Posts

गणेशोत्सव

Image
गणेशोत्सव  भारताच्या प्राचीन सिंधू संस्कृतीचे आध्य दांपत्या शिव-पार्वती. शिव-पार्वती यांच्या गणांचा अधिपती गणपती.. बुद्धिमान व कर्तव्यनिष्ठ ! सिंधूजणांचे राज्य,म्हणजेच रयतेचे,गणांचे राज्य-गणराज्य !  भारताचे हे गणराज्य अखंड राहो,यासाठी मुळ स्वरूपातील गणपती स्वीकारून त्याप्रमाणे बुद्धिमान व कर्तव्यनिष्ठ होवून, मानवहित जोपासण्यास जागृत होण्यासाठी आपणा सर्वांना गणेश/गणपती उत्सवानिमित्त सदिच्छा !  सोबत छायाचित्र दिल आहे ते, मानवी मस्तक असलेल्या रूपात गणपतीची मूर्ती आहे. ही मूर्ती असलेले मंदिर,तामिळनाडूमध्ये कुथनूरपासूनजवळ तिलतर्पणपुरी जवळ आहे. असे अनेक गण आपल्याला नेमून दिलेल्या घटकांचे नेतृत्व करीत. जसे सेनापती, राष्ट्रपती, सभापती तसेच गणपती..  - प्राची दुधाने  वारसा सोशल फाऊंडेशन

"माझा मताधिकार, माझे स्वातंत्र्य"

Image
"माझा मताधिकार, माझे स्वातंत्र्य" सध्या पहावं तिकडे  "आम्ही मतदान करणारं नाही" या भूमिका घेतल्या जात आहेत.  नेत्यांवर, राज्यकर्त्यांवर, राजकारणावर त्यांच्या नीतीवर, व्यवस्थेवर रोष दाखवणं ठीक आहे. पण मतदान करणारं नाही हे म्हणणं कितपत योग्य आहे? आपला देश स्वतंत्र झाल्यानंतर भारतीय म्हणून मतदानाचा अधिकार सर्व भारतीयांना मिळाला. खरतर मतदान नसून तो आपला अधिकार आहे. या देशाचे राज्य, इथली घटना सर्व काही to the people, for the people, by the people आहे. म्हणजेच, इथल्या लोकांनी, लोकांसाठी बहाल केलेलं आपले राज्य व घटना आहे. हे स्वराज्य आहे. स्वातंत्र्य मिळून अधिकार प्राप्त होणं ही साधी सुधी बाब नाही. आपल्या लाखो पूर्वजांच्या रक्ताचे पाट या मातीत वाहिले आहेत. जे स्वातंत्र्य अधिकाराने आपण उपभोगत आहोत ते त्यांच्या संघर्ष व बलिदानाचे द्योतक आहे. आपल्या स्वातंत्र्याला पारतंत्र्यत जाण्यावाचून न रोखू शकणारे आपण, कोणत्या अधिकाराने त्यांनी बहाल केलेला वारसा नाकारत आहोत? त्यांना आपल्या मताप्रमाणे वागता येवू न येवू. पण आपल्या लेकरा बाळांना कोणाची गुलामी नको म्हणून स्वतःच्या चामडीच्या पा...

स्वातंत्र्य

Image
स्वातंत्र्य  भारताला व इथल्या प्रत्येक सजीवाला परकीयांच्या गुलामीतून मुक्त करण्यासाठी जो संघर्ष सर करून आपल्या पूर्वजांनी आपले रुधिर या मातीत वाहिले. त्यांच्या प्रत्येक बलिदानाची  मला जाणिव आहे.  मला जे स्वातंत्र्य त्यांनी बहाल केलं आहे त्याचा मी सन्मान करते. त्यांच्या खांद्यावर उभं राहून स्वातंत्र्याची जी उंच भरारी घेत आहे त्यासाठी मी त्यांची सदैव ऋणी आहे. तसेच, मी भारतीय आहे याचा मला अभिमान आहे. परंतु दिखाव्याचे राष्ट्रप्रेम, स्वातंत्र्याचा फुगीर अभिमान आणि या सर्वांचा इव्हेंट मला करता येत नाही.  किंबहुना मला करायचा नाही..  माझ्या स्वातंत्र्याच्या पाऊलखुणा प्रत्येक कृतीतून मला मागे ठेवून जायच्या आहेत. पुढची पिढी हाच मुक्त स्वातंत्र्याचा वारसा पुढे घेवून जाईल व आपली खरी संस्कृती जतन करतील. स्वातंत्र्य मिळवणे म्हणजे स्वैराचार नव्हे !  स्वातंत्र्याची परिभाषा सरळ जरी असली तरी त्याला कृतीत बांधण्याची जी व्यवस्था मानवाने निर्माण केली आहे ती जटील आहे. मानवाचे मानवासोबत मानवतेचे आचरण,  नाही गुलामी कोणास कोणाची, हाच स्वातंत्र्याचा खरा पाया असावा. स्वतः मुक्तप...

माझ्यात ही एक बुद्ध दडला आहे

Image
माझ्यात ही एक बुद्ध दडला आहे  जो त्या तथागताने अचूक हेरला आहे  दुःखावर तो धम्म गिरवतो  करुणेची जो बाग फुलवतो  जीवन मृत्यू सुसंगती घडवतो  खडतर वाट संघर्षाची हसत सर करतो  मानव कल्याणाचे मुक्त विहार होतो  प्रेमाचा विश्व संदेश रुजवितो  त्यागातून मम द्वीप उजळतो  एक गौतम माझ्यात ही विसावतो  व्यवस्थे विरुद्ध जो बंड पुकारतो  सय्यम,शांततेचा विद्रोह घडवतो  माझ्यातील असा बुद्ध तथागत तो  वैचारिक कृतिशीलतेने इथल्या मातीत पेरतो   तुमच्यातील हा बुद्ध कुठे दडतो ?  शोध त्याच्या घेण्या,बघा आज बुद्ध उगवतो ! ( बुद्ध पौर्णिमा(जयंती) निमित्त लिहिलेली ही कविता 🙏 ) - प्राची  फोटो क्रेडिट - जान्हवी  (गव्हर्नमेंट म्युझियम चेन्नई)  

आज का वास्तव

Image
*आज का वास्तव*  बहरा राजा अंध जनता,  विकास यहाँ नही मिलता,  सिर्फ सेठ का काला धंदा चलता, लाचार हर दर रहता,  कौन राम कौन रहीम  यह सिक्का चलता,  जले-मरे-कटे कोई किसे फ़रक हैं पडता, अपने सर हो ताज  और हात मे सत्ता,  बाकी भाड़ में जाये जनता.. -प्राची        

देशाला आज भगत सिंग हवाय

Image
आपल्या देशासाठी हसत हसत आपले बलिदान देणाऱ्या वीर क्रांतिकारी तरुण शहीद भगत सिंग यांचा आज जन्मदिवस ! त्यानिमिताने माझे दोन शब्द..   अवघ्या २३ वर्षाचा अल्प असा जीवनकाळ,परंतु कार्य असे की कायम स्मरणात राहिलं.आपल्या देशाला,  भारताला स्वातंत्र्य मिळावं यासाठी अगणित देशवासीयांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. वय,लिंग,जात,धर्म,प्रांत,भाषा या अशा भेदांच्या पलीकडे जावून एकसंध होवून इथल्या जन माणसांनी लढा उभारला,संघर्ष केला,आपले रुधिर या मातीत याच मातीतील माणसांना गुलामीतून मुक्त करण्यासाठी सांडले आहे.तेव्हा हे स्वातंत्र्य मिळाले ! इतकं सहज सोपं मिळालेलं नाही हे स्वातंत्र्य.आज आपण सहजपणे या स्वातंत्र्याचा स्वैराचारासाठी उपयोग करत आहोत.   लक्षात घ्या,तेव्हा ज्या वयात भगत सिंग सारखे तरुण तरुणी देशभक्ती खातर प्राणांची बाजी लावत होते,विखुरलेला देश सावरत होते.आज त्याचं वयाचे बहुतांशी तरुण तरुणी स्वतःला ही सावरू शकतं नाहीत. वर्तमानात भगत सिंगांचा आदर्श घेणारे तरुण तरुणी नक्की कोणत्या विचारांवर चालत आहेत,याची पुष्टी करणं आवश्यक आहे.भगत सिंग यांचे दोन विरोधी प्रतीक आज आपल्याला समाजात पहा...

आनंदी रक्षाबंधन

Image
आनंदी रक्षाबंधन  रक्षाबंधन हा सण बहीण भावाचं नातं दृढ करणारा सण,असं सांगितले जात. परंतु रक्षा ही फक्त भाऊ बहिणीची करतो हा समज कितपत योग्य आहे?    पहिला रक्षा करते आई.गर्भधारणेपासून जीवात जीव आहे तोवर डोळ्यांत तेल घालून आपली काळजी घेते.  बाबा ही यात कुठें कमी नाही.कुठें ही असले तरी लक्ष त्यांचे तुम्हावर राही.छोटी असो वा मोठी ताई असते आपली दुसरी आई.आई बाबांच्या ओरड्यापासून ते कोणत्या ही बाबतीत आपल्या रक्षणासाठी सज्ज असते.  ताई फक्त माझी दुसरा वाटेकरू नाही असा सज्जड दम भरून,लवकर लग्न करून जा म्हणतो खरा पण जरा वेळ दिसली नाही की जीव कासावीस होतो असा भाऊ. मोठा असेल तर बापाची माया ही तो लावी.  आज्जी आजोबांसाठी तर आपण सर्व दुधावरची साय.  त्यांची माया काय कधी आटत नाही.अशी अनेक नाती आपली तत्पर असतात नेहमी आपल्या रक्षणा खातर.    हो पण नात्याच्या ही पलीकडील किती तरी नाती आपल्या कळत नं कळत आपलं रक्षण करतं असतात आपल्याला माहिती ही नसतं.सजीव निर्जीव अनेक व्यक्ती वस्तूंचा समावेश यामधे असतो.बांदापासून सीमेपर्यंत शेतकऱ्यापासून सैनिका पर्यंत. डॉक्टर,साफसफाई काम...