जन्मदिवस वृत्तांत
Late Post ! जन्मदिवस वृत्तांत २३ मार्च,माझ्या जन्मदिना निमित्ताने काही तरी वेगळा सामाजिक कार्यक्रम आपण घ्यावा हा विचार सतत मनात येत होता.२ वर्ष कोव्हीडच्या काळात अनेक सामाजिक उपक्रम हाती घेवून पार पाडले. पण ते व्हर्चुअल माध्यमातून.प्रत्यक्ष लोकांचा सहभाग असणारा मात्र कोणताच कार्यक्रम घेता आला नाही. त्यामुळे हा कार्यक्रम कायम स्मरणात राहिलं व त्यातून समाज जागृतीच्या एका नवीन उपक्रमाचा उगम होईल हा हेतू समोर ठेवून कोणता कार्यक्रम घ्यायचा ते ठरवू लागले.१०-११ तारखेला कार्यक्रम घ्यायचा हे निश्चित झालं.पण कार्यक्रम घ्यायचा कोणता? हा प्रश्न काही सुटला नव्हता.१६ तारखेला लोकायतच्या अलका जोशी यांना संपर्क केला.त्यांनी नुकताच महिलादिनानिमित्त महिलांच्या विविध विषयी पुण्यातच शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल आयोजन केले होते. अलकाला मी माझी कल्पना सांगितली.जन्मदिनी शॉर्ट फिल्म तुमच्या माध्यमातून आपण अरेंज करू शकतो का अस विचारलं. ती लगेच हो म्हणाली.कोणत्या शॉर्ट फिल्म दाखवायच्या ही चर्चा श्रद्धा बरोबर सुरु होती.२३ मार्च हा शहीद दिवस असतो.वीर भगतसिंग,राजगुरू,सुखदेव यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी उभारल...