जागतिक कुटुंबं दिन
कुटुंबं रक्ताच्या नात्यांचं असतं असं जर कोणी म्हणतं असेल तर मला वाटतं ते पूर्णतः बरोबर आहे असं म्हणतात येणार नाही.म्हणायला कुटुंबं दोन,चार,दहा माणसांचं असतं.परंतु त्याची व्यपकता ही वैश्विक आहे. "वसुधैव कुटुम्बकम" या विचाराने या वसुधेवर म्हणजे पृथ्वीवर असणारे सर्वंच सजीव आपले कुटुंबीय आहेत. होय ! सर्वंच सजीव.तुकाराम महाराजांच्या अभांगातील या ओळी सतत आपल्याला आपलं कुटुंबं किती व्यापक आहे हेच दर्शवतात. वृक्ष वल्ली आम्हां सोयरीं वनचरें । पक्षी ही सुस्वरें आळविती ।। हा अनुभव तर आपण घेतोच.पण सजीवांमध्ये इतर मानवांशी आपलं नात कसं जोडलं जात ही गंम्मतच आहे. या सगळ्याचा प्रत्यय सामाजिक जीवनात विविध क्षेत्रांमध्ये कार्य करताना अनेकदा येत असतो.आपल्या विचाराने,लेखणीने,कार्यामुळे सर्व स्थरातील मानवांची नाळ जोडली जाते हे अनुभव रोमांच निर्माण करतात. कधी काळी ज्ञात नसणारी मंडळी काळाच्या ओघात कोण बाबा आई दादा ताई वहिनी मामा काका मावशी आजी आजोबा कसे होऊन जातात हे समजून सांगण्या पलीकडे आहे.या सगळ्यामध्ये आणखीन एक नात असतं ते म्हणजे मैत्रीच ! या नात्यात विश्वातील सगळ्या नात्यांचा अर्क असत...