ज्योतिबा
आज ११ एप्रिल, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती/जन्मोत्सव 🙏🚩 ज्योतिबा आज तुम्ही समोर असता तर प्रत्यक्ष तुमच्यासमोर मी व्यक्त झाले असते. तरी, आपल्याला स्मरून व्यक्त होते. दिवसागणिक ज्योतिबा तुमचे विचार व कार्य मेंदू आणिक मनात दृढ होत आहेत. भरकटलेल्या समाजाला योग्य दिशा दाखवून प्रगतीच्या पथावर घेवून येण्याचे अशक्य प्रयत्न आपण पूर्वत्वाला घेवून गेलात. आता त्यातून तुमचे पाईक म्हणून अनेकांनी आपले सवते सुभे मांडले आहेत. आम्ही कसे फुल्यांचे वैचारिक वारस आहोत हे सिद्ध करण्यासाठी स्पर्धा सुरु आहे. असं असलं तरी तुमचे विचार मात्र त्यांच्या कृतीतून केव्हाच हद्दपार झाले आहेत. ज्योतिबा तुम्ही आम्हा बहुजन वंचितांना बोटाला धरून शाळेत घेवून गेलात. अक्षर ओळख शिकता शिकता कधी मानव म्हणून आमची ओळख होवू लागली समजलंच नाही. थोडी बहुत समाजात आमची विचारणा होवू लागली. घराचा उंबरठा ओलांडून गगनभरारी घेवू लागलों. ज्योतिबा तुम्ही तुमच्या सावित्रीबरोबर कोट्यवधी सावित्रीच्या लेकींचे अस्तित्व निर्माण केले. खोट्या व अनावश्यक रूढी परंपरेच्या भया...