छत्रपती शिवराय स्मृतिदिन निमित्त चिकित्सा !
मी चिकित्सक..
तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा काळ एक होता.
आपण म्हणतो जर आधुनिक तंत्रज्ञान असत तर शिवाजी महाराज यांनी केव्हाच जग जिंकलं असत.
पण जर तेव्हा तुकाराम महाराज यांना वैकुंठात जायला पुष्पक विमान मिळू शकत,तर शिवाजी महाराज यांना असच काही विकसित तंत्रज्ञान का मिळालं नसावं रयतेचं स्वराज्य निर्माण कार्यासाठी??
उगाच देव भक्ती वगैरे म्हणून काही तरी उत्तर मांडू नका कोणी..कारण तुकाराम महाराज यांची जर भक्ती होती,तर शिवाजी महाराज हे देखील तुकाराम महाराज यांचे शिष्य होते हे विसरू नका..
तुकाराम महाराज असो अथवा छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला कोणी ही अंधश्रद्धा उराशी बाळगून जगायला शिकवलं नाही.उलट डोळस,चिकित्सक,सत्य, ठाम,बंडखोर,विद्रोही,मानवहीत,रयतेसाठी स्वराज्य, एकसंध समाज,स्त्री सन्मान या सारखे विचार व कृती मधून कर्मठ मनुवादी मानसिकतेशी लढायला शिकवलं आहे.गुलामगिरी पत्कारून,थोड्याशा नफ्याखातर स्वतःला अन आपल्या माती- माणसांना विकून आपली पोट भरणारी अनेक पाहिलीत.पण,या सारख्यांना त्यांची योग्य जागा दाखवणारे छत्रपती या महाराष्ट्राच्या अन भारताच्या मातीला लाभले हे विसरू नका.छत्रपतींच्या नावाचा नुसता जय घोष करून कोणी त्यांचा मावळा होत नसतो.त्यांचे विचार आचरणात आणण्याचं बळ ज्याच्यात असत,तोच खरा मावळा.अरे ज्यांचं नाव घेवून अंगी १० हत्तीचं बळ येत,त्यांना आदर्श मानून त्यांचे विचार जर डोक्यात घेवून कृतीत आणले तर काय होईल विचार करा..
आज सत्तेत येणारे छत्रपतींच्या नावाचा गैरवापर करून मत मिळवतात,पण त्यांच्या विचाराने कृती मात्र करत नाहीत.कारण,जे शिवरायांनी केलं ते जर यांनी केलं तर राजकारण कोण करणारं? हा प्रश्न यांना पडतो.
शिवरायांनी भेदाभेद करून स्वार्थाच जातीय राजकारण नाही केलं.त्यांनी सर्व समाज एकसंध केला आणि रजतेच्या अधिकार,हक्क,स्वातंत्र्या खातर लढा उभारला आणि तो स्वराज्याच्या स्थापनेने यशस्वी झाला.
मनुवादी विचारांनी तर शिवरायांचा हा लढा अनेकदा अयशस्वी कसा होईल यासाठी प्रयत्न केला.एवढंच काय तर त्यांना राजा होण्याचा अधिकारच नाही,कारण ते शूद्र आहे असं ठामपणे सांगितलं.पण शिवरायांना स्वार्थासाठी छत्रपती व्हायचं नव्हतं,तर रयतेच्या भल्यासाठी एक राज्य उभारायचं होत.त्यांनी जे योग्य होत तेच केलं. शिवराज्य अभिषेक करून शिवराय समस्त रयतेचे छत्रपती झाले ! पण,ती सल समजून मनुवादी अजून उराशी बाळगून बसलेत.ज्यामुळं इतिहासाचं विद्रुपीकरण त्यांनी केलंच,पण आज देखील ते आपल्या कुटील विचाराने बहुजनांना मानसिक गुलाम करून घेत आहेत.
जातीयवाद अन भेद आम्ही करत नाही,ज्यांनी त्या निर्माण केल्या तेच करतात.पण,दोष मात्र आमच्या माथी.
तुम्ही सर्वांनी ठरवा तुम्हाला काय करायचं आहे ते..
गुलाम म्हणून जगायचं का छत्रपती शिवराय यांचा आदर्श घेवून लढायचं !?
मी तर छत्रपती शिवरायांचा एक मावळा होण्याचे वैचारिक कृतिशील परिवर्तनात्मक प्रयत्न करत आहे.छत्रपती शिवाजी महाराज नावाच्या या तेजस्वी सूर्याचा खरा इतिहास,कीर्तिचे,कर्तुत्वाचे,धैर्याचे, वैचारिकतेचे,बुद्धिमत्तेचे,मातृ-पित्रु व स्त्री सन्मानार्थ आचरणाचे,बळी राजाच्या हिताचे,सत्यशोधक, परिवर्तशील व असे अनेक पैलूंचे लौकिक संपूर्ण पृथ्वीतलावर पोचवण्याचे कार्य मला करायचं आहे.
आज ३ एप्रिल,छत्रपती शिवाजी महाराज यांचा स्मृती दिन ! त्यानिमित्ताने झोपलेल्या मावळ्यांना जागं करण्यासाठी एक आठवण म्हणून हा लेख माझा छोटा प्रयत्न.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पावन व अविस्मरणीय स्मृतीस विनम्र शिवाभिवादन !
ll जय शिवराय ll🙏🚩
प्राची दुधाने
वारसा सोशल फाऊंडेशन
Comments
Post a Comment