Posts

Showing posts from October, 2023

दोन शब्द आईसाठी 🤱💞

Image
दोन शब्द आईसाठी 🤱💞 माझ्यासारख्या निराकाराला आकार दिला.  परिव्यापक होण्याचे सामर्थ्य अंगी पेरले. आपला भरभक्क्म संघर्षाचा वारसा बहाल केला.  आई (विजया थोरात) या आपल्या माय माऊलीचा आज जन्मदिवस ! आई आपल्या मुलांचा उत्कर्ष व सुख पाहून जो आनंद जे समाधान व जीवनाचं सार्थक म्हणून अनुभवते तो परमोच्च असतो. आज पर्यंत ही अनुभूतू तुझ्या उदरी जन्म घेवून तुला देवू शकले की नाही माहीत नाही. परंतु आजच्या तुझ्या या जन्मदिनी हे सुख तु तुझ्या डोळ्यांनी पहात व हृदयाने अनुभवत राहशील हा विश्वास तुला देते. लेकरांच्या काळजीने तुझ्या हृदयाचे पिळवटून जाने मी समजू शकते. आई आहेस, किती ही झालं तरी काळजी सुटणार नाही याची खात्री आहे.  "तुझ्या काळजाच्या त्या काळजीतील वेदनेला मात्र विराम देईन तुझं निखळ हसणं आणि चेहऱ्यावर आनंद टिकून ठेवण्यासाठी गरज भासली तर नभाला ही झुकविणं  तु फक्त पाठीवर मायेचा हात फिरवत रहा आई,   या विश्वातील सर्वात मौल्यवान असा ऐवज तुझ्या मुलांचं सुख तुझ्या हृदयात साठविणं !" तु माझ्यावर करतेच त्याची तुलना होवू शकतं नाही, तरी तितकंच तुला प्रेम 😘🌹♥️🥰 जन्मदिनी उदंड व आरोग...