भारतीय संविधान दिन
२६ नोव्हेंबर भारतीय संविधान दिन ! भारताला स्वातंत्र्य मिळाल्या नंतर देशाने एक नवी उभारी घेणं आवश्यक होत. भारत हा विविधतेने नटलेला देश आहे.त्याचे स्वतंत्र राज्यकारभार असणं आवश्यक होतेच,पण ते पूर्णतः इंग्रजांच्या पॉलिसीवर केंद्रित नसावं अशी भारतीयांची धारणा होती.पण तरी ही ब्रिटिशांच्या माध्यमातून आपले स्वतंत्र संविधान असाव ज्याने भारताला स्वातंत्र्य होण्यास व नंतर उपयोग होईल या विचाराने स्वातंत्र्या आधीच संविधान सभेची/समितीची स्थापना करण्यात आली होती. ६ डिसेंबर १९४६ रोजी संविधान सभा स्थापन करण्यात आली व ९ डिसेंबरला पहिली बैठक सभेने घेतली होती.सुरुवातीला एकूण ३८९ सदस्य होते. नंतर जून १९४७ मधे ही संख्या घटत गेली व २९९ इतकी झाली.१९४७ मध्ये भारताला ब्रिटीशांकडून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर,संविधान सभेने भारताची पहिली संसद म्हणूनही काम केले आहे. संविधान सभेचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र प्रसाद व उपाध्यक्ष हरेंद्र कुमार मुखर्जी होते.जवाहरलाल नेहरू यांनी वस्तुनिष्ठ ठराव घटनेची मूलभूत तत्त्वे मांडली. जी नंतर घटनेची प्रस्तावना ठरली.हा वस्तुनिष्ठ ठराव सर्वानुमते स्वीकारला गेला.मसुदा समिती ...