कार्ल मार्क्स
काही मानव आपल्या आयुष्यात खुप मोठं कार्य उभं करतात.असं की त्या कार्याची दखल केवळ समविचारी नाही,तर विरोधक ही घेतात.त्यांच्या विचारांवर आपल्या हेकेखोरपणाचे इमले हे विरोधक बांधण्याचा प्रयत्न करतात.पण,सर्वसामान्यांनी हे विचार आत्मसात केले की चळवळ उभी रहाते.त्यातून देश उभे रहातात अन हुकूमशहा बारगळतात.या तत्वज्ञानी लोकांची खरी किंमत भविष्यात समजते.जेव्हा त्यांनी सांगितलेले तत्वज्ञान खरं होताना दिसत आणि त्यातून मार्ग मात्र आपल्याला सापडत नाही.तो पर्यंत हे तत्वज्ञानी हयात नसतात.हो,पण त्यांनी दाखवलेला मार्ग विचार रूपाने आपल्यात सदैव जागृत असतो.हे लोक त्यामुळेच अमर होतात.कार्ल मार्क्स असाच एक अवलिया,जो तो असताना कमी आणि गेल्यावर जगाला जास्त समजला.जे जे चांगले ते ते घ्यावे,असं म्हंटल जात.
कार्ल मार्क्स कडून खुप काही घेण्यासारखं निश्चितच आहे.हे सर्वसामान्यांनी समजून घेतलं पाहिजे. स्वार्थी,हुकूमशहा,नीतिमत्ता शून्य लोकांनी त्याचा गैरवापरच केला.
कार्ल मार्क्स म्हणतो,‘तत्त्वज्ञांनी वेगवेगळ्या मार्गांनी जगाचा केवळ अर्थ लावला आहे;पण मुख्य मुद्दा आहे तो जग बदलविण्याचा.’
ते जग कसं आणि कोणी बदलवायचं हे मात्र आपण ठरवा.ते चुकीच्या विचारांनी बदलू नये एवढीच अपेक्षा.
परिवर्तन घडवायचं असेल तर सुरुवात आपल्यापासून करा.तो बदल मी होणार ! हे धेय्य मनी बाळगा आणि परिवर्तन घडवा..
बाकी आज ५ मे,कार्ल मार्क्सचा वाढदिवस.नुसतीच पांढरी दाढी वाढवलेला नाही,तर खरं खुरं ज्ञान असणाऱ्या मार्क्सला वाढदिवसाच्या क्रांतिकारी शुभेच्छा !
प्राची दुधाने
वारसा सोशल फाऊंडेशन
छान
ReplyDelete