जागतिक आरोग्य दिन
आज ७ एप्रिल जागतिक आरोग्य दिन.
७२ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी १९४८ रोजी जागतिक आरोग्य संस्था म्हणजेच डब्ल्यू एच ओ WHO ची स्थापना झाली होती.त्यानिमित्ताने आजच्या दिवशी समाजामध्ये आरोग्या प्रती योग्य जागरूकता निर्माण व्हावी हा त्या मागचा हेतू.
आरोग्य म्हटलं की आपण पहिला आपल्याला कोणता आजार असेल तर त्याविषयी विचार करतो.पण कोणताही आजार नसलेली व्यक्ती आरोग्यपूर्ण असते असं नाही.आरोग्य हे केवळ शारीरिक नसून मानसिक व सामाजिक दृष्ट्या देखील संपन्न असाव.
धावपळीच्या जीवनात आपण चंचल संपत्ती कमावताना स्थिर संपत्तीकडे १००% दुर्लक्ष करतो.
अंगात त्राण असे पर्यंत आपण धाव धाव धावतो आणि अखेर मात्र अंथरुणाला खिळून बसतो.आपल्या शरीराची व मनाची योग्य काळजी आपण घेतली तर ते देखील आपली काळजी घेतात.
योग्य आहार,व्यायाम,मनाचे आरोग्य,पुरेशी झोप, आनंदी व सकारात्मक वृत्ती हे सगळं काही आपले आरोग्य निरोगी व दीर्घ करू शकतात.आरोग्याची किंमत समजण्यासाठी ते धोक्यात घालण्याची गरज नसते.
ती वेळच येऊ नये यासाठी प्रयत्न करायचा असतो. आपला प्रत्येक दिवस हा आपल्यासाठी बोनस असतो.एका विश्वासावर आपण रोज डोळे मिटत असतो.तो म्हणजे,सकाळी आपल्याला जाग येणार.
असा सकारात्मक विचार आरोग्याबाबत करा.
इथून मागे झालं ते सोडून द्या.प्रत्येक क्षण तुमचा आहे.नवीन सुरुवात करा.आपल आरोग्य मौल्यवान आहे,कारण जीवन एकदाच आहे.
आपल्या आरोग्य बरोबर सामाजिक आरोग्य ही तितकच महत्त्वाचं.आरोग्य सुविधा प्रत्येक मानवाचा मुलभूत अधिकार आहे.त्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करावेत.जर आरोग्य सुविधा निर्माण करणे अवघड व खर्चिक वाटत असेल तर एक जाणून घ्या कोणताही आजार त्यापेक्षा खर्चिक,अवघड व जीवघेणा असतो. आपण २०२० पासून कोव्हीड१९ च्या जागतिक महामारी वरून हे समजून घेणे गरजेचे आहे.आरोग्य विषयी सामूहिक जागृती होणं काळाची गरज आहे.सगळी धडपड जर जगण्यासाठी असेल तर त्यासाठी अत्यंत महत्त्व आरोग्य जपण्यासाठी धडपड का होत नाही?
वैयक्तिक आरोग्य जपा.आपल्या कुटुंबाचे,समाजाचे आरोग्य जोपासण्यासाठी सक्षम व्हा.इथे मला गृहिणी आणि नोकरी,व्यवसाय करणार्यांना विशेष काही सांगायचं आहे.गृहिणीच नाही तर सगळ्याच स्त्रिया अनेकदा आपल दुखणं अंगावर काढतात. का? तर खूप कामं बाकी असतात.पण कामं होत राहतात तुम्हाला काही झालं तर काय होईल हा विचार करा.विनाकारणचा नको त्या कामांचा मानसिक ताण घेतल्याने मनावर आणि शरीरावर देखील त्याचा विपरीत परिणाम होतो हे लक्षात असू द्या.त्यातून नैराश्य,थकवा व विविध व्याधींना घरबसल्या आमंत्रण मिळतं.आपण केलं नाही तर जग बुडेल वगैरे सगळं ठीक आहे,पण त्या आधीच स्वतःला का छळ करून मारता..??
असंच काही नोकरी,व्यवसाय करणाऱ्यांच.
किती ती स्पर्धा..पैसा आज नाहीतर उद्या कमावता येतो,पण तुम्हाला काही झालं तर? ती स्पर्धा काय उपयोगाची? कमाई इतकं महत्त्व आपल्या शारीरिक, मानसिक आरोग्याला ही द्या.सगळ्यांनीच कामाच्या व्यापातून स्वतःसाठी थोडा वेळ काढावा.अगदी दिवसातील अर्धा ते एक तास सुद्धा खूप झाला.जमेल तो व्यायाम,चालणं सुरू करा.सकस व योग्य प्रमाणात आहार ठेवा.वैयक्तिक,सार्वजनिक स्वछतेचे देखील महत्व जाणून घ्या.मानसिक स्वास्थ जपा.कुटुंबाबरोबर छान वेळ घालवा.छंद जोपासा.थोडा विरंगुळा असावा..कारण,
किती ही मोठे संकट आलं तरी वेळे बरोबर ते निघून जात.त्यासाठी श्वास पणाला लावू नका.शेवटी काय तर तुम्ही किती आयुष्य जगलात यापेक्षा ते आरोग्यदायी होतं का हे महत्त्वाचा आहे.म्हणून आपण ते जपले पाहिजे.
लहान मुलांना ही आपण या जीवघेण्या स्पर्धेचा भाग बनवल आहे.ती बिचारी एका जागी बसून,मैदानी खेळ वगैरे काही नाही,त्यामुळे त्यांनाही आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे.नुसतं तांत्रिक युग म्हणून उपयोग नाही.त्याचा सगळीकडे उपयोग होत नाही.कारण आपण यंत्रमानव नसून मानव आहोत.आपल्या शरीराचे सर्व भाग व्यवस्थित चालत रहावेत यासाठी आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.कारण आरोग्य हीच खरी संपत्ती आहे.
मी स्वतःआरोग्याविषयी फार मोठा अनुभव घेतला व घेत आहे.त्यावर सविस्तर कधी तरी लिहिलं.पण खरचं सांगते,ते ही अनुभवातून.शारीरिक,मानसिक व सामाजिक आरोग्य हे एकमेकांवर अवलंबून आहेत.
योग्य आहार व व्यायाम शिरीराला व मनाला देखील तितकाच महत्वाचा आहे.हे समीकरण जे समजलं तर जीवन सार्थकी लागलं समजा.पण,यातलं कोणतं ही प्रमाण वर खाली झालं तर सगळं बिघडत.निरोगी आयुष्य,म्हणजेच आरोग्यदायी जीवन हेच खरं सुखी, समृद्ध जीवन !
स्वतः,कुटुंबं व समाज यांची काळजी घ्या.. !
जागतीक आरोग्य दिनाच्या शुभेच्छा !
आणि
या जागतिक संकटातून लवकर सगळे बाहेर पडोत हिचं इच्छा..
प्राची दुधाने
वारसा सोशल फाऊंडेशन
Comments
Post a Comment