श्राद्ध आणि कावळा..चिकित्सा
पूर्ण पोस्ट व्यवस्थित वाचावी ही विनंती..
श्राद्ध आणि कावळा..चिकित्सा
माझ्या एका परिचितांनी त्यांना त्यांच्या एका गृपवर आलेली ब्राह्मणी विचारसरणी असलेल्या मित्राने पाठवलेली ही खाली दिलेली पोस्ट पाठवली व त्यावर माझे मत जाणून घ्यायचे असल्याचे सांगितले.काही वेळातच मी त्यांना माझं मत कळवलं.
तर आधी ती पोस्ट काय होती ते पाहू आणि नंतर त्यावरील माझे मत मी पुढे मांडलं आहे.तरी आपण सर्वांनी ते वाचून प्रतिक्रिया कळवावी ही विनंती !
# ही ती पोस्ट #
श्राध्द केले की, कावळ्यासच का खाऊ घातले जाते...🤔 या मागील मुख्य हेतू शास्त्रीयदृष्ट्या जाणून घेऊया.
जगात प्रत्येक झाड हे प्राणवायुचे उत्सर्जन करत असते. पण केवळ "वड" व "पिंपळ" हे दोनच वृक्ष इतर झाडांपेक्षा एकाच वेळी दुपटीने सर्व मानवांसाठी व जीवांसाठी प्राणवायु उत्सर्जन करतात. हे सर्व शास्त्रज्ञांनी मान्य केलेले आहे.
जगात सर्व झाडांची रोपे बीज प्रक्रियेद्वारा "मनुष्य" लाऊ शकतो परंतु फक्त "वड" व "पिंपळ" या दोनच वृक्षांची प्रत्यक्ष बीज निर्मिती नाही. या दोन्ही झाडांची कोमल अंकुर स्वरूपातील फळं जेव्हा फक्त "कावळे"खातात, ( बघा त्यातही म्हटले आहे केवळ *कावळेच*, इतर कोणताही पक्षी नाही.) तेव्हा त्यांच्या "पोटातच" ही प्रक्रिया सुरु होते आणि ते जेथे "विष्ठा" करतात तेथेच "वड" किंवा "पिंपळ" हे वृक्ष येतात.
या कावळ्यांशिवाय ही झाडे टिकणार नाहीत व कावळ्यांचे अंडी घालणे (प्रजनन) हे फक्त "भाद्रपद" महिन्यातच होते. त्यामुळे त्यांना "घराघरातून" पोषक आहार या काळात "प्रत्येक" "सु-संस्कारी" मानवांनीच दिला तरच हे सृष्टीचक्र व्यवस्थित चालेल हे पूर्वीच्या आपल्याच "संतांनी, शास्त्रकारांनी जाणले होते.
आपल्या संस्कृतीतील "ऋषि-मुनि" हे अत्यंत बुद्धिमान आणि सखोल "विद्वान" होते. माणसांच्या आरोग्यासाठी ही "दोनच" झाडे अत्यंत उपयोगी व आवश्यक आहेत म्हणून या वृक्षांचे संवर्धन होण्यासाठीच पोषक आहार "कावळ्यांना" देण्याची प्रथा सुरु करण्यात आली. आपली पूर्वापार चालत आलेली जीवनशैली ही पर्यावरणपुरक आणि शास्त्रावर आधारलेली आहे ! फक्त ती समजून घ्यायची आपली "कुवत" कमी पडते म्हणून आपण वेड्यासारखं "पितृपक्ष" आला की "कावळ्यावर" टुकार विनोद करून एकमेकाला पाठवण्यातच धन्यता मानतो... *प्रत्येक प्रथेमागे जे विज्ञान आहे ते शोधण्याऐवजी त्यावर खिल्ली उडवणे यातच पुरोगामीपणा व अति-सुशिक्षितपणा ज्यांना वाटतो त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते. .
जशी आहे तशीच ही पोस्ट मी इथे कॉपी पेस्ट केली आहे.आता विषयाचा अंदाज आपल्याला आलाच आहे.अनेकांना यात काहीच चूक वाटली नसेल.काही लोकांनी त्यातील चुका देखील वाचतानाच काढल्या असतील.बऱ्याच जणांना त्याचं गांभीर्य देखील वाटतं नसेल.पण या अशा चुकीचे संदर्भ देवून समाजात किती अंधविश्वास पसरतो याचा विचार केला की याचे गांभीर्य समजेल. आपण शिकलो सवरलो,पण त्या ज्ञानाचा खरा उपयोग करण्यास तयारच झालो नाही.छोट्या छोट्या वाटणाऱ्या गोष्टी व बदल पुढे काय रूपं घेतात हे वेळ निघून गेल्यावर कळत.आता तरी अशा चुका होवू नये हिचं अपेक्षा.पुढे या पोस्ट वर माझी प्रतिक्रिया मी देत आहे.बघा पटत का..फार विषय तानून त्यावर प्रतिक्रिया दिली नाही.थोडक्यात जे योग्य वाटलं ते मांडलं आहे.विषय सत्य की असत्य हे समजून घेणं महत्वाचं..
# माझी प्रतिक्रिया#
श्राध्द केले की,कावळ्यासच का खाऊ घातले जाते...🤔 या मागील मुख्य हेतू शास्त्रीयदृष्ट्या जाणून घेऊया.
या शीर्षकावर आधारित एका लेखावर अधिक शास्त्रीय,चिकित्सक दृष्टीने केलेली मांडणी वास्तवतासहित.
आपण अधिक शास्त्रीय दृष्टीतून या विषयांकडे पाहू.
वड,पिंपळ निश्चित अधिक प्राणवायू वातावरणात निर्माण करत असतात,यात शंका नाही,पण त्याचं बरोबर तुळस,कडुनिंब,उंबर अशी अनेक वृक्ष ही आहेत.त्यामुळे केवळ हिचं वृक्ष आहेत असं म्हणणं काही प्रमाणात चूक म्हणावं लागेल.
शाश्त्रज्ञ अजून अभ्यास करत आहेत हे विसरून चालणार नाही.रोज नवीन शोध याद्वारे लावण्यात येत आहेत. कोणत्या ही एका सिद्धांतावर आडून रहाणं योग्य नाही.असो ! पुढे..
मानव तांत्रिक(तंत्रज्ञान)दृष्ट्या खुप काही करण्यास सक्षम बनला आहे. शास्त्राच्या आधारेच मानव या वृक्षांची निर्मिती करू शकतो हे सिद्ध झालं आहे.सोबत एक आर्टिकलची लिंक देत आहेत.यामध्ये अधिक माहिती मिळेल.त्यामुळे आता काही गोष्टी मागे सोडून पुढं जावं लागेल हेच सत्य आहे.
पिंपळ व वड या वृक्षांची फळं खाऊन असंख्य पक्षी व प्राणी यांच्या विष्ठेतून नवीन अंकुर फुटतो असं म्हंटल तर ठीक.पण केवळ कावळाच असं करतो म्हणणं चूक.बाकी शास्त्रीय दृष्ट्या कावळा इंग्रजी एप्रिल ते जुलै महिन्या दरम्यान अंडी देतो.आता हा भाद्रपद कधी येतो बघून घ्या..त्यात या कावळ्याना पोषक आहार 'सु-संस्कारी' मानवांनीच दिला तरच हे सृष्टीचक्र व्यवस्थित चालते हे असं आपल्या संतांनी व शास्त्रकारांनी जाणलं होत म्हणे...घ्या,म्हणजे हे अमान्य केलं तर कधाचित तुम्ही असंस्कारी ठरू शकता ही टांगती तलवार आधीच तुमच्यासवर आहे.
मग तुम्हाला पटल तरी तुम्ही मान्य कराल का?
हा प्रश्न निर्माण होतो.त्यात तुमची कुवत पणाला लागते 😅आता यात काय विज्ञान आहे मला तरी समजलं नाही. असं विज्ञान सांगणारे विद्वान आपल्याकडे फक्त ऋषीं मुनीच बुद्धिमान होवून गेले.बाकी सगळे बुद्धिहीन ! म्हणून तर या असल्यास थोतांडात आपण सापडतो. बाकी मानवाच्या जीवनात व सजीवांचे जीवन/सृष्टी चक्र नियमित चालण्यासाठी वड,पिंपळ, कावळा,त्याची विष्ठा,सु-संस्कारी लोक, बुद्धिमान ऋषीं मुनीच आवश्यक असतील तर तुम्ही आम्ही व इतर सजीव या पृथ्वीवर काय करतायेत?? बरं हे वृक्ष फक्त भारतातच आहेत का? म्हणून इथे ही विशेष सोय? असे असंख्य प्रश्न उभे रहातात,ज्यांची उत्तर मिळवण्यासाठी विद्वान असण्याची गरज नाही.हे समजून घेण्यास कोणाची कुवत कमी पडते हे थोडी चिकित्सा केली की समजेल.
प्रतिगाम्यांची बुद्धिमत्ता काढण्या योग्य मी निश्चित नाही.ज्यांनी देव निर्माण केला त्यांच्या बुद्धीस आपण काय तोड नाही का? असो !
वर केलेले चिकित्सक विश्लेषण पटले तर ठीक नाही तर अति सुशिक्षित व पुरोगामी म्हणून बुद्धीची किंवा करा आणि विषय सोडून द्या !
प्राची दुधाने
वारसा सोशल फाऊंडेशन
आर्टिकल लिंक-https://www.lokmat.com/gondia/pimpal-vadas-nursery-murdoelyat/
फोटो क्रेडिट-गुगल
Comments
Post a Comment