माझ्यात ही एक बुद्ध दडला आहे
माझ्यात ही एक बुद्ध दडला आहे जो त्या तथागताने अचूक हेरला आहे दुःखावर तो धम्म गिरवतो करुणेची जो बाग फुलवतो जीवन मृत्यू सुसंगती घडवतो खडतर वाट संघर्षाची हसत सर करतो मानव कल्याणाचे मुक्त विहार होतो प्रेमाचा विश्व संदेश रुजवितो त्यागातून मम द्वीप उजळतो एक गौतम माझ्यात ही विसावतो व्यवस्थे विरुद्ध जो बंड पुकारतो सय्यम,शांततेचा विद्रोह घडवतो माझ्यातील असा बुद्ध तथागत तो वैचारिक कृतिशीलतेने इथल्या मातीत पेरतो तुमच्यातील हा बुद्ध कुठे दडतो ? शोध त्याच्या घेण्या,बघा आज बुद्ध उगवतो ! ( बुद्ध पौर्णिमा(जयंती) निमित्त लिहिलेली ही कविता 🙏 ) - प्राची फोटो क्रेडिट - जान्हवी (गव्हर्नमेंट म्युझियम चेन्नई)