विज्ञानावर अध्यात्म जगतंय,कारणं अज्ञान इथं पोसल्या जातंय..

आज राष्ट्रीय विज्ञान दिवस आहे म्हणे..
विज्ञान संपल की अध्यात्म सुरु होत म्हणणारे आणि त्यांच अनुकरण करणारे या देशात अधिक आहेत.
आमचे विचारवंत,समाजसुधारक,महानायक,  महानायिका सांगून सांगून दमले.पण,सोयीपुरतं विज्ञान सुख घेणारे अति शहाणे आपल्याला लाभले. 
पोरं देवामुळं होतात.आता तर आंबा खाल्ल्यानं होतात हे देखील एक महान शास्त्रज्ञ सांगतात.माणसं पण जन्माला येत नाहीत,तर थेट प्रकट होतात.हत्तीच्या कानातून, मगरीच्या तोंडातून,झाडातून अवतार जन्म घेतात.
तुकोबा रायांना घेवून जायला पुष्पक विमान येत.
देव साक्षात दूध,लोणी खातो-पितो.गाड्या सोडा,इथं विमानाला पण लिंबू-मिरची बांधतात.
असे असंख्य चमत्कार इथं विज्ञानाला सपशेल डायनोसॉर लावून घडतं असतात.तरी आमचा देश विज्ञानवादी !
   अध्यात्म संपलं की विज्ञान सुरु होत.खरं तर हे अध्यात्म विज्ञानाचा आधार घेऊनच दिवस काढतंय.या अशा  अध्यात्मनिष्ठ व्यवस्थेत विज्ञानवादी विचारासाठी अहोरात्र संघर्ष करणाऱ्या सर्व खऱ्या विज्ञानवाद्यांना नेहमीच शुभेच्छा आणि मनस्वी आभार ! 🙏

प्राची दुधाने 
वारसा सोशल फाऊंडेशन

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान दिन

कोरोना आणि लस - एक षडयंत्र

"बापू,देश की सेहत के लिये क्या तु हानिकारक है"??