Posts

Showing posts from April, 2021

महाराष्ट्र दिन

Image
१मे महाराष्ट्र दिन व कामगार दिन. आजच्या दिवशी १९६० साली स्वतंत्र राज्य म्हणून महाराष्ट्राची निर्मिती झाली होती.पण या मागचा इतिहास फार संघर्षाचा आहे.राज्य पुनर्रचना आयोगाने त्यावेळी (१९५६)महाराष्ट्राला मुंबई देण्याचे नाकारले.महाराष्ट्राच्या मातीतला प्रत्येक मराठी माणूस या निर्णयाने क्रोधित झाला होता.अनेक ठिकाणी,विविध पद्धतीने सरकार विरोधात निषेध व्यक्त केला जात होता.संगठीत  कामगारांचा असाच एक भव्य मोर्चा २१ नोव्हेंबर १९५६ रोजी मुंबईमध्ये फ्लोरा फाउंटन परिसरात जमला होता. सरकार विरुद्ध घोषणा व निषेध व्यक्त होत होते. पोलीसांच्या माध्यमातून आंदोलकांवर दबाव टाकला जात होता.आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला. एवढं होऊन देखील कामगारांचा मोर्चा आपल्या भूमिकेवर अटळ होता.महाराष्ट्र द्वेषी तात्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी आंदोलकांवर गोळीबाराचा आदेश पोलिसांना दिला.यातच संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी १०६ हुतात्म्यांचे या मातीत रक्त सांडले.     या घटनेच्या साडेतीन वर्षानंतर मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली.पण,त्यासाठी १०६ हुतात्म्यांना बलिदान द्यावे ल...

जागतिक पुस्तकं(ग्रंथ)दिन World Book Day !

Image
जागतिक पुस्तक(ग्रंथ)दिन World Book Day  २३ एप्रिल,जागतिक पुस्तक दिन !   पुस्तकाने मला काय दिले असा जर प्रश्न मला कोणी विचारला तर त्याला उत्तर एकच असेल.पुस्तकाने माझ्या विचारांच्या पंखांना बळ दिले,योग्य दिशा दाखवली व माझे आयुष्य समृद्ध केले. पुस्तक कधी माझे नातलग बनले,तर कधी माझी त्यांच्याशी घट्ट मैत्री जमली आणि त्यांच्यावर प्रेम ही जडलं.माझे विचार,कृती हे मला अनेकदा गर्दीतून अलगद वेगळ काढत(आज ही).आपण एकटेच असे आहोत का? असे प्रश्न एकेकाळी मला भेडसावत.पण जेव्हा पुस्तकं वाचू लागले,समजून घेऊ लागले तेव्हा उमगलं. आपल्यासारखे अनेक घडून गेलेत व आहेत.त्यांच्या लेखणीची धार माझ्या विचारांना आणखीन तीक्ष्ण बनवू लागली.पुस्तकांच्या मागे ज्ञानाचा महापूर असतो,हे तेव्हा  समजलं.पण त्याचा उपयोग योग्य पद्धतीने करावा लागतो हे ही तेवढंच महत्वाचं.चार बुकं शिकून कोणी शहाण होत असं नाही.ती चार बुकं डोक्यात घेऊन त्याप्रमाणे कृती करणं म्हणजे खरं ज्ञान संपादन करणे.   कोणीतरी खूप छान उदाहरण दिले आहे.जो पुस्तक वाचतो तो हजार आयुष्य जगतो,पण जो वाचतच नाही तो एकच जगतो.मला तर पुस्तक जवळ असलं तरी श्रीमंत...

डॉ.भीमराव आंबेडकर

Image
१४ एप्रिल  भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती ! संविधान,हिंदू कोडं बिल,महाडचा सत्याग्रह,शेतकरी व कष्टकरी यांच्या हिताचे कार्य.असे एक ना अनेक कार्य आपल्या प्रयत्नातून,संघर्षातून पूर्णत्वाला ज्यांनी नेलं व ज्याचा लाभ सर्व स्थरातील जनतेला झाला. विशेषतः वंचीत घटक,ज्या मधे माझ्यासारख्या असंख्य स्त्रियांचा समावेश आहे.असे थोर विचारवंत, समाजसुधारक,महामानव डॉ.भीमराव म्हणजेच बाबासाहेब आंबेडकर.    न्यायशास्त्र,अर्थशास्त्र,राजनीति अशा अनेक विषयांचे सखोल ज्ञान बाबासाहेबांना होते.सामाजिक भेदाभेद यामुळे लहानपणापासून त्यांना जी वागणूक मिळाली होती ही अगदी हीन दर्जाची होती.या सगळ्या अनुभवांमधून जे काही गाठीशी बाबासाहेब यांनी बांधले होते त्यातून विचारपूर्वक एका परिवर्तनशील समाजाची, मानवी हिताची कार्य त्यांच्या हातून घडले,असं म्हणणं वावगं होणार नाही.कारण मानव म्हणून जन्माला आलेल्या प्रत्येक मानवाला मानव म्हणून जगण्याचा अधिकार आहे,हे या महामानवाने कृतीतून दाखवून दिलं. त्यांनी ते जीवन जगलं व अनुभवलं होत.ते कोणाच्या वाट्याला येवू नये म्हणून त्यासाठी त्यांनी लढा उभारला आणि ते यशस्वी देखील झाले....

महात्मा फुले जयंती

Image
११ एप्रिल  ज्योतिराव गोविंदराव फुले म्हणजेच महात्मा जोतिबा फुले यांची जयंती जन्मोउत्सवा ! अशिक्षित राहिल्याने बहुजनांची प्रगती खूंटली. वैचारीक,मानसिक,शारीरिक गुलामगिरी पत्करून ते शूद्र झाले.स्त्रिया चुल आणि मूल,रुढी परंपरा यात अडकून शुद्रादी शूद्र झाल्या..थोर विचारवंत, समाजसुधारक,स्त्री शिक्षणाचे प्रणेते व  जनक,शेतकर्यांचे कैवारी,सत्यशोधक समाजाचे जनक,समतावादी, परिवर्तनवादी,महात्मा जोतिबा फुले यांनी कृतिशिलतेची वाट दाखवून प्रगतशील समाज निर्माण करण्याचे महान कार्य केले.आज अनेक वर्षानंतर ही महात्मा फुले यांच्या वैचारीक्तेची गरज आपल्याला भासते.महात्मा फुले यांच्या विचारांचे पाईक होवून वैचारीक कृतिशिल परिवर्तन आपल्यापासून सुरू करणे हे आपले परम कर्तव्य समजावे.मी माझ्या वैचारिकतेमधे,कृतिमधे फुले दांपत्यास स्मरून अनेक बदल घडवून आणले आहेत.ज्याने माझी व माझ्या कुटुंबाची वैचारीक वृद्धी होत आहे.माझ्या ह्या छोट्याशा प्रयत्नातून महात्मा फुले यांना खऱ्या अर्थाने त्रिवार शिवाभिवाद्न !!! सत्य की जय हो 🙏🚩 हिचं पोस्ट मी गेली दोन वर्ष करत आहे.त्या मागील हेतू स्पष्ट आहे आणि तो म्हणजे मोजक्या व ...

जागतिक आरोग्य दिन

Image
आज ७ एप्रिल जागतिक आरोग्य दिन. ७२ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी १९४८ रोजी जागतिक आरोग्य संस्था म्हणजेच डब्ल्यू एच ओ WHO ची स्थापना झाली होती.त्यानिमित्ताने आजच्या दिवशी  समाजामध्ये आरोग्या प्रती योग्य जागरूकता निर्माण व्हावी हा त्या मागचा हेतू.   आरोग्य म्हटलं की आपण पहिला आपल्याला कोणता आजार असेल तर त्याविषयी विचार करतो.पण कोणताही आजार नसलेली व्यक्ती आरोग्यपूर्ण असते असं नाही.आरोग्य हे केवळ शारीरिक नसून मानसिक व सामाजिक दृष्ट्या देखील संपन्न असाव.      धावपळीच्या जीवनात आपण चंचल संपत्ती कमावताना स्थिर संपत्तीकडे १००% दुर्लक्ष करतो. अंगात त्राण असे पर्यंत आपण धाव धाव धावतो आणि अखेर मात्र अंथरुणाला खिळून बसतो.आपल्या शरीराची व मनाची योग्य काळजी आपण घेतली तर ते देखील आपली काळजी घेतात.   योग्य आहार,व्यायाम,मनाचे आरोग्य,पुरेशी झोप, आनंदी व सकारात्मक वृत्ती हे सगळं काही आपले आरोग्य निरोगी व दीर्घ करू शकतात.आरोग्याची किंमत समजण्यासाठी ते धोक्यात घालण्याची गरज नसते. ती वेळच येऊ नये यासाठी प्रयत्न करायचा असतो. आपला प्रत्येक दिवस हा आपल्यासाठी बोनस असतो.एका विश्वासावर आ...

छत्रपती शिवराय स्मृतिदिन निमित्त चिकित्सा !

Image
मी चिकित्सक.. तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा काळ एक होता.  आपण म्हणतो जर आधुनिक तंत्रज्ञान असत तर शिवाजी महाराज यांनी केव्हाच जग जिंकलं असत.  पण जर तेव्हा तुकाराम महाराज यांना वैकुंठात जायला  पुष्पक विमान मिळू शकत,तर शिवाजी महाराज यांना असच काही विकसित तंत्रज्ञान का मिळालं नसावं रयतेचं  स्वराज्य निर्माण कार्यासाठी??  उगाच देव भक्ती वगैरे म्हणून काही तरी उत्तर मांडू नका कोणी..कारण तुकाराम महाराज यांची जर भक्ती होती,तर शिवाजी महाराज हे देखील तुकाराम महाराज यांचे शिष्य होते हे विसरू नका..   तुकाराम महाराज असो अथवा छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला कोणी ही अंधश्रद्धा उराशी बाळगून जगायला शिकवलं नाही.उलट डोळस,चिकित्सक,सत्य, ठाम,बंडखोर,विद्रोही,मानवहीत,रयतेसाठी स्वराज्य, एकसंध समाज,स्त्री सन्मान या सारखे विचार व कृती मधून कर्मठ मनुवादी मानसिकतेशी लढायला शिकवलं आहे.गुलामगिरी पत्कारून,थोड्याशा नफ्याखातर स्वतःला अन आपल्या माती- माणसांना विकून आपली पोट भरणारी अनेक पाहिलीत.पण,या सारख्यांना त्यांची योग्य जागा दाखवणारे छत्रपती या महाराष्ट्राच्या अन भारताच्या ...