Posts

Showing posts from August, 2022

आनंदी रक्षाबंधन

Image
आनंदी रक्षाबंधन  रक्षाबंधन हा सण बहीण भावाचं नातं दृढ करणारा सण,असं सांगितले जात. परंतु रक्षा ही फक्त भाऊ बहिणीची करतो हा समज कितपत योग्य आहे?    पहिला रक्षा करते आई.गर्भधारणेपासून जीवात जीव आहे तोवर डोळ्यांत तेल घालून आपली काळजी घेते.  बाबा ही यात कुठें कमी नाही.कुठें ही असले तरी लक्ष त्यांचे तुम्हावर राही.छोटी असो वा मोठी ताई असते आपली दुसरी आई.आई बाबांच्या ओरड्यापासून ते कोणत्या ही बाबतीत आपल्या रक्षणासाठी सज्ज असते.  ताई फक्त माझी दुसरा वाटेकरू नाही असा सज्जड दम भरून,लवकर लग्न करून जा म्हणतो खरा पण जरा वेळ दिसली नाही की जीव कासावीस होतो असा भाऊ. मोठा असेल तर बापाची माया ही तो लावी.  आज्जी आजोबांसाठी तर आपण सर्व दुधावरची साय.  त्यांची माया काय कधी आटत नाही.अशी अनेक नाती आपली तत्पर असतात नेहमी आपल्या रक्षणा खातर.    हो पण नात्याच्या ही पलीकडील किती तरी नाती आपल्या कळत नं कळत आपलं रक्षण करतं असतात आपल्याला माहिती ही नसतं.सजीव निर्जीव अनेक व्यक्ती वस्तूंचा समावेश यामधे असतो.बांदापासून सीमेपर्यंत शेतकऱ्यापासून सैनिका पर्यंत. डॉक्टर,साफसफाई काम...

पेटवू क्रांतीची मशाल

Image
९ ऑगस्ट..क्रांती दिन ! करा नाही तर मरा..करो या मरो.. Do or Die..लढेंगे या मरेंगे..भारत छोडो ! होय,याच घोषणा १९४२ साली ऑगस्ट महिन्यात संपूर्ण देशभर बोलल्या जात होत्या व ऐकू येत होत्या.  भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा उठाव १८५७ ला सुरु झाला.त्या नंतर पहिल्यांदा इतक्या मोठ्या प्रमाणात पुन्हा एकदा स्वातंत्र्य संग्राम ऑगस्ट क्रांती दिनी उभा राहीला. ९ ऑगस्ट १९४२ या दिवशी भारतासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिलेल्या सर्व क्रांतीकारकांना  अभिवादन करून देशाच्या स्वातंत्र्यासाठी "करो या मरो" ची भूमिका घेत इंग्रजांना भारत सोडण्याच्या आव्हानाचे रणशिंग भारतीयांनी फुंकले.    राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी मुंबई येथे भरवण्यात आलेल्या ९ ऑगस्ट १९४२ च्या काँग्रेस अधिवेशनात ब्रिटिशांना "भारत छोडोचे" आव्हानं केले.तसेच देशाला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी,पारतंत्र्यातून स्वातंत्र्य मिळवण्याकरिता सर्व देशवासियांना "करो या मरो" चा मंत्र ही दिला.गांधीजींचे हे आव्हानं संपूर्ण देशभर वेगाने पसरले.काँग्रेसच्या या आदिवेशनात गांधिजींसह,नेहरू,  पटेल,आझाद आदी नेते यांची उपस्थिती व भाषणे ही...

मंगळसूत्र तत्वज्ञान

Image
सकाळ सकाळ तत्वज्ञान वगेरे..😇🤭   काल मी अमृता फडणवीस यांची एक पोस्ट केली होती. त्यातील जोडलेला फोटो या पोस्टबरोबर पुन्हा जोडत आहे.मी म्हणाले होते,हे माझं सगळ्यात आवडत व्यक्तिमत्व.किती आत्मविश्वास आहे या व्यक्तीमधे.  आपल्याला वाटेल ते मांडून(गदारोळ झाला तरी)ही व्यक्ती मात्र निवांत असते.या मंगळसूत्राचा विषयच घ्या ना.किती सहज भारताची रूढी,परंपरा,संस्कार वगेरे वगेरे धुडकावून आपलं मतं,भावना व्यक्त केल्या.   या संदर्भातील काही प्रतिक्रिया वाचनात आल्या.ही बाई मंगळसूत्राबाबत बोलते ते कस चुकीच आहे हे सांगण्यात बरेच लोक पुढे सरसावले.तिची नेहमीप्रमाणे अक्कल ही काढून झाली.मंगळसूत्र या अलंकाराचा महत्व सांगण्यात  बाया तर बाया बापे ही मागे नव्हते.पण खरं सांगू का कधी कधी अमृता फडणवीस खरं बोलून जातात.हां आता ते मांडण्याची पद्धत थोडी विचित्र असते.परंतु त्यातून आपल्याला धडा मात्र मोठा शिकायला मिळतो.  या मंगळसूत्र पुराणाचेच घ्या ना.कसं ते थोडक्यात सांगते.    जे लोक पिढ्यानंपिढ्या तुम्हा आम्हाला या रूढी,  परंपरा,संस्कृतीचे डोस पाजत आले आहेत ते स्वतः मात्र प्रत्यक्षात...