Posts

Showing posts from September, 2022

देशाला आज भगत सिंग हवाय

Image
आपल्या देशासाठी हसत हसत आपले बलिदान देणाऱ्या वीर क्रांतिकारी तरुण शहीद भगत सिंग यांचा आज जन्मदिवस ! त्यानिमिताने माझे दोन शब्द..   अवघ्या २३ वर्षाचा अल्प असा जीवनकाळ,परंतु कार्य असे की कायम स्मरणात राहिलं.आपल्या देशाला,  भारताला स्वातंत्र्य मिळावं यासाठी अगणित देशवासीयांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. वय,लिंग,जात,धर्म,प्रांत,भाषा या अशा भेदांच्या पलीकडे जावून एकसंध होवून इथल्या जन माणसांनी लढा उभारला,संघर्ष केला,आपले रुधिर या मातीत याच मातीतील माणसांना गुलामीतून मुक्त करण्यासाठी सांडले आहे.तेव्हा हे स्वातंत्र्य मिळाले ! इतकं सहज सोपं मिळालेलं नाही हे स्वातंत्र्य.आज आपण सहजपणे या स्वातंत्र्याचा स्वैराचारासाठी उपयोग करत आहोत.   लक्षात घ्या,तेव्हा ज्या वयात भगत सिंग सारखे तरुण तरुणी देशभक्ती खातर प्राणांची बाजी लावत होते,विखुरलेला देश सावरत होते.आज त्याचं वयाचे बहुतांशी तरुण तरुणी स्वतःला ही सावरू शकतं नाहीत. वर्तमानात भगत सिंगांचा आदर्श घेणारे तरुण तरुणी नक्की कोणत्या विचारांवर चालत आहेत,याची पुष्टी करणं आवश्यक आहे.भगत सिंग यांचे दोन विरोधी प्रतीक आज आपल्याला समाजात पहा...