आपल्या मनात उरणार नाही. इतकी सटीक मांडणी संत गाडगेबाबा यांनी केली...