छत्रपती शंभूराजे
आज दि.१४ मे स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव दिन अवघे ३२ वर्ष आयुष्य लाभलेले सूर्याहून ही तेजस्वी.... छत्रपती शिवाजी महाराज यांचे सर्वांगाने शोभतील असे उत्तराधिकारी,एकपत्नि,भूमिपुत्रांच्या ह्क्कासाठी लढणारे,लोकराजे,सत्यप्रिय,न्यायप्रिय,धर्मनिरपेक्ष, रणझुंजार,कर्तव्यदक्ष,उत्तम साहित्यिक,कुशल नेत्रुत्व,निर्भीड व अचूक निर्णय क्षमता,कर्तुत्वसंपन्न, शूर,पराक्रमी,राजनीतिज्ञ, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩 जगातील सर्वोत्तम पुत्र,पती,शासक,राजा ही ओळख आपल्या विचार व कृतीतून निर्माण करणारे शंभूराजे. शंभूराजे लहान असतानाच,आई सईबाई यांचे निधन झाले.धाराऊ या दूध आईच्या दुधावर ते मोठे झाले. जिजाऊंनी जसं शिवरायांना वाढवले,तसेच शंभूराजेंवर देखील संस्कार करून स्वराज्याला दुसरे छत्रपती दिले.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अनेक मोहिमांमधे बाल शंभूराजे सोबत असत.अनेक संकटांना सामोरं ही जावं लागतं.त्यांनी कोवळ्या वयात स्वराज्यासाठी सोसलेले घाव फार मोठे होते.लहान वयातच राज्यकारभाराचे ज्ञान शंभूराजेंना अवगत झाले होते. शंभूराजे सर्वांगाने तरबेज होते...