श्राद्ध आणि कावळा..चिकित्सा
पूर्ण पोस्ट व्यवस्थित वाचावी ही विनंती.. श्राद्ध आणि कावळा..चिकित्सा माझ्या एका परिचितांनी त्यांना त्यांच्या एका गृपवर आलेली ब्राह्मणी विचारसरणी असलेल्या मित्राने पाठवलेली ही खाली दिलेली पोस्ट पाठवली व त्यावर माझे मत जाणून घ्यायचे असल्याचे सांगितले.काही वेळातच मी त्यांना माझं मत कळवलं. तर आधी ती पोस्ट काय होती ते पाहू आणि नंतर त्यावरील माझे मत मी पुढे मांडलं आहे.तरी आपण सर्वांनी ते वाचून प्रतिक्रिया कळवावी ही विनंती ! # ही ती पोस्ट # श्राध्द केले की, कावळ्यासच का खाऊ घातले जाते...🤔 या मागील मुख्य हेतू शास्त्रीयदृष्ट्या जाणून घेऊया. जगात प्रत्येक झाड हे प्राणवायुचे उत्सर्जन करत असते. पण केवळ "वड" व "पिंपळ" हे दोनच वृक्ष इतर झाडांपेक्षा एकाच वेळी दुपटीने सर्व मानवांसाठी व जीवांसाठी प्राणवायु उत्सर्जन करतात. हे सर्व शास्त्रज्ञांनी मान्य केलेले आहे. जगात सर्व झाडांची रोपे बीज प्रक्रियेद्वारा "मनुष्य" लाऊ शकतो परंतु फक्त "वड" व "पिंपळ" या दोनच वृक्षांची प्रत्यक्ष बीज निर्मिती नाही. या दोन्ही झाडांची कोमल अंकुर स...