Posts

Showing posts from February, 2022

विज्ञानावर अध्यात्म जगतंय,कारणं अज्ञान इथं पोसल्या जातंय..

Image
आज राष्ट्रीय विज्ञान दिवस आहे म्हणे.. विज्ञान संपल की अध्यात्म सुरु होत म्हणणारे आणि त्यांच अनुकरण करणारे या देशात अधिक आहेत. आमचे विचारवंत,समाजसुधारक,महानायक,  महानायिका सांगून सांगून दमले.पण,सोयीपुरतं विज्ञान सुख घेणारे अति शहाणे आपल्याला लाभले.  पोरं देवामुळं होतात.आता तर आंबा खाल्ल्यानं होतात हे देखील एक महान शास्त्रज्ञ सांगतात.माणसं पण जन्माला येत नाहीत,तर थेट प्रकट होतात.हत्तीच्या कानातून, मगरीच्या तोंडातून,झाडातून अवतार जन्म घेतात. तुकोबा रायांना घेवून जायला पुष्पक विमान येत. देव साक्षात दूध,लोणी खातो-पितो.गाड्या सोडा,इथं विमानाला पण लिंबू-मिरची बांधतात. असे असंख्य चमत्कार इथं विज्ञानाला सपशेल डायनोसॉर लावून घडतं असतात.तरी आमचा देश विज्ञानवादी !    अध्यात्म संपलं की विज्ञान सुरु होत.खरं तर हे अध्यात्म विज्ञानाचा आधार घेऊनच दिवस काढतंय.या अशा  अध्यात्मनिष्ठ व्यवस्थेत विज्ञानवादी विचारासाठी अहोरात्र संघर्ष करणाऱ्या सर्व खऱ्या विज्ञानवाद्यांना नेहमीच शुभेच्छा आणि मनस्वी आभार ! 🙏 प्राची दुधाने  वारसा सोशल फाऊंडेशन

ओळख माझ्या माय मराठीची

Image
आज मराठी भाषा दिनाच्या निमित्त मराठी भाषा संवर्धन समिती आयोजित कार्यक्रमातील माझ्या व्याख्यानातील काही मुद्दे 🙏 *ओळख माझ्या माय मराठीची*    निसर्गाने उपजतच स्त्रीला मातृत्व बहाल केलं आहे.ज्या क्षणाला आपण आईच्या उदरामध्ये विसावते, तेव्हापासून अखेरच्या श्वासापर्यंत आपले आपल्या आईबरोबरचे नाते घट्ट असते. मायेची सर माझ्या कशालाच नाही,  जाणते भावना माझ्या अन सारं काही.. असच काहीस आपल्या मातृ भाषेचं,माय मराठीच आहे.आपले भाव विश्व तिच्या विना अपुरे आहेत. इतका गोडवा आणि प्रगल्भता आपल्या या भाषेत आहे.आपली ही मराठी भाषा बोली भाषेच्या माध्यमातून ५०-५१ प्रकारे बोलल्या जाते.पुणेरी,कोकणी,कोल्हापुरी, वर्हाडी,इत्यादी.आपल्या एका भाषेत इतकी विविधता तरी तिचा गोडवा तितकाच.नशीबवान आहोत आपण या मराठी मातीत जन्मलो. मराठी भाषेचा न्यूनगंड बाळगू नका. तिला कमी समजून तिचा अवमान करू नका.आपल्याला ज्ञानेश्वराची, तुकारामाची,जनाबाईची,बहिणाबाईंची  अशा असंख्य संतांची मराठी लाभली आहे.तिचा आदर करा.अभिमान बाळगा !    इतर कोणती ही भाषा शिका.बंधन नाही.जागतिकीकरण होताना हे जमलंच पाहिजे.पण,हे करताना आ...

सावरकरी विखारी विचारांशी असलेलं माझं वैर अन लढा !

Image
आज वि.दा.सावरकर या व्यक्तीची पुण्यतिथी. सकाळपासून स्वतःला पोस्ट करण्यापासून रोखलं होत. पण आता मात्र हात शिवशिवायला लागले.म्हणून ही पोस्ट करत आहे.    तस सावरकरच आणि आपलं काही जमत नाही. स्वतःला स्वातंत्र्यवीर म्हणून घेणारी ही व्यक्ती मुळात देशविरोधी होती.म्हणजे खरी देशद्रोही.आमच्यासारखी देशद्रोही नाही.बरं का ! या माणसाचं विनाकारण उदात्तीकरण झालं व आज ही होत आहे.सावरकरने जे देशविरोधी कुकृत्य केले त्याबद्दल शेवट पर्यंत या माणसाला पश्चात्ताप झाला नाही.आपलं खापर कायम दुसर्यावर फोडल.तुम जावं लढो,हम कपडे संभालते. ही भूमिका सगळ्यांच्याच बाबतीत या महाशयांनी कायम प्रामाणिकपणे राखली.कोळशाच्या दलालीत हाथ काळे होतात म्हणतात.पण हा बुवा इतकी कांड करून देखील साफ कसा राहीला हाच मोठा प्रश्न.अखंड भारताचं म्हणजे यांच्या भिकार स्वप्नातल्या हिंदुस्थानाच चित्र हे पुण्यस्थळी जाताना देखील सोडून गेले.हा यांच्या स्वप्नातला हिंदुस्थान आधीच इथल्या मातीतल्या लेकरांचे मूडदे पाडून फस्त करून बसलाय.भस्म्या झाल्यासारखा हा अखंड हिंदुस्थानचा अजगर आज ही भोळ्या भाबड्या लेकरांना भुलवून त्यांना गिळंकृत करतोय.हे यांचं ...

राष्ट्र संत गाडगे बाबा जयंती निमित्ताने..

Image
या पोस्टच्या माध्यमातून कोणाच्या धार्मिक,दैविक अशा श्रद्धेच्या नावाखाली अनेक गोंजारून ठेवलेल्या भावना दुखावणं हा हेतू नाही,अस मी अजिबात म्हणणार नाही.कारणं विषयच असा आहे.मी बोलले की आग पाखड होणार आणि ते झोबणार..so,आवश्यक असेल तर बर्नोल वगेरे जवळ ठेवा.    आज २३ फेब्रुवारी,राष्ट्रसंत गाडगे महाराज(बाबा) यांची जयंती.जयंती बरं का ! ज्या गाडगे बाबांनी आपली सबंद हयात तुम्हाला शहाणं करण्यासाठी घालवली. "बाबांनो देव दगडात नाही,तो माणसात आहे." "देव मानव निर्मित आहे". "देव कार्यावर पैसा खर्च करण्यापेक्षा शिक्षण/शाळा यावर खर्च करा". हे बाबांचे विचार. कोरोनामुळे जी स्वच्छतेची अतीव काळजी आपण घेत आहोत,त्या स्वच्छतेविषयी बाबांनी समाज जागृतीचे वैचारिक कृतिशील कार्य केले याबद्दल सर्वांना माहीत आहे.दिवसभर स्वच्छता करायची आणि संध्याकाळी कीर्तनातून चार हिताच्या गोष्टी लोकांना बाबा सांगयचे. ते विज्ञान निष्ठ होते.उदाहरण देवून आपल्या प्रबोधनपर कीर्तनातून बाबांनी जिवतोडून मानवातील अज्ञान दूर करण्यासाठी प्रयत्न केले.पण,बाबा आम्ही करंटे निघालो ! हेच सत्य आहे. तुम्ही आमच्या हितासाठी सं...

ऐसा राजा होणे नाही

Image
मानवतेचा व लोककल्याणाचा पाया रचिला,  स्वराज्य ते अवघे उभारण्याला. रयतेला सुराज्य केले हो बहाल,  असा हा अद्वितीय राजा या मातीत जन्मला.  सांगे प्राची सर्वा तळमळीने,  जनहो तुम्ही निरखूनी ऐका. शिवराय जयाचे नाव,   कर्तृत्व त्याचे भाव विभोर.  ऐसा राजा पुन्हा होणे नाही,   तरी जतन करा तैसे विचार.  तेच करतील तुम्हा आम्हा संकटपार,  बाकी सर्व अंधकार. स्वराज्य संस्थापक,बहुजन प्रतिपालक, लोककल्याणकारी जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी मानाचा मुजरा 🙏🙏🙏🚩🚩🚩 प्राची दुधाने  वारसा सोशल फाऊंडेशन

शिवजयंती

Image
शिवजयंती  १९ फेब्रुवारी २०२२,३९२ वी शिवजयंती. तुम्ही शिवजयंती कशी साजरी करणारं आहात?  मनापासून करणारं..अस म्हणणारे खुप भेटतील.      पण,शिवजयंती मनापासून साजरी करायची आहे ?  तर त्याची सुरुवात मात्र तुमच्या बुद्धीपासून झाली पाहिजे ! घराघरात शिवजयंती म्हणजे शिवरायांच्या प्रतिमेपुढ हार,तुरे,फुलं,दिवाबत्ती नाही,तर परिवर्तनवादी विचारांची मशाल पेटवणं होय !   खबरदार जर छत्रपती शिवाजी महाराजांना  हिंदुत्ववादी म्हणाल.सनातनी,मनुवादी सडक्या मेंदूतून शिवराय व स्वराज्या विरुद्ध असलेली पोटशूळ आहे ही. त्यांच्या संघर्षाचा,कर्तृत्वाचा, इतिहासाचा अपमान त्यांच्या खोट्या इतिहासचे दाखले देत केला तर तुम्ही खरे स्वराज्य द्रोही आहात हे लक्षात घ्या.खरा इतिहास माहीत नसेल,तर तो समजून घ्या.पण संघोट्याच्या खोट्या इतिहासाचे पुरस्कृतकर्ते,प्रचारक व प्रसारक होवू नका.  तुमच्या क्षणभराच्या सुखासाठी,फायद्यासाठी,स्वार्थापायी  छत्रपतींना व स्वराज्याला बदनाम करू नका.    निधड्या छातीने कोणत्या ही संघर्षाला धाडसानं सामोरं जाण्याच बळ आपल्या राजानं आपल्याला दिल आहे. गुल...

हिजाबच्या माध्यमातून(आडून)नक्की काय विचार पेरले जात आहेत??

Image
हिजाबच्या माध्यमातून(आडून)नक्की काय विचार पेरले जात आहेत??  मला वाटतं मुळात हिजाब,घुंगट,डोक्यावर पदर,वगेरे हे सगळे धार्मिक,सांस्कृतिक,पुरुषी,स्त्री पूर्वग्रहदूषित मानसिकतेचे प्रतीक आहे.यातून स्त्रिया बाहेर पडण्यासाठी लढा देत आहेत.धर्माचे,संस्कृतीचे स्वयंघोषित ठेकेदार या ना त्या मार्गाने त्यांना अडवण्याचे शर्थीचे प्रयत्न करत असतात.तरी स्त्रीया आपल्या स्वातंत्र्य,हक्क,अधिकारासाठी सर्वोत्परीने लढत आहे.  पण,हिजाबच्या आडून त्याला ज्या प्रकारे आज प्रदर्शित केल्या जात आहे ते स्त्रियांच्या या भूमिकेच्या अगदी विरुद्धाचे आहे.आज स्त्रिया हा आमचा धार्मिक पेहराव आहे.आम्ही तो का घालू नये ? अस म्हणताना दिसत आहेत.दुसरीकडे हा एका विशिष्ठ धर्माचा पेहराव आहे म्हणून तो नाकारत असल्याचे व त्यावर विकृत मनोवादी पद्धतीने कृती होत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.या दोन्ही बाबी धार्मिक तेढ तर निर्माण करत आहेतच.पण त्याचं सोबत अनेक वर्षांची जी पुरुषी मानसिकतेच्या विरुद्धच्या लढ्याची,असंख्य स्त्रीवादी भूमिका प्रत्यक्षात मांडणाऱयांनी घेतली आहे तीच काय ?  या ना त्या मार्गाने या धार्मिक संकोचित अनावश्यक रूढी पर...

सोबती लता

Image
मेरी आवाज ही पेहेचान हैं,गर याद रहें.. लता मंगेशकर यांना अखेरचा निरोप देताना !     जीवनातील चढउतार सर करताना,संगीत नेहमीच आपला जवळचा सोबती असतो.भावनांना वाट करून देताना गीत-संगीत महत्वाची भूमिका माझ्यासारख्या अनेकांनाच्या जीवनात पार पाडतात.त्यात गीतकार- संगीतकार-गायक शब्द,सुर व आवाजातून जे अद्भुत असे भाव गुंफण निर्माण करतात त्याची जादू काही औरच असते.क्षणात आपल्याला दूर आठवणींच्या कप्यात घेवून जातात.काही क्षण पुन्हा जगण्याचा ही आभास निर्माण करतात.काही हसवतात तर काही डोळ्यांत आसवं ही देवून जातात.लहान असताना बाल गीतं,तारुण्यात प्रेम गीतं(तशी ही आयुष्याच्या कोणत्या ही टप्प्यावर रोमांच निर्माण करतात),पुढे भाव गीतं. असा या गीतांचा प्रवास सर्वसाधारणपणे सगळ्यांच्या जीवनात सुरु असतो.मला समजू लागलं तस मी लतांची गाणी ऐकत असल्याचे मला आठवतं.कारणं आईला घरात रेडिओ आणि टेपरेकॉर्डरवर सुमधुर गीतं ऐकण्याची नितांत आवड.एकीकडे घरातील काम आणि दुसरीकडे संगीत.आज ही सवय मला देखील आहे.मग मूड प्रमाणे गाणी ऐकणं तर ठरलेलंच.यात खास करून लतांची गाणी ऑल टाइम फेव्हरेट..टेप असताना लतांच्या अनेक गाण्यांचे ...