स्वातंत्र्य
स्वातंत्र्य भारताला व इथल्या प्रत्येक सजीवाला परकीयांच्या गुलामीतून मुक्त करण्यासाठी जो संघर्ष सर करून आपल्या पूर्वजांनी आपले रुधिर या मातीत वाहिले. त्यांच्या प्रत्येक बलिदानाची मला जाणिव आहे. मला जे स्वातंत्र्य त्यांनी बहाल केलं आहे त्याचा मी सन्मान करते. त्यांच्या खांद्यावर उभं राहून स्वातंत्र्याची जी उंच भरारी घेत आहे त्यासाठी मी त्यांची सदैव ऋणी आहे. तसेच, मी भारतीय आहे याचा मला अभिमान आहे. परंतु दिखाव्याचे राष्ट्रप्रेम, स्वातंत्र्याचा फुगीर अभिमान आणि या सर्वांचा इव्हेंट मला करता येत नाही. किंबहुना मला करायचा नाही.. माझ्या स्वातंत्र्याच्या पाऊलखुणा प्रत्येक कृतीतून मला मागे ठेवून जायच्या आहेत. पुढची पिढी हाच मुक्त स्वातंत्र्याचा वारसा पुढे घेवून जाईल व आपली खरी संस्कृती जतन करतील. स्वातंत्र्य मिळवणे म्हणजे स्वैराचार नव्हे ! स्वातंत्र्याची परिभाषा सरळ जरी असली तरी त्याला कृतीत बांधण्याची जी व्यवस्था मानवाने निर्माण केली आहे ती जटील आहे. मानवाचे मानवासोबत मानवतेचे आचरण, नाही गुलामी कोणास कोणाची, हाच स्वातंत्र्याचा खरा पाया असावा. स्वतः मुक्तप...